“मी विश्वास धरला आहे”
त्यांच्या विश्वासाचे अनुकरण करा
“मी विश्वास धरला आहे”
मार्थाच्या डोळ्यांसमोर ते चित्र होते. तिच्या भावाला एका गुहेत पुरले होते. आणि गुहेच्या मुखापाशी एक मोठा दगड ठेवला होता. तिच्या दुःखाचे ओझे त्या दगडासारखेच जड आणि भावनाशून्य होते. आपला प्रिय भाऊ लाजर या जगात नाही, यावर तिचा विश्वासच बसत नव्हता. लाजरला जाऊन चार दिवस झाले होते. नातेवाईक, मित्रजन यांची वर्दळ, घरातील ते उदास वातावरण, यामुळे ते चार दिवस खूप थकवणारे होते.
आणि आता येशू मार्थासमोर उभा होता. येशूला बघितल्यावर तिचे दुःख पुन्हा वर आले, कारण जगात फक्त तोच एक असा मनुष्य होता जो लाजरला वाचवू शकला असता. बेथानीच्या डोंगराळ भागातील शहराच्या थोडे बाहेर येशूला पाहून तिला काहीसे हायसे वाटले. त्याच्या डोळ्यांतली ती कणव व सहानुभूती पाहून तिला पुन्हा खूप सांत्वन मिळाले. त्याने तिला विचारलेल्या प्रश्नांमुळे मृतांना पुन्हा जिवंत करण्याच्या बायबलमधील पुनरुत्थानाच्या शिकवणीवरील तिच्या विश्वासावर लक्ष केंद्रित करण्यास मदत तिला मिळाली. येशू आणि मार्था या दोघांमध्ये झालेल्या संभाषणात, मार्थाच्या तोंडून एक अतिशय महत्त्वाची गोष्ट निघाली: “जगात येणारा जो देवाचा पुत्र ख्रिस्त तो आपणच आहा असा मी विश्वास धरला आहे.”—योहान ११:२७.
मार्थाचा विश्वास भक्कम होता. बायबलमध्ये तिच्याबद्दलची थोडकीच माहिती दिलेली आहे. पण या थोडक्या परंतु गहन माहितीवरून आपण आपला विश्वास मजबूत करू शकतो. सर्वात आधी आपण बायबलमध्ये मार्थाबद्दल कोणती माहिती दिली आहे ते पाहूया.
“काळजी व दगदग”
काही महिन्यांआधीची गोष्ट आहे. लाजर तेव्हा जिवंत होता. बेथानी येथील त्याच्या घरी एक खास व्यक्ती, येशू ख्रिस्त येणार होता. लाजर, मार्था आणि मरीया हे तिघे भावंडे होती. हे अनोखे कुटुंब होते. तिघेही एकाच घरात राहत होते. काही संशोधकांचे म्हणणे आहे की मार्था तिघांमध्ये थोरली असावी, कारण तीच पुष्कळदा यजमानीण प्रमाणे वागताना व बायबलमध्ये नेहमी तिचाच पहिल्यांदा उल्लेख केल्याचा आढळतो. (योहान ११:५) तिन्ही भावंडांपैकी कोणाचे लग्न झाले होते किंवा नाही, हे कोणाला माहीत नाही. पण या तिघांशी येशूचा घरोबा होता. यहुदात सेवा करत असताना येशू बहुतेकदा त्यांच्याच घरी राहायचा. येथेच पुष्कळदा लोकांनी त्याचा विरोध केला, ते त्याच्या जीवावर उठले. या तिघांनी त्याला दाखवलेल्या आपुलकीमुळे व आधारामुळे त्याला ते आपलेसे वाटत होते.
लूक ७:४४-४७) पाहुण्याच्या राहण्याची व खाण्याची योग्य काळजी घेतली जायची.
