व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

खरी उपासना कशी ओळखावी?

खरी उपासना कशी ओळखावी?

देवाच्या वचनातून शिका

खरी उपासना कशी ओळखावी?

तुमच्या मनात उद्‌भवलेले प्रश्‍न आणि या प्रश्‍नांची उत्तरे तुम्हाला बायबलमध्ये कोठे पाहायला मिळतील हे या लेखात सांगण्यात आले आहे. यहोवाच्या साक्षीदारांना तुमच्याबरोबर या उत्तरांची चर्चा करण्यास आनंद होईल.

१. एकच खरा धर्म आहे का?

येशूने आपल्या अनुयायांना एकाच धर्माची अर्थात खऱ्‍या धर्माची शिकवण दिली. हा धर्म जीवनाकडे नेणाऱ्‍या मार्गासारखा आहे. त्या मार्गाविषयी येशूने असे म्हटले: “ज्यांना तो सापडतो ते थोडके आहेत.” (मत्तय ७:१४) देव त्याच्या सत्य वचनावर आधारित असलेली उपासनाच केवळ स्वीकारतो. सर्व खऱ्‍या उपासकांचा एकच धार्मिक विश्‍वास असतो.—योहान ४:२३, २४; १४:६; इफिसकर ४:४, ५ वाचा.

२. इतके वेगवेगळे धर्म ख्रिस्ती असल्याचा दावा का करतात?

खोट्या संदेष्ट्यांनी खऱ्‍या ख्रिस्ती धर्माला भ्रष्ट केले आहे आणि स्वतःच्या स्वार्थासाठी त्याचा उपयोग केला आहे. येशूने यांच्याविषयी भाकीत केले होते. हे खोटे संदेष्टे स्वतःला “मेंढरे” असल्याचे भासवतात परंतु वास्तविकतेत ते भुकेलेल्या लांडग्यांसारखे वागतात. (मत्तय ७:१३-१५, २१, २३) येशूच्या प्रेषितांच्या मृत्यूनंतर खासकरून खोटा ख्रिस्ती धर्म वाढला.—प्रेषितांची कृत्ये २०:२९, ३० वाचा.

३. खऱ्‍या उपासनेची काही वैशिष्ट्ये कोणती आहेत?

खरे उपासक, बायबल हे देवाचे वचन आहे असे मानतात, त्याचा आदर करतात. बायबलमधील तत्त्वांनुसार ते जगायचा प्रयत्न करतात. त्यामुळे खरा धर्म हा मानवांच्या कल्पनांवर आधारित असलेल्या धर्मापासून वेगळा आहे. (मत्तय १५:७-९) खरे उपासक इतरांना जे सांगतात त्यानुसार वागतातही.—योहान १७:१७; २ तीमथ्य ३:१६, १७ वाचा.

खरा धर्म देवाचे नाव यहोवा याचा सन्मान करतो. येशूने लोकांना देवाचे नाव सांगितले. त्याने लोकांना देवाला ओळखण्यास मदत केली व देवाचे नाव पवित्र व्हावे, अशी प्रार्थना करायला शिकवले. (मत्तय ६:९) तुम्ही जेथे राहता तेथे, कोणता धर्म देवाच्या नावाचा वापर करण्याचे उत्तेजन देतो?—योहान १७:२६; रोमकर १०:१३, १४ वाचा.

४. खऱ्‍या उपासकांना तुम्ही कसे ओळखू शकता?

खरे उपासक देवाच्या राज्याबद्दल लोकांना सांगतात. देवाने येशूला राज्याबद्दल लोकांना सांगायला पृथ्वीवर पाठवले होते. देवाचे राज्यच केवळ मानवजातीच्या समस्यांचे निरसन करणार आहे. येशूचा मृत्यू झाला अगदी त्या दिवसापर्यंत तो या राज्याविषयी बोलत राहिला. (लूक ४:४३; ८:१; २३:४२, ४३) त्याने आपल्या अनुयायांना या राज्याविषयीची माहिती लोकांना द्यायला सांगितले. देवाच्या राज्याविषयी सांगायला एखादी व्यक्‍ती तुमच्याकडे आली तर ती शक्यतो कोणत्या धर्माची असावी?मत्तय १०:७; २४:१४ वाचा.

येशूचे अनुयायी या दुष्ट जगाचे भाग नसतात. ते राजकारणात किंवा कोणत्याही प्रकारच्या सामाजिक झगड्यांत पडत नाहीत. (योहान १७:१६) शिवाय ते जगातील हानिकारक प्रथा व वृत्तीदेखील आचरत नाहीत.याकोब १:२७; ४:४ वाचा.

५. खऱ्‍या ख्रिस्ती धर्माचे मुख्य ओळखचिन्ह काय आहे?

खरे ख्रिस्ती एकमेकांवर मनापासून प्रेम करतात हे स्पष्टपणे दिसून येते. ते सर्व जातीधर्माच्या लोकांचा आदर करण्याचे देवाच्या वचनातून शिकतात. खोट्या धर्माने राष्ट्रांच्या युद्धांना बरेचदा पूर्ण पाठिंबा दिला आहे परंतु खऱ्‍या उपासकांनी मात्र याला साफ नकार दिला आहे. (मीखा ४:१-४) खऱ्‍या धर्माचे सदस्य कोणत्याही मोबदल्याविना, इतरांना मदत करण्यासाठी व उत्तेजन देण्यासाठी आपल्या वेळेचा व साधनांचा उपयोग करतात.योहान १३:३४, ३५; १ योहान ४:२०, २१ वाचा.

कोणता धर्म, देवाच्या वचनावर आधारित शिकवण देतो, देवाच्या नावाचा आदर करतो व मानवजातीच्या समस्यांवर फक्‍त देवाचे राज्यच एकमात्र उपाय आहे, असे सांगतो? कोणत्या धर्माच्या सदस्यांमध्ये प्रेम आहे व ते युद्धाला पाठबळ देत नाहीत? केवळ यहोवाचे साक्षीदारच असे करतात, हे वस्तुस्थितीवरून दिसून येते.—१ योहान ३:१०-१२. (w११-E ०८/०१)

जास्त माहितीसाठी यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केलेल्या या पुस्तकातील अध्याय १५ पाहा. बायबल नेमके काय शिकवते?

[१६ पानांवरील चित्र]

“आपण देवाला ओळखतो असे ते बोलून दाखवतात; परंतु कृतींनी त्याला नाकारतात.”—तीत १:१६.