व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

मुख्य विषय | तुम्ही देवाचे मित्र बनू शकता

यापेक्षा चांगली मैत्री असूच शकत नाही!

यापेक्षा चांगली मैत्री असूच शकत नाही!

देवाशी मैत्री करण्यासाठी तुम्ही काय करू शकता? देवाशी घनिष्ठ मैत्री कशी करता येईल याचे काही मार्ग आपण पाहिले. ते म्हणजे:

  1. यहोवा हे देवाचे नाव जाणून घ्या आणि त्याचा उपयोग करा.

  2. नियमित प्रार्थना करण्याद्वारे व त्याचे वचन बायबल याचा अभ्यास करण्याद्वारे त्याच्याशी संवाद साधा.

  3. त्याला आनंद होईल अशा गोष्टी करत राहा.

देवाच्या नावाचा उपयोग करण्याद्वारे; त्याला प्रार्थना करण्याद्वारे; त्याच्या वचनाचा अभ्यास करण्याद्वारे आणि त्याला आनंद होईल अशा गोष्टी करण्याद्वारे त्याच्याशी घनिष्ठ मैत्री करा

देवाशी मैत्री करण्यास आवश्यक असलेल्या या गोष्टी तुम्ही करत आहात का, की तुम्हाला कुठे सुधारणा करायची आहे? असल्यास, त्यासाठी मेहनतीची गरज आहे. पण, त्यामुळे किती चांगले परिणाम घडून येतील याचा विचार करा.

अमेरिकेतील, जेनीफर नावाची स्त्री म्हणते: “देवाशी मैत्री करण्यासाठी आपण जे काही प्रयत्न करू ते कधीच व्यर्थ जाणार नाहीत. या मैत्रीमुळं अनेक आशीर्वाद मिळतात: देवावरचा आपला भरवसा वाढतो, एक व्यक्ती या नात्यानं आपण त्याला आणखी चांगल्या प्रकारे ओळखतो. पण, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, त्याच्यावरचं आपलं प्रेम वाढतं. यापेक्षा चांगली मैत्री असूच शकत नाही!”

तुम्हालाही देवाशी मैत्री करायची असेल, तर तुम्हाला मदत करण्यास यहोवाच्या साक्षीदारांना आनंदच होईल. ते तुमच्यासोबत मोफत बायबल अभ्यास करू शकतील. त्यांच्या राज्य सभागृहात होणाऱ्या बायबलच्या सभांनाही तुम्ही उपस्थित राहू शकता. तेथे, देवासोबतच्या मैत्रीला अनमोल समजणाऱ्या लोकांसोबत सहवास करण्याची सुसंधी तुम्हाला मिळेल. * मग, तुमच्याही भावना स्तोत्रकर्त्यासारख्याच असतील: “माझ्याविषयी म्हटले तर देवाजवळ जाणे यातच माझे कल्याण आहे.”—स्तोत्र ७३:२८. ▪ (w14-E 12/01)

^ परि. 9 तुम्हाला बायबल अभ्यास हवा असेल किंवा जवळच्या राज्य सभागृहाचा पत्ता जाणून घ्यायचा असेल तर ज्यांनी तुम्हाला हे नियतकालिक दिले त्यांच्याशी बोला किंवा www.pr418.com/mr या आमच्या वेबसाईटला भेट द्या आणि ‘होम’ पेजखाली, ‘आमच्याशी संपर्क साधा’ या मथळ्याखाली पाहा.