मार्थाचे जास्त लक्ष, घरातल्या कामात होते. ती कष्टाळू होती आणि सतत काही न काही काम करणारी होती. येशू त्यांच्या घरी आला तेव्हाही ती कामातच व्यस्त होती. तिच्या घरी आलेल्या खास पाहुण्यासाठी व त्याच्याबरोबर आलेल्या कदाचित इतर सोबत्यांसाठी तिने पंचपक्वान्ने करायचे ठरवले होते. त्या काळी, आदरातिथ्य दाखवण्याला खूप महत्त्व दिले जायचे. घरी आलेल्या पाहुण्याचे चुंबन घेऊन स्वागत केले जायचे, त्याच्या पायातील जोडे काढून त्याचे पाय धुतले जायचे आणि मग त्याच्या डोक्यावर सुवासिक तेल लावले जायचे; यामुळे घरी आलेल्या पाहुण्याचा थकवा कुठल्या कुठे पळून जायचा. (मार्था आणि मरीया त्यांच्या घरी आलेल्या एका खास पाहुण्याचे आदरातिथ्य करण्यात व्यस्त होत्या. बायबलमध्ये मरीयेबद्दल दिलेल्या वर्णनावरून असे दिसते, की ती अधिक संवेदनशील व विचारी होती. तिने सुरुवातीला आपल्या बहिणीला कामात मदत केली असावी. पण येशू घरी आला तेव्हा घरातले वातावरण बदलले. ही वेळ शिकवण्याची आहे, असे त्याला वाटत असल्यामुळे त्याने लाजरच्या घरी उपस्थित असलेल्यांना शिकवायला सुरुवात केली. तो त्याच्या दिवसांतल्या धार्मिक नेत्यांसारखा नव्हता. तर त्याने स्त्रियांचादेखील आदर केला आणि त्याच्या सेवेचा मुख्य विषय असलेल्या देवाच्या राज्याबद्दलच्या गोष्टी तो त्यांनाही शिकवू लागला. मरीयेला तर हे पाहून खूप आनंद झाला. ती लगेच त्याच्या पायाशी बसून त्याच्या तोंडून निघणारा प्रत्येक शब्द आपल्या हृदयात साठवून ठेवू लागली.
पण इकडे मार्थाच्या मनात जी घालमेल चालली असेल त्याची आपण कल्पना करू शकतो. कारण तिला एकटीलाच इतके सारे पदार्थ बनवावे लागणार होते व पाहुण्यांना हवे नको ते पाहावे लागणार होते. त्यामुळे तिला चिंता वाटू लागली, येशूच्या बोलण्याकडे तिचे लक्ष नव्हते. घरातून ये-जा करताना तिने तिच्या बहिणीला येशूच्या पायाजवळ आरामात बसलेले पाहून तिचा कदाचित जळफळाट झाला असावा का? होय. कारण सर्व काम तिच्या एकटीवर येऊन पडले होते!
मार्थाला आता राहावले नाही. तिने येशूचे बोलणे मध्येच थांबवले आणि ती त्याला म्हणाली: “प्रभुजी, माझ्या बहिणीने माझ्या एकटीवर कामाचा भार टाकला आहे, ह्याची आपल्याला पर्वा नाही काय? मला साहाय्य करावयास तिला सांगा.” (लूक १०:४०) ती खरेच रागात बोलत होती हे तिने येशूला विचारलेल्या प्रश्नावरून कळते. तिने येशूला सांगितले, की त्याने मरीयेला तिची चूक दाखवावी व तिने मला येऊन मदत करावी.
येशूने तिला दिलेले उत्तर ऐकून मार्थाला आश्चर्य वाटले लूक १०:४१, ४२) येशूच्या म्हणण्याचा काय अर्थ होता? मार्था क्षुल्लक गोष्टींचा विचार करत होती, असे त्याला म्हणायचे होते का? ती त्याच्यासाठी इतके चांगले भोजन तयार करत होती तर त्याला तिच्या कष्टाची काहीच किंमत नव्हती का?
असावे आणि जे कोणी बायबलमधील हा अहवाल वाचतात त्यांनाही आश्चर्य वाटते. तो तिला अगदी सौम्य आवाजात म्हणाला: “मार्थे, मार्थे, तू पुष्कळ गोष्टींविषयी काळजी व दगदग करतेस; परंतु थोडक्याच गोष्टींचे किंबहुना एकाच गोष्टीचे अगत्य आहे; मरीयेने चांगला वाटा निवडून घेतला आहे, तो तिच्यापासून काढून घेतला जाणार नाही.” (नाही. मार्थाचे हेतू प्रेमळ व शुद्ध होते, हे येशूला स्पष्टपणे दिसत होते. शिवाय, ती जे पंचपक्वान्ने करत होती त्यात काही चूक आहे, असेही त्याला वाटत नव्हते. कारण, काही काळ आधी तो मत्तयने ठेवलेल्या ‘मोठ्या मेजवानीला’ स्वतःहून गेला होता. (लूक ५:२९) येथे मार्था बनवत असलेल्या पंचपक्वान्नांचा प्रश्न नव्हता तर ती ज्या गोष्टींना प्राधान्य देत होती तो होता. पंचपक्वान्ने बनवण्यात ती इतकी गुंग झाली होती, की महत्त्वाच्या गोष्टींकडे तिचे दुर्लक्ष होत होते. कोणती महत्त्वाची गोष्ट?
