व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

संतुष्ट असणे शक्य आहे का?

संतुष्ट असणे शक्य आहे का?

संतुष्ट असणे शक्य आहे का?

“संतुष्टी असेल तर, गरीब लोक श्रीमंत बनतात; असंतुष्टी असेल तर श्रीमंत लोक गरीब बनतात.” —बेंजमीन फ्रँकलीन.

याम्हणीनुसार पुष्कळ लोकांना कळून चुकले आहे, की संतुष्टी किंवा समाधान विकत घेता येत नाही. म्हणूनच तर, मालमत्ता, मोठे नाव किंवा इतरांसारखे जीवन जगण्याच्या इच्छेला खतपाणी घालणाऱ्‍या या जगात, आहे त्यात समाधानी असणे किंवा संतुष्ट होणे कठीण आहे. खाली उल्लेखलेल्या गोष्टींपैकी एखाद्या गोष्टीचा तुमच्यावर प्रभाव पडला आहे का? जसे की:

• तुम्ही जोपर्यंत भरपूर गोष्टी विकत घेत नाही तोपर्यंत तुम्ही संतुष्ट होणार नाही, हे मनावर बिंबवणाऱ्‍या जाहिराती.

• कामाच्या ठिकाणी किंवा शाळेत लोकांच्या स्पर्धात्मक मनोवृत्तीमुळे, इतरांच्या बरोबरीने स्वतःची लायकी तोलण्याचा मोह.

• तुम्ही जे काही करता त्याला कवडीमोल समजणारी लोकांची प्रवृत्ती.

• आपल्याजवळ असलेल्या गोष्टी दाखवून जळवणारे मित्रजन.

• जीवनाबद्दल तुमच्या मनात असलेल्या महत्त्वाच्या प्रश्‍नांची समाधानकारक उत्तरे न मिळणे.

असे असतानाही जीवनात संतुष्ट असणे खरोखर शक्य आहे का? बायबलमध्ये उल्लेखण्यात आलेल्या प्रेषित पौलाने, “संतुष्ट असण्याचे रहस्य” सांगितले. कधीकधी त्याच्याजवळ भरपूर काही होते आणि इतर वेळी फार कमी. त्याच्या मित्रांनी त्याची प्रशंसा केली तर इतरांनी त्याची थट्टा केली. तरीपण त्याने म्हटले, की “ज्या स्थितीत मी आहे तिच्यात मी स्वावलंबी [संतुष्ट] राहण्यास शिकलो” होतो.—फिलिप्पैकर ४:११, १२.

आहे त्यात संतुष्ट असण्याचा ज्यांनी आजपर्यंत प्रयत्न केला नाही त्यांच्यासाठी, ते एक रहस्य आहे. पण, पौलाने म्हटल्याप्रमाणे आपण आहे त्यात समाधानी राहण्यास शिकू शकतो. आता आम्ही तुम्हाला, देवाचे वचन बायबल यात संतुष्ट राहण्याविषयी सांगितलेल्या पाच रहस्यांवर विचारमंथन करण्यास आमंत्रित करत आहोत. (w१०-E ११/०१)