व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

देवाच्या आज्ञा आपल्यासाठी फायदेकारक कशा ठरतात?

देवाच्या आज्ञा आपल्यासाठी फायदेकारक कशा ठरतात?

देवाच्या वचनातून शिका

देवाच्या आज्ञा आपल्यासाठी फायदेकारक कशा ठरतात?

तुमच्या मनात उद्‌भवलेले प्रश्‍न आणि या प्रश्‍नांची उत्तरे तुम्हाला बायबलमध्ये कोठे वाचायला मिळतील हे या लेखात सांगितले आहे. यहोवाच्या साक्षीदारांना तुमच्याबरोबर या उत्तरांची चर्चा करण्यास आनंद होईल.

१. आपण देवाच्या आज्ञांचे पालन का केले पाहिजे?

देवाने आपली निर्मिती केली आहे म्हणून त्याची आज्ञा मानणे योग्यच आहे. येशूही नेहमी देवाला आज्ञाधारक राहिला. (योहान ६:३८; प्रकटीकरण ४:११) देवाच्या आज्ञांचे पालन करण्याद्वारे आपण दाखवून देतो की आपले त्याच्यावर प्रेम आहे.—१ योहान ५:३ वाचा.

देवाच्या सर्व आज्ञा आपल्या भल्यासाठीच आहेत. त्या आपल्याला आत्ता उत्तम जीवन जगण्यास आणि त्याचबरोबर भविष्यातील सार्वकालिक आशीर्वाद कसे मिळवता येतील ते शिकवतात.—स्तोत्र १९:७, ११; यशया ४८:१७, १८ वाचा.

२. आपल्या आरोग्यासाठी देवाच्या आज्ञा फायदेकारक कशा ठरतात?

दारूबाजी करणे देवाच्या आज्ञेविरुद्ध आहे. या आज्ञेचे पालन केल्यामुळे आपले जीवघेण्या आजारांपासून आणि अपघातांपासून संरक्षण होते. अतिमद्यपान केल्यामुळे व्यसन जडते आणि व्यक्‍ती अविचारीपणे वागू लागते. (नीतिसूत्रे २३:२०, २९, ३०) मद्यपान करण्यास यहोवा अनुमती तर देतो पण फक्‍त माफक प्रमाणात.—स्तोत्र १०४:१५; १ करिंथकर ६:१० वाचा.

यहोवा आपल्याला ईर्ष्या, अनियंत्रित राग व अशा इतर विनाशकारी प्रवृत्तींसंबंधी ताकीद देतो. आपण जितके जास्त त्याच्या आज्ञांचे पालन करू तितकेच ते आपल्या आरोग्यासाठी फायद्याचे ठरेल.—नीतिसूत्रे १४:३०; २२:२४, २५ वाचा.

३. देवाच्या आज्ञेमुळे आपले संरक्षण कसे होते?

देवाचे वचन विवाहबाह्‍य शारीरिक संबंधाचा निषेध करते. (इब्री लोकांस १३:४) जे विवाहित जोडपे या आज्ञेचे पालन करतात ते आपल्या विवाहात सुरक्षा अनुभवतात आणि मुलांसाठीही चांगले वातावरण निर्माण होते. पण याउलट, विवाहबाह्‍य संबंधांमुळे रोग, घटस्फोट, हिंसा, मानसिक त्रास आणि एकटे पालकत्व अशा असंख्य समस्या उद्‌भवतात.—नीतिसूत्रे ५:१-९ वाचा.

विवाहबाह्‍य संबंधाचा मोह होईल अशी परिस्थिती टाळण्याद्वारे आपण देवासोबत असणाऱ्‍या आपल्या मैत्रीचे संरक्षण करतो; तसेच असे करण्याद्वारे इतरांचे नुकसानही करत नाही.—१ थेस्सलनीकाकर ४:३-६ वाचा.

४. जीवनाचा आदर केल्याने आपल्याला कसा फायदा होतो?

देवाने दिलेल्या जीवनाच्या देणगीचा आदर करणारे लोक धूम्रपान आणि जीवघेण्या सवयी सोडतात तेव्हा त्यांच्या आरोग्याला फायदा होतो. (२ करिंथकर ७:१) मूळ इब्री भाषेत निर्गम २१:२२, २३ ही वचने दाखवून देतात, की देवाच्या नजरेत गर्भाशयात वाढणाऱ्‍या मुलाचे जीवनही अनमोल आहे. तेव्हा आपण जाणूनबुजून न जन्मलेल्या मुलाची हत्या करू नये. तसेच जीवनाबद्दल असलेल्या देवाच्या दृष्टिकोनाचा आदर करणारे लोक कामाच्या ठिकाणी, घरी, आणि वाहनाचा उपयोग करताना सुरक्षा नियमांचे पालन करतात. (अनुवाद २२:८) तसेच, जीवन हे देवाकडून मिळालेली देणगी असल्यामुळे ते जीवघेण्या खेळांमध्ये सहभाग घेत नाहीत.—स्तोत्र ३६:९ वाचा.

५. रक्‍ताच्या पवित्रतेमुळे आपल्याला कसा फायदा होतो?

रक्‍त पवित्र आहे कारण देवाने म्हटले आहे की ते प्राणीमात्रांच्या जीवनाला, प्राणाला सूचित करते. (उत्पत्ति ९:३, ४) देवाच्या नियमानुसार रक्‍ताला जीवनाइतकेच महत्त्व आहे आणि त्यामुळे आपल्याला फायदाच होतो. तो कसा? या नियमामुळे पापांची क्षमा मिळणे शक्य होते.—लेवीय १७:११-१३; इब्री लोकांस ९:२२ वाचा.

खासकरून येशूचे रक्‍त मौल्यवान होते कारण तो परिपूर्ण होता. येशूने देवाला अर्पण केलेले त्याचे रक्‍त त्याच्या जीवनाला सूचित करते. (इब्री लोकांस ९:१२) त्याच्या बलिदानामुळे आपल्याला सार्वकालिक जीवन मिळणे शक्य झाले.—मत्तय २६:२८; योहान ३:१६ वाचा. (w११-E ११/०१)

जास्त माहितीसाठी यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केलेल्या या पुस्तकातील अध्याय १२ आणि १३ पाहा. बायबल नेमके काय शिकवते?