यहोवाचा एकुलता एक पुत्र येशू मार्थाच्या घरी सत्य शिकवत होता. या सत्यापुढे, मार्था बनवत असलेले पंचपक्वान्ने आणि बाकीची तयारी कवडी मोलाची होती. आपला विश्वास मजबूत करण्यासाठी मार्थाला मिळत असलेली अनोखी संधी ती गमावत होती हे पाहून येशूला वाईट वाटत होते खरे तरीपण त्याने तिला जबरदस्तीने त्याचे बोलणे ऐकावयास बसवले नाही. कोणत्या गोष्टींना प्राधान्य द्यायचे याची निवड करण्याचा हक्क मार्थाला असला तरी, मरीयेने कोणत्या गोष्टींना महत्त्व दिले पाहिजे याबाबतीत तिने केलेल्या निवडीबद्दल तिला बरे-वाईट म्हणण्याचा अधिकार मात्र नव्हता.
येशूने अगदी प्रेमाने तिची चूक सुधारली. कातावलेल्या मार्थाचे दोनदा नाव घेऊन अगदी सौम्यपणे त्याने तिला शांत केले आणि तिला म्हटले, की तिने ‘पुष्कळ गोष्टींविषयी काळजी व दगदग करू नये.’ आध्यात्मिक मेजवानी असताना, पोटासाठी फक्त एक किंवा दोन पदार्थांचे साधेसे जेवणही पुरेसे होते. अशा प्रकारे त्याने, मरीयेने ‘निवडलेला चांगला वाटा’ अर्थात येशूचे बोलणे ऐकण्याची तिने केलेली निवड तिच्यापासून हिरावून घेतली नाही.
मार्थाच्या घरी घडलेल्या या प्रसंगातून, ख्रिस्ताचे अनुयायी आज बरेच काही शिकू शकतात. आपली ‘आध्यात्मिक गरज’ पूर्ण करताना आपण कोणत्याही गोष्टीला आड येऊ देता कामा नये. (मत्तय ५:३, NW) याचा अर्थ असा होत नाही, की आपण मार्थाप्रमाणे उदार, उद्योगी होऊ नये. तर, आपण तिच्याप्रमाणे, पाहुणचाराच्या बाबींसारख्या कमी महत्त्वाच्या गोष्टींबद्दल इतकी ‘काळजी व दगदग’ करून घेऊ नये; नाहीतर ज्या गोष्टी खरोखरच महत्त्वाच्या आहेत त्यांकडे आपले दुर्लक्ष होईल. आपण आपल्या बंधूभगिनींबरोबर संगती करतो ते फक्त चविष्ट भोजन करायला किंवा द्यायला नव्हे तर, एकमेकांना उत्तेजन द्यायला व आध्यात्मिक वरदानांची देवाण-घेवाण करण्यासाठी करतो. (रोमकर १:११, १२) अशा उभारणीकारक प्रसंगी, साधेसे जेवणही पुरेसे होऊ शकते.
प्रिय भाऊ गमावला जातो व तो पुन्हा मिळतो
येशूने मार्थेची प्रेमळपणे चूक सुधारली तेव्हा तिने ती स्वीकारून त्यातून काही धडा घेतला का? नक्कीच घेतला. कारण, प्रेषित योहानाने मार्थाच्या भावाबद्दलच्या रोमांचकारी अहवालाची सुरुवात करताना असे म्हटले: “मार्था, तिची बहीण व लाजर ह्यांच्यावर येशूची प्रीति होती.” (योहान ११:५) बेथानी येथील मार्थाच्या घरी वर सांगितलेल्या या प्रसंगाला घडून बरेच महिने उलटले होते. मार्था कुढत बसली नव्हती किंवा तिला येशूवर रागही आला नव्हता. उलट त्याने सांगितलेल्या गोष्टी तिने ऐकून घेतल्या. याबाबतीतही तिने आपल्याकरता विश्वासाचे एक उदाहरण मांडले. आणि आपल्यापैकी कोण असा आहे, ज्याला अधूनमधून थोड्याशा सुधारणुकीची आवश्यकता पडत नाही?
