व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

“मी किती वेळ मदतीची याचना करावी?”

“मी किती वेळ मदतीची याचना करावी?”

“मी किती वेळ मदतीची याचना करावी?”

“कधी थांबतील माझ्या या वेदना?” रडवेल्या स्वरात जेन हे म्हणत होती. तिला कॅन्सर झाला होता व तिच्या संपूर्ण शरीरात तो पसरत चालला होता. तिचा हा आजार व तिच्या वेदना आपण काढू शकलो असतो तर किती बरे झाले असते, असा विचार तिचे कुटुंबीय व मित्र-मैत्रिणी करत होते. तिला मदत करावी म्हणून त्यांनी देवाला प्रार्थना केली. तो त्यांची प्रार्थना ऐकेल का? त्याला खरोखरच तिची काळजी आहे का?

देवाला त्याच्या मानवी कुटुंबाच्या परिस्थितीची जाणीव आहे. त्याचे वचन बायबल म्हणते: “सबंध सृष्टी आजपर्यंत कण्हत आहे व वेदना भोगीत आहे.” (रोमकर ८:२२) जेन सारखे लाखो लोक दररोज शारिरीक, भावनिक किंवा मानसिक वेदना सहन करत आहेत हे देवाला माहीत आहे. दर दिवशी ८० कोटी लोकांना उपाशी पोटी झोपी जाताना, इतर लाखो लोकांना घरातील हिंसेला तोंड देताना आणि अनेक पालकांना आपल्या मुलांच्या भवितव्याची व हिताची काळजी करताना देव पाहतो. देव याबाबतीत काही करेल का? आपल्याला जर आपल्या प्रियजनांना मदत करावीशी वाटते तर देवालाही त्याने निर्माण केलेल्या त्याच्या मानवी कुटुंबाला मदत करावीशी वाटणार नाही का?

जर तुमच्याही मनात हे प्रश्‍न आले असतील तर हे प्रश्‍न विचारणारे तुम्ही एकटेच नाही. सुमारे २,६०० पेक्षा अधिक वर्षांपूर्वी हबक्कूक नावाच्या एका विश्‍वासू इब्री संदेष्ट्यालाही अनेकांप्रमाणे असेच वाटले होते व त्याने देवाला विचारले: “हे प्रभू, मी किती वेळ मदतीची याचना करावी? पण तू ऐकतच नाही. काय हा जुलूम? मी म्हणतो, पण सुटका करीत नाहीस. मला अधर्म का पहायला लावतोस, अन्याय का दाखवतोस? विनाश व अत्याचार माझ्यासमोर चाललेत, भांडणे लागलीत, वाद उपस्थित झालेत.” (हबक्कूक १:२, ३, मराठी कॉमन लँग्वेज) हबक्कूकने स्वतःच्या डोळ्यांनी त्याच्या दिवसांतील अमानूष, माणूसकीला न शोभणारी व निर्विकारपणे केली जाणारी हिंसाचाराची कृत्ये पाहिली होती. दयाळू लोकांना अस्वस्थ, बेचैन करणाऱ्‍या अशा घटना दररोजच घडतात.

हबक्कूकला वाटणारी काळजी देवाने क्षुल्लक समजली का? नाही. त्याने या अस्वस्थ माणसाचे प्रामाणिक प्रश्‍न ऐकून घेतले व त्याचे सांत्वन करून त्याला प्रोत्साहन दिले. मी दुःख नाहीसे करेन, असे यहोवा देवाने हबक्कूकला वचन देऊन त्याचा विश्‍वास मजबूत केला. देवाच्या आशादायक संदेशाने जेन व तिच्या कुटुंबाला सांत्वन मिळाले, तुम्हीही सांत्वन मिळवू शकता. पुढील लेख या प्रश्‍नांची उत्तरे देईल: देवाला आपली काळजी आहे ही खातरी आपण कशी बाळगू शकतो? दु:खाचा अंत करण्यासाठी देव कोणते पाऊल उचलेल व कधी? (w०९-E १२/०१)