व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

पापाबद्दलचे सत्य

पापाबद्दलचे सत्य

पापाबद्दलचे सत्य

एका आजारी माणसाने जर, त्याला ताप नाही, तो बरा आहे हा त्याचा दावा खरा करण्यासाठी थर्मोमीटर तोडले तर, त्याला खरोखरच ताप नाही हे सिद्ध होईल का? तसेच, आज पुष्कळ लोक, पापाबद्दल देवाचा दृष्टिकोन धुडकावून लावतात. त्यांच्या अशा वागण्यावरून, जगात पाप नाही, हे सिद्ध होते का? मुळीच नाही. देवाचे वचन बायबल, पापाबद्दल बरेच काही सांगते. काय सांगते?

सर्व उणे पडले आहेत

सुमारे दोन हजार वर्षांपूर्वी, प्रेषित पौलाने एका वस्तुस्थितीविषयी खंत व्यक्‍त केली. तो म्हणाला: “जे चांगले करावेसे मला वाटते ते मी करीत नाही; तर करावेसे वाटत नाही असे जे वाईट ते मी करितो.” (रोमकर ७:१९) आपण जर स्वतःशी प्रामाणिक असू तर हे कबूल करू, की आपली परिस्थिती देखील पौलासारखीच आहे. दहा आज्ञा किंवा वर्तनाबद्दल असलेले नियम पाळण्याची आपली मनापासून इच्छा असेल पण आपल्याला आवडो अगर न आवडो, आपण सर्व उणे पडतो. आपण मुद्दामहून एखाद्या नियमाचे उल्लंघन करतो अशातला भाग नाही, तर आपण कमजोर आहोत. का कमजोर आहोत? पौल याचे उत्तर देतो. तो म्हणतो: “जे करावेसे वाटत नाही ते जर मी करितो, तर ते कर्म मीच करितो असे नव्हे, तर माझ्या ठायी वसणारे पाप ते करिते.”—रोमकर ७:२०.

पौलाप्रमाणे सर्व मानवजात जन्मापासूनच कमजोर आहे; आपल्याला वारशाने मिळालेल्या पाप व अपरिपूर्णतेचा हा पुरावा आहे. पौलाने म्हटले “सर्वांनी पाप केले आहे आणि ते देवाच्या गौरवाला उणे पडले आहेत.” आपली अशी अवस्था का झाली आहे? पौल त्याचे कारण सांगतो: “एका माणसाच्या [आदामाच्या] द्वारे पाप जगात शिरले आणि पापाच्या द्वारे मरण शिरले; आणि सर्वांनी पाप केल्यामुळे सर्व माणसांमध्ये अशा प्रकारे मरण पसरले.”—रोमकर ३:२३; ५:१२.

आपल्या पहिल्या पालकांनी पाप केले व आपल्याला देवापासून दूर नेले व यामुळे देवाने दिलेली परिपूर्ण जीवनाची संधी आपण गमावली, ही शिकवण पुष्कळ लोक मान्य करत नाहीत. पण बायबल तर हेच शिकवते. बायबलमधील उत्पत्तिच्या सुरुवातीच्या अध्यायांचा उल्लेख करून येशूने दाखवून दिले, की आदाम व हव्वा यांचा अहवाल खरा होता.—उत्पत्ति १:२७; २:२४; ५:२; मत्तय १९:१-५.

बायबलमधील मुख्य शिकवणींपैकी एक शिकवण ही आहे, की येशू त्याच्यावर विश्‍वास ठेवणाऱ्‍या लोकांची पापी अवस्थेतून सुटका करण्यासाठी पृथ्वीवर आला होता. (योहान ३:१६) ज्यातून बाहेर पडणे अशक्य आहे अशा पेचात सापडलेल्या कृतज्ञ मानवांची सुटका करण्यासाठी यहोवाने केलेल्या व्यवस्थेचा स्वीकार करण्यावरच आपले जीवन-मरण अवलंबून आहे. पण पापाबद्दल देवाचा जो दृष्टिकोन आहे तो आपण जोपर्यंत स्पष्टपणे समजून घेत नाही तोपर्यंत, या पापातून मुक्‍त होण्याकरता देवाने जी व्यवस्था केली ती समजून घेऊन आपण तिच्याबद्दल कृतज्ञता व्यक्‍त करू शकणार नाही.