लाजर जेव्हा आजारी पडला तेव्हा मार्था त्याची देखभाल करण्यात व्यस्त झाली. त्याचे आजारपण त्याला सुसह्य व्हावे व त्याला बरे वाटावे म्हणून तिने तिच्यापरीने होता होईल ती मदत केली. तरीपण लाजर दिवसेंदिवस खंगत गेला. दिवसागणिक, त्याच्या बहिणी त्याच्या पलंगाशेजारी त्याची काळजी घेत बसल्या होत्या. लाजरचा तो उतरलेला चेहरा पाहून तिला त्यांचे पूर्वीचे दिवस आठवत असावेत जेव्हा त्यांनी सुखा-दुखात एकमेकांना दिलासा दिला होता.
लाजरची तब्येत अधिकाधिक बिघडतच चालली आहे असे जेव्हा मार्थाला आणि मरीयेला जाणवले तेव्हा त्यांनी येशूला लाजरला येऊन पाहावे, असा संदेश पाठवला. तो त्यांच्या घरापासून दोन दिवसांचे अंतर असलेल्या एका ठिकाणी प्रचार करत होता. त्यांनी फक्त इतका संदेश पाठवला होता: “प्रभुजी, योहान ११:१, ३) येशूचे लाजरवर प्रेम होते आणि त्याला बरे करण्याची येशूजवळ ताकद होती, हा विश्वास त्यांच्याजवळ होता. लाजरचे बरे-वाईट होण्याआधी येशू तिथे येईल, अशी त्यांना आशा होती. पण तसे झाले नाही. आणि लाजर मरण पावला.
ज्याच्यावर तुमचे प्रेम आहे तो आजारी आहे.” (मार्थाला आणि मरीयेला त्यांचे दुःख अनावर झाले. पण त्या त्यांच्या दुःखातून सावरल्या आणि लाजरच्या अंत्यविधीच्या तयारीला लागल्या. बेथानी व आसपासच्या गावांहून आलेल्या नातेवाईकांना व मित्रजनांना हवे-नको ते त्यांनी पाहिले. तरीपण येशूचा काही पत्ता नव्हता. जसजसे दिवस सरत चालले होते तसतसे मार्थाला, येशू अजून का आला नाही ते कळत नव्हते. लाजरला मरून चार दिवस झाल्यानंतर मार्थेने, येशू गावाजवळ आल्याची बातमी ऐकली. एक ठिकाणी शांत न बसणारी ही स्त्री, या दुःखद प्रसंगीसुद्धा मरीयेला काही न सांगता येशूला भेटायला लगबगीने निघाली.—योहान ११:२०.
आपल्या प्रभूला पाहिल्याबरोबर तिने, तिला व मरीयेला नकोसे करणारे विचार एकदाचे बोलून दाखवले. ती त्याला म्हणाली: “प्रभुजी, आपण येथे असता तर माझा भाऊ मेला नसता.” मार्थाचा विश्वास व तिची आशा अजूनही जिवंत होती. ती त्याला पुढे म्हणाली: “तरी आताही जे काही आपण देवाजवळ मागाल ते देव आपल्याला देईल, हे मला ठाऊक आहे.” तिची आशा पक्की करण्यासाठी येशू तिला म्हणाला: “तुझा भाऊ पुन्हा उठेल.”—योहान ११:२१-२३.
भविष्यात होणाऱ्या पुनरुत्थानाबद्दल येशू बोलत आहे, असे समजून ती त्याला म्हणाली: “तो शेवटल्या दिवशी पुनरुत्थानसमयी पुन्हा उठेल हे मला ठाऊक आहे.” (योहान ११:२४) मेलेल्या लोकांना पुन्हा जिवंत केले जाईल, या बायबलमधील शिकवणीवर तिचा विश्वास उल्लेखनीय होता. पण, सदुकी म्हटल्या जाणाऱ्या काही यहुदी धार्मिक नेत्यांचा या शिकवणीवर विश्वास नव्हता. देवाच्या प्रेरित वचनांत ही शिकवण इतकी स्पष्टपणे दिलेली असूनही ते ती अमान्य करत होते. (दानीएल १२:१३; मार्क १२:१८) परंतु येशूने पुनरुत्थानाच्या आशेची शिकवण दिली होती, इतकेच नव्हे तर त्याने मेलेल्या काहींना पुन्हा जिवंतही केले होते हे मार्थाला माहीत होते. त्याने ज्यांना पुन्हा जिवंत केले होते त्यांना लाजरप्रमाणे मरून खूप दिवस झाले नव्हते. पण आता येशू काय करणार आहे हे मार्थाला माहीत नव्हते.
