व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

देवाला त्याच्या नावाने ओळखण्यात काय सामावलेले आहे?

देवाला त्याच्या नावाने ओळखण्यात काय सामावलेले आहे?

देवाला त्याच्या नावाने ओळखण्यात काय सामावलेले आहे?

तुमच्या नावाचा काही विशिष्ट अर्थ होतो का? जगातल्या काही भागात बाळाचे अनेक अर्थ देणारे नाव ठेवण्याची प्रथा आहे. त्या नावावरून, बाळाच्या आईवडिलांचे धार्मिक विश्‍वास व मूल्ये किंवा बाळाच्या भविष्याबद्दल त्यांच्या काय आशा आहात किंवा त्यांची काय स्वप्ने आहेत हे कळते.

अनेक अर्थ असलेले नाव ठेवण्याची प्रथा फार जुनी आहे. बायबल लिहिले त्या काळांत, एखाद्या विशिष्ट अर्थामुळे एखाद्या व्यक्‍तीला नाव दिले जायचे. त्या व्यक्‍तीच्या नावावरून, तिच्याकडून कोणते कार्य अपेक्षिले जाते ते सूचित होत असे. उदाहरणार्थ, यहोवाने दाविदाला त्याचा पुत्र शलमोन याच्या भविष्यातील भूमिकेविषयी सांगताना असे म्हटले: “त्याचे नाव शलमोन (शांतताप्रिय) असे होईल; त्याच्या कारकीर्दीत मी इस्राएलास शांति व स्वस्थता देईन.”—१ इतिहास २२:९.

कधीकधी यहोवाने एखाद्या व्यक्‍तीला तिच्या नवीन भूमिकेमुळे तिला नवीन नाव दिले. अब्राहामाच्या पत्नीचे नाव होते साराय; तिला मूलबाळ नव्हते. पण यहोवाने तिचे साराय हे नाव बदलून सारा केले. या नावाचा अर्थ “राजकुमारी” असा होतो. यहोवाने असे का केले? तोच त्याचे कारण सांगतो: “मी तिला आशीर्वादित करीन, एवढेच नव्हे तर तिच्या पोटी तुला एक मुलगा देईन; मी तिला आशीर्वादित करीन, तिच्यापासून राष्ट्रे उद्‌भवतील, तिच्यापासून राष्ट्रांचे राजे निपजतील.” (उत्पत्ति १७:१६) यावरून स्पष्ट होते, की साराला नवीन नाव का मिळाले ते समजून घेण्यात, तिची भूमिका समजून घेणे समाविष्ट होते.

मग, सर्व नावांत सर्वात महत्त्वाचे असलेल्या नावाबद्दल अर्थात यहोवा या नावाबद्दल काय? या नावाचा काय अर्थ होतो? मोशेने जेव्हा देवाला त्याच्या नावाविषयी विचारले तेव्हा यहोवाने त्याला असे उत्तर दिले: “मी जे होईन ते मी होईन.” (निर्गम ३:१४, NW) रॉदरहॅमच्या बायबल भाषांतरात हे वचन असे आहे: “मला जे व्हायचे आहे ते मी होईन.” यहोवाच्या नावावरून कळते, की तो अनेक भूमिका निभावणारा देव आहे. हे समजायला पुढील उदाहरणाचा विचार करा: एका आईला आपल्या मुलाला सांभाळताना दररोज अनेक भूमिका पार पाडाव्या लागतात. जशी गरज भासते तशी ती कधी त्या बाळाची दाई, स्वयंपाकीण तर कधी शिक्षिका बनते. त्याच प्रमाणे यहोवासुद्धा एका उच्च स्तरावर अनेक भूमिका पार पाडतो. मानवजातीबद्दलचे आपले प्रेमळ उद्देश पूर्ण करण्याकरता तो, त्याला हवे ते बनू शकतो; गरज भासेल ती भूमिका तो घेऊ शकतो. तेव्हा, यहोवाला त्याच्या नावाने ओळखण्यामध्ये, त्याच्या अनेक भूमिकांबद्दलची समज प्राप्त करणे व त्या भूमिकांबद्दल आपल्या मनात कृतज्ञता वाढवणे समाविष्ट आहे.

दुःखाची गोष्ट अशी आहे, की जे देवाला त्याच्या नावाने ओळखत नाहीत त्यांना त्याच्या व्यक्‍तिमत्त्वाबद्दलची काहीच माहिती नाही. पण बायबलचा अभ्यास करून तुम्ही यहोवाबद्दल शिकू शकता. तो एक सुज्ञ सल्लागार, शक्‍तिशाली तारणकर्ता, मानवाच्या गरजा मोठ्या हाताने कशा पुरवतो, ते तुम्हाला कळेल. विविध अर्थछटा असलेले यहोवाचे नाव खरोखरच विलक्षण भयप्रेरक आहे.

तरीपण, देवाला त्याच्या नावाने ओळखणे नेहमीच सोपे नाही. का नाही त्याचे कारण पुढील लेखात समजावून सांगण्यात आले आहे. (w१०-E ०७/०१)