येशूचे बलिदान व त्याची काय आवश्‍यकता होती

यहोवा देवाने पहिला मानव आदाम याला सदा सर्वकाळ जिवंत राहण्याची आशा दिली होती. त्याने जर देवाविरुद्ध बंड केले तरच तो ही आशा गमावणार होता. आणि आदामाने नेमके हेच केले. देवाविरुद्ध बंड करून तो पापी बनला. (उत्पत्ति २:१५-१७; ३:६) आदामाने देवाच्या इच्छेच्या विरुद्ध कार्य केले, तो परिपूर्ण राहण्यास अपात्र ठरला आणि यामुळे देवाबरोबर असलेला त्याचा नातेसंबंध खराब झाला. देवाने दिलेला नियम तोडल्यानंतर तो म्हातारा होत गेला आणि एकेदिवशी मरण पावला. आणि दुःखाची गोष्ट म्हणजे, आपण त्या आदामाची मुले असल्यामुळे जन्मतःच पापी आहोत व त्यामुळे आपल्या सर्वांचा मृत्यू हा अटळ आहे. कसे काय?

या प्रश्‍नाचे उत्तर अगदी सोपे आहे. अपरिपूर्ण पालक परिपूर्ण मुले उत्पन्‍न करू शकत नाहीत. आदामाची सर्व मुले पापीच जन्मली. आणि प्रेषित पौलाने म्हटल्याप्रमाणे: “पापाचे वेतन मरण आहे.” (रोमकर ६:२३) “पण देवाचे कृपादान आपल्या प्रभु येशू ख्रिस्तामध्ये सार्वकालिक जीवन आहे,” अशी आशा त्या वचनातील उर्वरीत भागात दिली आहे. याचा अर्थ, येशूने आपले जीवन अर्पण केल्यामुळे आज्ञाधारक, कृतज्ञ मानव आदामाच्या पापाच्या परिणामांपासून शुद्ध होऊ शकतात. * (मत्तय २०:२८; १ पेत्र १:१८, १९) हे सर्व वाचल्यावर तुम्हाला कसे वाटले पाहिजे?

ख्रिस्ताचे प्रेम आपल्याला “भाग पाडते”

या प्रश्‍नाचे देवाने दिलेले उत्तर पौलाने सांगितले. त्याने लिहिले: “ख्रिस्ताचे प्रेम आम्हाला भाग पाडते, कारण आमची खात्री झाली आहे की, जर एक सर्वांसाठी मेला . . . आणि तो सर्वांसाठी मेला, यासाठी की जे जगतात त्यांनी स्वतःसाठीच जगू नये तर जो त्यांच्यासाठी मेला व [ज्याला पुन्हा उठवण्यात आले] त्याच्यासाठी जगावे.” (२ करिंथकर ५:१४, १५, ईझी टू रीड भाषांतर.) येशूच्या बलिदानामुळे पापाच्या परिणामांपासून माझी मुक्‍तता होऊ शकते, असा जर एक व्यक्‍ती विश्‍वास करत असेल आणि या तरतूदीबद्दल कृतज्ञता दाखवू इच्छित असेल तर तिने देवाच्या इच्छेनुसार जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. यामध्ये, देवाच्या अटींबद्दलचे अचूक ज्ञान घेणे, बायबलच्या स्तरांनुसार स्वतःच्या विवेकाला प्रशिक्षण देणे आणि मग या स्तरांनुसार जगणे समाविष्ट आहे.—योहान १७:३, १७.