येशूने मग एक अविस्मरणीय वाक्य बोलून दाखवले. तो म्हणाला: “पुनरुत्थान व जीवन मीच आहे.” होय, भवितव्यात संपूर्ण पृथ्वीवरील मृत जनांना पुन्हा जिवंत करण्याचा अधिकार यहोवा देवाने आपल्या पुत्राला दिला आहे. येशूने मार्थाला विचारले: “तू खरे मानतेस काय?” तेव्हा तिने, या लेखाच्या सुरुवातीला आपण ज्याची चर्चा केली होती ते उत्तर दिले. येशू, ख्रिस्त किंवा मशीहा आहे, तो यहोवा देवाचा पुत्र आहे आणि जो या जगात येणार असल्याचे संदेष्ट्यांनी भाकीत केले होते, यावर तिचा विश्वास होता.—योहान ५:२८, २९; ११:२५-२७.
असा विश्वास दाखवणाऱ्यांना यहोवा देव आणि त्याचा पुत्र काही प्रतिफळ देणार आहे का? मार्थाने आपल्या डोळ्यांनी जे काही होताना पाहिले त्यावरून आपल्याला या प्रश्नाचे उत्तर मिळते. मार्था लगबगीने आपल्या बहिणीला, मरीयेला बोलवायला गेली. त्यानंतर, येशू जेव्हा मरीयेबरोबर आणि तिच्याबरोबर असलेल्या इतरांबरोबर बोलत होता तेव्हा त्याचेही मन भरून आल्याचे तिने पाहिले. मृत्यूमुळे एखाद्यावर दुःखाचा जो डोंगर कोसळतो त्यामुळे ती व्यक्ती किती खचून जाते हे पाहून त्यालाही रडू आवरले नाही. येशूने मग लोकांना, लाजरच्या कबरेजवळ लावलेला मोठा दगड बाजूला सारण्यास सांगितल्याचे तिने ऐकले.—योहान ११:२८-३९.
पण मार्थाला वेगळीच काळजी होती. लाजरला जाऊन चार दिवस झाले होते व आता त्याचे शरीर कुजू लागले असावे आणि सर्वत्र दुर्गंधी पसरेल अशी तिला भीती वाटत होती म्हणून तिने त्याला अडवण्याचा प्रयत्न केला. पण येशूने तिला एका गोष्टीची आठवण करून देत म्हटले: “तू विश्वास ठेवशील तर देवाचे गौरव पाहशील असे मी तुला सांगितले नव्हते काय?” तिने येशूवर विश्वास ठेवला होता आणि देवाचे गौरव खरोखरच पाहिले. तिथल्या तिथे यहोवाने आपल्या पुत्राला, लाजरला पुन्हा जिवंत करण्याची शक्ती दिली! त्या क्षणी मार्थाने जे काही पाहिले असावे ते ती मरेपर्यंत विसरली नसावी! “लाजरा, बाहेर ये” अशी येशूने मोठ्याने हाक मारल्याचे, लाजर जेव्हा उठून हळूहळू गुहेच्या दारापर्यंत चालत येत असताना होत असलेला तो फिकट आवाज, संपूर्ण अंगभर पट्ट्या बांधलेल्या अवस्थेत लाजरचे गुहेच्या दारापर्यंतचे ते चालत येणे, त्यानंतर येशूने लोकांना, “ह्याला मोकळे करुन जाऊ द्या,” असे म्हणणे आणि अत्यानंदाने मार्थाने व मरीयेने आपल्या भावाला मारलेली मिठी, या सर्व घटना ती कधीच विसरली नसावी. (योहान ११:४०-४४) मार्थाचे मन आता हलके झाले.
