व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

देवाने दुष्टाईला आणि दुःखाला अनुमती का दिली आहे?

देवाने दुष्टाईला आणि दुःखाला अनुमती का दिली आहे?

देवाच्या वचनातून शिका

देवाने दुष्टाईला आणि दुःखाला अनुमती का दिली आहे?

तुमच्या मनात उद्‌भवलेले प्रश्‍न आणि या प्रश्‍नांची उत्तरे तुम्हाला बायबलमध्ये कोठे पाहायला मिळतील हे या लेखात सांगण्यात आले आहे. यहोवाच्या साक्षीदारांना तुमच्याबरोबर या उत्तरांची चर्चा करण्यास आनंद होईल.

१. दुष्टाईची सुरुवात कधी झाली?

सैतान जेव्हा सर्वात पहिले खोटे बोलला तेव्हा दुष्टाईची सुरुवात झाली. त्याला जेव्हा निर्माण केले गेले होते तेव्हा तो दुष्ट नव्हता. तो परिपूर्ण स्वर्गदूत होता, पण “तो सत्यात टिकला नाही.” (योहान ८:४४) जी उपासना देवाला मिळाली पाहिजे ती उपासना स्वतःला मिळावी अशी इच्छा त्याच्या मनात निर्माण झाली. सैतानाने पहिली स्त्री हव्वा हिला पटवून देण्याचा प्रयत्न केला, की देवाच्या आज्ञेऐवजी तिने त्याची आज्ञा मानावी. आणि या लबाडीवर तिने विश्‍वास ठेवला. आदामसुद्धा यहोवाची आज्ञा न मानण्यास हव्वेबरोबर सामील झाला. आणि आदामाच्या या निर्णयामुळे त्यांच्यावर दुःख आले व मृत्यू ओढवला.—उत्पत्ति ३:१-६, १७-१९ वाचा.

सैतानाने जेव्हा हव्वेला यहोवाची आज्ञा मोडण्यास सुचवले तेव्हा तो, देवाची शासन करण्याची पद्धत योग्य नाही, असे सुचवून त्याच्याविरुद्ध बंड पुकारत होता. त्यानंतर अनेक लोक देवाचे सार्वभौमत्व नाकारून सैतानाला मिळाले आहेत. अशा प्रकारे सैतान “जगाचा अधिकारी” बनला.—योहान १४:३०; प्रकटीकरण १२:९ वाचा.

२. देवाच्या निर्मितीत काही खोट होती का?

देवाने निर्माण केलेल्या मानवांमध्ये आणि देवदूतांमध्ये त्याच्या आज्ञांचे पालन करण्याची पूर्ण योग्यता होती. (अनुवाद ३२:५) चांगले काय आणि वाईट काय यात फरक करण्याचे इच्छास्वातंत्र्य देऊन देवाने आपल्याला निर्माण केले आहे. आणि या स्वातंत्र्यामुळे आपण यहोवावर प्रेम करू शकतो.—याकोब १:१३-१५; १ योहान ५:३ वाचा.

३. देवाने दुःखाला अनुमती का दिली आहे?

आदाम आणि हव्वेने बंड केले तेव्हापासून यहोवा त्याच्या राज्य करण्याच्या पद्धतीचा विरोध सहन करत आहे. का? हे सिद्ध करण्यासाठी की त्याच्या मदतीशिवाय मानवाचे राज्य करण्याचे कोणतेही प्रयत्न सफल होणार नाहीत. (यिर्मया १०:२३) मानवी इतिहासाच्या ६,००० वर्षांदरम्यान या वादाचा निकाल लागला. मानवी नेते युद्ध, दुष्टाई, अन्याय आणि आजारपण काढण्यात पूर्णपणे असफल ठरले आहेत.—उपदेशक ७:२९; ८:९; रोमकर ९:१७ वाचा.

या उलट, जे देवाला शासक म्हणून निवडतात त्यांना फायदा झालेला आहे. (यशया ४८:१७, १८) लवकरात लवकर, यहोवा सर्व मानवी सरकारांचा नाश करणार आहे. फक्‍त यहोवाचे अधिपत्य निवडणाऱ्‍या लोकांना तो या पृथ्वीवर राहू देणार आहे.—यशया २:३, ४; ११:९; दानीएल २:४४ वाचा.

४. यहोवाची सहनशीलता आपल्याला काय संधी देत आहे?

कोणीही यहोवाला एकनिष्ठ राहू शकत नाही असा दावा सैतानाने केला. आतापर्यंत यहोवाने दाखवलेल्या सहनशीलतेमुळे, आपण देवाचे अधिपत्य निवडावे की मानवाचे ही संधी आपल्याला मिळाली आहे. आपण काय निवडले आहे हे आपल्या जीवनशैलीवरून आपण दाखवू शकतो.—ईयोब १:८-११; नीतिसूत्रे २७:११ वाचा.

५. यहोवाचे अधिपत्य आपण कसे निवडू शकतो?

देवाचे वचन बायबल यावर आधारित असणारी खरी उपासना जेव्हा आपण करतो तेव्हा आपण देवाच्या अधिपत्याची निवड केली आहे हे दाखवून देतो. (योहान ४:२३) त्याचबरोबर येशूप्रमाणे आपण, युद्धात आणि राजकारणात भाग घेत नाही.—योहान १७:१४ वाचा.

अनैतिकता व हानिकारक कार्ये वाढवण्याकरता सैतान आपल्या शक्‍तीचा उपयोग करत आहे. आणि आपण जेव्हा या वाईट गोष्टी करण्यास नकार देतो तेव्हा आपले मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक आपली थट्टा करतात किंवा आपली निंदा करतात. (१ पेत्र ४:३, ४) त्यामुळे आता आपल्या पुढे निर्णय घेण्याची वेळ आहे. जे देवावर प्रेम करतात त्यांची संगती आपण करणार का? आपण देवाचे बुद्धिमान व प्रेमळ नियम पाळणार का? असे केल्यास आपण, सैतानाने जो दावा केला होता की देवाचे बोलणे कोणीही ऐकणार नाही, हा खोटा ठरवतो.—१ करिंथकर ६:९, १०; १५:३३ वाचा. (w११-E ०५/०१)

जास्त माहितीसाठी यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केलेल्या बायबल नेमके काय शिकवते? या पुस्तकातील अध्याय ११ पाहा.

[१८ पानांवरील चित्र]

आदामाने वाईट निवड केली

[१९ पानांवरील चित्र]

आपण देवाचे अधिपत्य स्वीकारणार किंवा नाही, हे आपण करत असलेल्या निवडींवरून दिसून येईल