पाप केल्यामुळे यहोवा देवाबरोबरचा आपला नातेसंबंध बिघडतो. बायबलमध्ये उल्लेखण्यात आलेल्या राजा दावीदाने बथ-शेबाबरोबर व्यभिचार केला, मग तिच्या नवऱ्‍याचा वध करवला. या पापांच्या गांभीर्याची त्याला जाणीव झाली तेव्हा त्याला स्वतःची खूप लाज वाटली. आपण केलेल्या पापांमुळे देवाला किती वाईट वाटले असेल, याची त्याला सर्वात जास्त चिंता वाटली. आणि त्याची चिंता रास्त होती. म्हणून त्याने पश्‍चात्ताप करत यहोवासमोर हे कबूल केले: “तुझ्याविरुद्ध, तुझ्याविरुद्धच मी पाप केले आहे, तुझ्या दृष्टीने जे वाईट ते मी केले आहे.” (स्तोत्र ५१:४) बायबलमध्ये उल्लेखण्यात आलेल्या योसेफासमोरही जेव्हा व्यभिचार करण्याचा मोह आला तेव्हा त्याच्या विवेकाने त्याला असे विचारण्यास प्रवृत्त केले: “एवढी मोठी वाईट गोष्ट करून मी देवाच्या विरुद्ध पाप कसे करू?”—उत्पत्ति ३९:९.

तेव्हा पाप म्हणजे, आपण काहीतरी चूक करत असताना पकडलो गेल्यामुळे वाटणारी लाजेची भावना नव्हे. किंवा एखादी गोष्ट करू न शकल्यामुळे लोकांना किंवा समाजाला उत्तर द्यावे लागण्याच्या भीतीची भावना नाही. तर सेक्स, प्रामाणिकपणा, आदर, उपासना वगैरेसारख्या गोष्टींबद्दल असलेले देवाचे नियम तोडणे म्हणजे पाप आहे व यांमुळे देवाबरोबरचा आपला नातेसंबंध बिघडतो. आपण जर मुद्दामहून पाप करत राहिलो तर आपण स्वतःला देवाचा शत्रू बनवतो. हे एक असे सत्य आहे ज्यावर आपण गांभीर्याने विचार केला पाहिजे.—१ योहान ३:४, ८.

पापाकडे लोक कसे पाहू लागले आहेत? खरे तर पाप, पापच राहिले आहे. फक्‍त त्याचे गांभीर्य कमी करण्याच्या आशेने लोक त्याला वेगवेगळ्या नावांनी बोलवू लागले. पुष्कळ लोकांचा विवेक बोथट झाला आहे किंवा ते त्यांच्या विवेकाकडे दुर्लक्ष करत आहेत. पण देवाचे मन आनंदित करू इच्छिणाऱ्‍यांनी असे करण्याचे टाळले पाहिजे. आपण पाहिले, की पापाचे परिणाम, प्रतिष्ठेला ठेच लागण्याची किंवा लाज वाटण्याची भावना नाही तर मृत्यू आहे. पाप हा जीवन मरणाचा प्रश्‍न आहे.

पण, आपण जर आपल्या पापी कार्यांबद्दल मनापासून पश्‍चात्ताप केला आणि ती कार्ये करण्याचे सोडून दिले, तर येशूच्या बलिदानाच्या आधारावर आपण पापापासून सुटका मिळवून देवाची क्षमा प्राप्त करू शकतो. पौलाने लिहिले, “ज्यांच्या अपराधांची क्षमा झाली आहे व ज्यांच्या पापांवर पांघरूण घातले आहे ते धन्य. ज्या माणसाला हिशेबी प्रभु पाप लावीत नाही, तो धन्य.”—रोमकर ४:७, ८. (w१०-E ०६/०१)

[तळटीप]

^ परि. 10 येशूने दिलेल्या बलिदानरूपी मृत्यूमध्ये, आज्ञाधारक मानवांना वाचवण्याची शक्‍ती आहे याबद्दल आणखी सविस्तर माहिती हवी असेल तर यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केलेले बायबल नेमके काय शिकवते? या पुस्तकाची पृष्ठे ४७ ते ५४ पाहा.

[१६ पानांवरील चौकट/ चित्र]

चर्चने बदलली शिकवण!