मृत लोकांना पुन्हा जिवंत केले जाईल, हे केवळ एक स्वप्न नव्हे तर बायबलमधील एक प्रेमळ शिकवण आहे आणि ऐतिहासिकरीत्या सिद्ध झालेली गोष्ट आहे. मार्था, मरीया आणि लाजर प्रमाणे जे विश्वास दाखवतात त्यांना प्रतिफळ देण्यास यहोवाला आणि त्याच्या पुत्राला खूप आनंद होतो. तुम्हीदेखील तुमचा विश्वास मार्थाच्या विश्वासाप्रमाणे भक्कम केलात तर यहोवा देवाने व येशूने तुमच्यासाठीसुद्धा अशीच प्रतिफळे राखून ठेवली आहेत.“मार्था वाढीत होती”
बायबलमध्ये मार्थाचा आणखी एकदाच उल्लेख आढळतो. पृथ्वीवरील येशूच्या जीवनाच्या शेवटल्या आठवड्यादरम्यानच्या घटनेच्या संदर्भात तो उल्लेख आहे. आपल्याला कोणकोणत्या संकटांचा सामना करावा लागणार आहे याची येशूला चांगल्या प्रकारे जाणीव होती. तो पुन्हा एकदा बेथानी येथील त्याच्या आवडत्या ठिकाणी आला होता. तेथून तो तीन किलोमीटर दूर असलेल्या जेरुसलेमला पायी चालत जाणार होता. असेच एकदा, येशू व लाजर, कुष्ठरोगी शिमोन याच्या घरी जेवत बसले होते तेव्हा, “मार्था वाढीत होती,” हा तिच्याबद्दलचा शेवटला उल्लेख आपण वाचतो.—योहान १२:२.
मार्था खरोखरच उद्योगी होती. बायबलमध्ये आपण पहिल्यांदा तिच्याबद्दल वाचतो तेव्हा ती कामात होती. तिच्याबद्दलचा शेवटला उल्लेख वाचतो तेव्हाही ती, लोकांचा पाहुणचार करण्यात व्यस्त होती. आज, ख्रिस्ताच्या अनुयायांच्या मंडळ्यांमध्ये मार्थासारख्या मेहनती स्त्रिया आहेत. त्या कष्टाळू, उदार आहेत आणि इतरांसाठी खपून आपला विश्वास आपल्या कार्यांद्वारे व्यक्त करतात. मार्थाने शेवटपर्यंत तेच केले. पण मार्थाला पुढे अडचणींचा सामना करावा लागणार होता.
काही दिवसातच मार्थाला, तिचा प्रिय प्रभू येशू याच्या मृत्यूचा धक्का सहन करावा लागणार होता. शिवाय, ज्यांनी येशूला ठार मारले होते ते ढोंगी लोक लाजरलाही ठार मारण्याचा कट रचत होते कारण, मेलेल्यांतून त्याला जिवंत केल्यानंतर पुष्कळ लोक येशूवर विश्वास ठेवू लागले होते. (योहान १२:९-११) आणि कालांतराने, मृत्यू मार्थाला तिच्या प्रिय बहीण-भावापासून विभक्त करणारच होता. ते कधी व कसे झाले याबद्दलची माहिती आपल्याजवळ नाही. पण आपण ही पक्की खात्री बाळगू शकतो, की मार्थाच्या अनमोल विश्वासाने तिला शेवटपर्यंत टिकून राहायला मदत केली असावी. आणि म्हणूनच आज खरे ख्रिस्ती तिच्या विश्वासाचे अनुकरण करतात. (w११-E ०४/०१)
[तळटीप]
^ मृत लोकांना पुन्हा जिवंत केले जाईल, या बायबलमधील शिकवणीबद्दल तुम्हाला अधिक शिकून घ्यायचे असेल तर यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केलेले, बायबल नेमके काय शिकवते या पुस्तकाचा ७वा अध्याय पाहा.
[२३ पानांवरील चित्र]
मार्थाला दुःख झाले होते तरीसुद्धा तिने, येशूने जेव्हा तिला, विश्वास मजबूत करणाऱ्या विषयांवर तिचे लक्ष केंद्रित करण्यास मदत केली तेव्हा तिने ती मदत स्वीकारली
[२४ पानांवरील चित्र]
मार्था तू खूप ‘काळजी व दगदग’ करत आहेस असे बोलून जेव्हा येशूने तिची चूक दाखवली तेव्हा तिने ती मान्य केली
[२७ पानांवरील चित्र]
येशूने मार्थाला तिच्या विश्वासाचे प्रतिफळ दिले; त्याने तिच्या भावाला पुन्हा जिवंत केले