व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

पैशावर किंवा मालमत्तेवर नव्हे तर लोकांवर प्रेम करा

पैशावर किंवा मालमत्तेवर नव्हे तर लोकांवर प्रेम करा

रहस्य १

पैशावर किंवा मालमत्तेवर नव्हे तर लोकांवर प्रेम करा

बायबल काय शिकवते? “द्रव्याचा लोभ सर्व प्रकारच्या वाइटाचे एक मूळ आहे.”—१ तीमथ्य ६:१०.

समस्या? जाहिरातींमधून असे दाखवले जाते, की आपल्याजवळ जे आहे ते चांगले नाही. आपण त्याच्यापेक्षा आणखी चांगल्या गोष्टी घेतल्या पाहिजेत. नवनवीन, सर्वोत्कृष्ट व मोठमोठ्या वस्तू विकत घेता याव्यात म्हणून आपण चोवीस तास, पाठीचा कणा मोडेपर्यंत कष्ट करून पैसा मिळवला पाहिजे असा संदेश आपल्याला मिळत असतो. पैसा अतिशय भुरळ पाडणारा असल्यामुळे आपण त्याच्या प्रेमात अगदी सहज पडू शकतो. परंतु जी व्यक्‍ती धनसंपत्तीवर प्रेम करते ती कधीही समाधानी नसते, असा इशारा बायबल देते. “ज्याला पैसा प्रिय वाटतो त्याची पैशाने तृप्ती होत नाही; जो विपुल धनाचा लोभ धरितो त्याला काही लाभ घडत नाही,” असे राजा शलमोनाने लिहिले.—उपदेशक ५:१०.

तुम्ही काय करू शकता? येशूचे अनुकरण करा आणि वस्तुंऐवजी लोकांवर प्रेम करायला शिका. येशूचे लोकांवर प्रेम होते म्हणून तो सर्वकाही, अगदी स्वतःच्या जीवनाचाही त्याग करायला तयार होता. (योहान १५:१३) त्याने म्हटले: “घेण्यापेक्षा देणे ह्‍यात जास्त धन्यता आहे.” (प्रेषितांची कृत्ये २०:३५) लोकांना मदत करण्यासाठी आपण जर आपला वेळ आणि पैसा खर्च करण्याची स्वतःला सवय लावून घेतली तर लोकही आपल्याशी तसेच वागतील. येशूने म्हटले: “द्या म्हणजे तुम्हांस दिले जाईल.” (लूक ६:३८) पैसा, मालमत्ता यांच्या पाठीमागे धावणारे लोक स्वतःवर खूप दुःख व त्रास ओढवून घेतात. (१ तीमथ्य ६:९, १०) दुसऱ्‍या बाजूला पाहता, इतरांवर प्रेम करण्याद्वारे व इतरांचे प्रेम मिळवण्याद्वारेच खरी संतुष्टी मिळते.

तुम्ही तुमच्या राहणीमानावर जरा विचार करून ते साधे बनवू शकता का? तुमच्याजवळ असलेल्या वस्तू तुम्ही कमी करू शकता का? किंवा मग तुम्ही ज्या वस्तू विकत घ्यायचा विचार करत आहात तो विचार मनातून काढून टाकू शकता का? असे जर तुम्ही केले तर तुम्हाला जाणवेल, की जीवनातल्या महत्त्वाच्या गोष्टींसाठी जसे की, लोकांना मदत करणे व ज्याने तुम्हाला सर्व काही दिले आहे त्या देवाची सेवा करणे, यांसारख्या महत्त्वाच्या गोष्टींसाठी तुमच्याजवळ ज्यादा वेळ व शक्‍ती असेल.—मत्तय ६:२४; प्रेषितांची कृत्ये १७:२८. (w१०-E ११/०१)

[४ पानांवरील चित्र]

“द्या म्हणजे तुम्हास दिले जाईल”