चर्चला जाणाऱ्‍या बहुतेक कॅथलिकांना, लिंबोची शिकवण कधीच इतक्या स्पष्टपणे कळलेली नव्हती. आणि अलीकडच्या काळात तर ती हळूहळू लोपही पावत चालली आहे. कॅट्‌कीझमच्या वर्गातही ही शिकवण दिली जात नाही. सन २००७ मध्ये, कॅथलिक चर्चने अधिकृतरीत्या सह्‍या केलेल्या एका दस्तऐवजात लिंबोची शिकवण काढून टाकण्यात आल्याचा उल्लेख केला. हा बदल करण्यामागे त्यांनी, “धार्मिक व चर्च सेवांशी संबंधित असलेली कारणे दिली. बाप्तिस्मा होण्याआधीच मरण पावणाऱ्‍या शिशुंचे तारण व्हावे आणि त्यांनाही अखंड आनंद मिळावा,” हे त्यामागचे कारण त्यांनी सांगितले.—इंटरनॅशनल थिओलॉजिकल कमिशन.

पण कॅथलिक चर्चने ही शिकवण का बदलली? फ्रेंच स्तंभलेखक हेन्री टेंक याचे उत्तर देतात. ते म्हणतात: ‘ही शिकवण बदलल्यामुळे चर्च, मध्ययुगापासून गेल्या शतकापर्यंत वागवत असलेल्या एका ओझ्यापासून मुक्‍त झाले आहे. होता होईल तितक्या लवकर आपल्या मुलांचा बाप्तिस्मा करण्यास पालकांना उत्तेजित करण्याकरता, लोकांवर पगडा असलेले चर्च लिंबोच्या शिकवणीचा धाक त्यांना दाखवायचे.’ पण, ही शिकवण बदलल्यामुळे इतर अनेक प्रश्‍न उभे राहतात.

परंपरा की बायबलवर आधारित? इतिहासात पाहिल्यास, लिंबोची शिकवण १२व्या शतकातील परगेटरीशी संबंधित असलेल्या वादविषयांतून निघाली. कॅथलिक चर्चने अशी शिकवण दिली, की मानवाचा मृत्यू होतो तेव्हा त्याच्या शरीरातला एक भाग जिवंत राहतो. पण, बाप्तिस्मा न होताच मरण पावणाऱ्‍या मुलांसाठी चर्चला एक जागा शोधून काढावी लागली. कारण ही मुले नरकात जाण्याइतकी वाईट नव्हती. अशा प्रकारे लिंबोची शिकवण उदयास आली.

पण, मानवाच्या मृत्यूनंतर शरीरातला एक भाग अमर राहतो, अशी शिकवण बायबल मुळीच देत नाही. उलट ते स्पष्टपणे असे शिकवते, की “मृतांस तर काहीच कळत नाही,” आणि एखाद्याचा मृत्यू होतो तेव्हा तो “मातीस पुन्हा मिळतो; त्याच वेळी त्याच्या योजनांचा शेवट होतो.” (स्तोत्र १४६:४; उपदेशक ९:५, १०) मानवाच्या शरीरातील कोणताही भाग जिवंत राहत नसल्यामुळे, लिंबो सारखे ठिकाण असूच शकत नाही. आणि मृत माणसाची अवस्था झोपलेल्या माणसासारखी असते, असे बायबलमध्ये म्हटले आहे.—योहान ११:११-१४.

खऱ्‍या ख्रिस्ती पालकांच्या लहान मुलांना देव पवित्र समजतो, असे बायबलमध्ये म्हटले आहे. (१ करिंथकर ७:१४) त्यांच्या तारणासाठी जर बालकांचा बाप्तिस्मा आवश्‍यक असता तर वरील विधानाला काही अर्थ राहिला नसता.

लिंबोची शिकवण खरे तर देवाचा अपमान करणारी होती. तो एक क्रूर व निर्दयी देव आहे जो निष्पाप लोकांना शिक्षा देतो, अशी शिकवण देवाविषयी दिली जायची. परंतु वास्तविकतेत, देव न्यायी व प्रेमळ पिता आहे. (अनुवाद ३२:४; मत्तय ५:४५; १ योहान ४:८) म्हणूनच, प्रामाणिक मनाच्या ख्रिश्‍चनांना बायबलमध्ये नसलेली ही शिकवण केव्हाही पटली नाही.

[१५ पानांवरील चित्रे]

आपण जर देवाच्या वचनानुसार जगलो तर देवाबरोबरचा आणि सहमानवांबरोबरचा आपला नातेसंबंध निरोगी राहील