आपल्या मुलांना शिकवा
देवाला वाईट वाटतं—आपण त्याला कसं खूश करू शकतो?
तुला कोणीतरी खूप दुखावलंय आणि तू रडलास असं कधी झालं का?— * आपल्या सगळ्यांच्याच बाबतीत असं झालं आहे. आपलं मन दुखावलं जातं तेव्हा आपण रडतो. कोणीतरी आपल्याबद्दल खोटं बोलतो. तेव्हा आपल्याला वाईट वाटतं, होय ना?— देवालासुद्धा वाईट वाटतं जेव्हा त्याच्याबद्दल खोटं बोललं जातं. तर चल आपण याच्याविषयी बोलू या आणि पाहू या की देवाला दुखवण्याऐवजी आपण त्याला खूश कसं करू शकतो.
बायबल सांगते की, देवावर प्रेम आहे असं म्हणणाऱ्या काही लोकांनीसुद्धा देवाला “दुःख दिले.” होय, त्यांनी देवाचं मन दुखावलं! मग आपण बघूया की यहोवानं सांगितल्याप्रमाणं आपण करत नाही तेव्हा त्याला वाईट का वाटतं.
देवानं पृथ्वीवर बनवलेल्या पहिल्या दोन मानवांनीच त्याला खूप दुखावलं. त्या दोघांना पृथ्वीवरील नंदनवनात ठेवलं होतं. यालाच “एदेन” बाग म्हणतात. ती दोघं कोण होती बरं?—बरोबर, आदाम आणि नंतर बनवलेली हव्वा. चल बघूया, त्यांनी काय केलं ज्यामुळं यहोवाचं मन दुखावलं.
बागेत ठेवल्यानंतर देवानं त्यांना बागेची काळजी घेण्यास सांगितलं. तसंच, त्यांना हेपण सांगितलं की त्यांना मुलं होतील आणि ते न मरता या बागेत एकत्र राहू शकतील. पण, आदाम आणि हव्वेला मुलं होण्याआधीच एक भयानक गोष्ट घडली. तुला माहीत आहे, काय होती ती?— एका देवदूतानं हव्वेला आणि नंतर आदामाला यहोवाविरुद्ध बंड करण्यास लावलं. हे सगळं कसं घडलं ते बघूया.
तो देवदूत साप बोलत असल्याचं भासवून तिच्याशी बोलला. सापानं तिला सांगितलं की ती देवासारखी होईल, हे हव्वेला फार आवडलं. त्यामुळं तिनं तेच केलं जे सापानं तिला करायला सांगितलं. तुला माहीतंय त्यानं काय करायला सांगितलं?—
यहोवानं आदामाला ज्या झाडाचं फळ खाऊ नका असं सांगितलं होतं त्या झाडाचं फळ हव्वेनं खाल्लं. हव्वेला बनवण्याआधी यहोवानं आदामाला असं सांगितलं होतं: “बागेतील वाटेल त्या झाडाचे फळ यथेच्छ खा; पण बऱ्यावाइटाचे ज्ञान करून देणाऱ्या झाडाचे फळ खाऊ नको; कारण ज्या दिवशी त्याचे फळ तू खाशील त्या दिवशी तू खास मरशील.”
हव्वेला देवाची ही आज्ञा माहीत होती. तरीपण ती त्या झाडाकडं पाहतच राहिली आणि त्या झाडाचं फळ खाण्यास चांगलं, दिसण्यास मनोहर आहे असं तिला दिसून आलं तेव्हा तिनं त्याचं फळ काढून खाल्लं. नंतर तिनं ते आदामालाही दिलं आणि “त्याने ते खाल्ले.” तुला काय वाटतंय त्यानं तसं का केलं?—आदामाचं यहोवापेक्षा हव्वेवर जास्त प्रेम होतं. त्यानं यहोवाला खूश करण्याऐवजी तिला खूश करण्याचं निवडलं. पण, दुसऱ्या कोणाचीही आज्ञा मानण्यापेक्षा यहोवाची आज्ञा मानणं सर्वात महत्त्वाचं आहे.
तुला तो साप आठवतो का जो हव्वेशी बोलला होता? एखादा मनुष्य जसं कळसूत्री बाहुली बोलत असल्याचं भासवू शकतो तसंच कोणीतरी साप बोलत असल्याचं भासवलं. सापाच्या पाठीमागून कोणाचा आवाज होता बरं?—तो आवाज “जुनाट साप” म्हणजे ज्याला “दियाबल व सैतान” म्हटलं आहे त्याचा होता.
तुला माहीतंय तू यहोवाला खूश कसं करू शकतोस?—तू नेहमी यहोवाच्या आज्ञांचं पालन करण्याचा प्रयत्न करून त्याला खूश करू शकतोस. सैतान असं म्हणतो की तो कोणालाही त्याच्या इच्छेनुसार वागण्यास लावू शकतो. म्हणून यहोवा आपल्याला सांगतो: “माझ्या मुला [किंवा मुली], सुज्ञ होऊन माझे मन आनंदित कर, म्हणजे माझी निंदा करणाऱ्यांस मी प्रत्युत्तर देईन.” सैतान यहोवाला टोमणे मारतो किंवा त्याची थट्टा करतो. तो म्हणतो की तो यहोवाची सेवा करण्यापासून सर्वांना वळवू शकतो. त्यामुळं यहोवाची सेवा करून आणि त्याच्या आज्ञा पाळून त्याला खूश कर. असं करण्यासाठी तू मेहनत घेशील का?—▪ (w१३-E ०९/०१)
तुझ्या बायबलमधून वाच
^ तुम्ही हा लेख आपल्या मुलाला वाचून दाखवत असाल तर, जेव्हा वाक्यांच्या पुढे एक छोटीशी रेघ तुम्हाला दिसते तेव्हा तेथे थांबून तुमच्या मुलाला काय वाटते ते त्याला विचारा.