व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

मुख्य विषय | चिंता! चिंता! चिंता!—कशी मात कराल यांच्यावर?

कुटुंबाच्या चिंता

कुटुंबाच्या चिंता

“माझ्या वडिलांचं नुकतंच निधन झालं होतं. त्या दुःखातून मी सावरते न्‌ सावरते तोच, माझ्या नवऱ्यानं माझ्या मनावर आणखी एक घाला घातला. त्यानं मला सांगितलं, की त्याचे दुसऱ्या एका स्त्रीबरोबर संबंध आहेत. त्यानंतर अचानक एकदा त्यानं स्वतःचं सामान-सुमान गोळा केलं आणि तो मला व माझ्या दोन लहान मुलांना वाऱ्यावर सोडून गेला.” हा जॅनेटचा अनुभव. या दुःखद घटनेनंतर तिनं एक नोकरी शोधली. पण त्यात ती घराचे हफ्ते फेडू शकत नव्हती. तिला फक्त पैशांचीच चणचण भासत नव्हती तर बाकीच्या अनेक गोष्टींचीसुद्धा चिंता होती. ती आठवून सांगते: “आता मी सर्व जबाबदाऱ्या एकटी सांभाळते. पण तेच सुरुवातीला मला काहीच समजत नव्हतं. पालक या नात्यानं मी माझ्या मुलांच्या सर्व गरजा पूर्ण करत नाहीए, या विचारानं माझं मन खात होतं. आत्ताही मला, वेगवेगळ्या गोष्टींची चिंता वाटते. लोक माझ्याबद्दल, माझ्या मुलांबद्दल काय विचार करत असतील? माझं कुटुंब वाचवण्यासाठी मी हवा तितका प्रयत्न केला नाही, असा ते विचार करत असतील का? वगैरे वगैरे.”

जॅनेट

प्रार्थना आणि देवाबरोबर घनिष्ठ नातेसंबंध असल्यामुळं जॅनेट आपल्या भावनांवर ताबा ठेवू शकली. ती म्हणते: “रात्रीची वेळ सर्वात कठीण असते. कारण, एकतर सर्वत्र शांतता असते आणि तेव्हाच मला माझ्या चिंता जास्त सतावतात. पण मी लगेच प्रार्थना करते आणि बायबल वाचते. तेव्हाच कुठं मला झोप लागते. बायबलमधील फिलिप्पैकर ४:६, ७ ही माझी आवडती वचनं आहेत. त्यात म्हटलं आहे: ‘कशाविषयीही चिंताक्रांत होऊ नका तर सर्व गोष्टींविषयी प्रार्थना व विनंती करून आभारप्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा; म्हणजे सर्व बुद्धिसामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाने दिलेली शांती तुमची अंतःकरणे व तुमचे विचार . . . राखेल.’ मी कित्येक रात्री प्रार्थना करण्यात घालवल्या आहेत आणि यहोवाची शांती अनुभवली आहे.”

सर्व प्रकारच्या चिंतांवर एकमेव उपाय म्हणजे प्रार्थना करणं आहे, असं येशूनं डोंगरावरील प्रवचनात सुचवलं. तो म्हणतो: “तुमच्या गरजा काय आहेत हे तुमचा पिता, तुम्ही त्याच्यापाशी मागण्यापूर्वीच, जाणून आहे.” (मत्तय ६:८) तरीपण आपण त्याला प्रार्थना केली पाहिजे. कारण “देवाजवळ” जाण्याचा प्रमुख मार्ग प्रार्थना करणं, हा आहे. देवाजवळ गेल्यावर काय होईल? “तो तुम्हांजवळ येईल.”—याकोब ४:८.

प्रार्थनेमुळं फक्त आपलं मन हलकं होत नाही तर आणखीनही फायदे होतात. प्रार्थना ऐकणारा देव यहोवा, त्याला विश्वासानं प्रार्थना करणाऱ्यांसाठी कार्य करतो. (स्तोत्र ६५:२) म्हणूनच येशूनं त्याच्या अनुयायांना, सर्वदा प्रार्थना करा व खचू नका, असं सांगितलं. (लूक १८:१) आपण देवाला मार्गदर्शनासाठी व मदतीसाठी नेहमी प्रार्थना करत राहिलं पाहिजे आणि तो आपल्याला आपल्या विश्वासाचं प्रतिफळ देईल, हा भरवसा बाळगला पाहिजे. देवाची इच्छा आणि कार्य करण्याची त्याची शक्ती यांवर आपण कधीही शंका घेऊ नये. अशा प्रकारे जेव्हा आपण “निरंतर प्रार्थना” करतो तेव्हा दाखवून देतो, की देवावर आपला खरोखरचा विश्वास आहे.—१ थेस्सलनीकाकर ५:१७.

खरोखरचा विश्वास असणं म्हणजे नेमकं काय?

खरोखरचा विश्वास असणं म्हणजे, देव एक व्यक्ती आहे हे ओळखणं. (योहान १७:३) देवाचं वचन बायबल यातून आपण आधी त्याचे विचार जाणून घेतो. आपल्या प्रत्येकाकडं त्याचं लक्ष आहे आणि आपल्याला मदत करण्याची त्याची इच्छा आहे, हे आपल्याला कळतं. पण खरोखरचा विश्वास असण्यामध्ये देवाबद्दल एवढंच माहीत होणं समाविष्ट नाही. तर त्यामध्ये त्याच्याबरोबर आदरपूर्वक मैत्रीचे संबंध जोडणंही समाविष्ट आहे. आपण जसं एका रात्रीत कुणाचे मित्र बनू शकत नाही, तसंच देवाबरोबरही एका रात्रीत मैत्री करू शकत नाही. आपण जसजसं त्याच्याविषयी शिकतो, “जे त्याला आवडते ते” करत राहतो आणि त्याची मदत अनुभवतो तसतसं त्याच्यावरचा आपला “विश्वास वाढत” जातो. (२ करिंथकर १०:१५; योहान ८:२९) याच प्रकारच्या विश्वासानं जॅनेटला तिच्या चिंतांवर मात करायला मदत केली.

ती म्हणते: “मी पदोपदी यहोवाची मदत अनुभवली आणि त्यामुळं माझा विश्वास आणखी वाढला. पुष्कळदा आम्ही असे अन्याय सहन केले जे आमच्या सहनशक्तीच्या पलिकडे होते. पण यहोवाला प्रार्थना केल्यानंतर आम्हाला त्या परिस्थितीतून असा एक मार्ग दिसायचा ज्याचा आम्ही विचारसुद्धा केला नव्हता. त्यानं माझ्यासाठी जितकं केलंय त्याच्या तुलनेत मी त्याचे कितीही आभार मानले तरी ते कमीच आहेत, असं मला वाटतं. जेव्हा-जेव्हा मला त्याची मदत हवी होती तेव्हा-तेव्हा त्यानं मला अगदी वेळेवर मदत केली. शिवाय, त्यानं मला, सुखदुःखात माझ्या व माझ्या मुलांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणारे खरे मित्र दिलेत.” *

मलाखी २:१६ मध्ये यहोवा असं का म्हणतो की ‘मला घटस्फोटाचा तिटकारा आहे,’ ते आत्ता मला कळतं. एक विवाह सोबती जेव्हा विश्वासघात करतो तेव्हा निर्दोष सोबत्याला काय सहन करावं लागतं ते मी अनुभवलंय. माझ्या नवऱ्यानं मला सोडून अनेक वर्षं झालीत, पण अजूनही कधीकधी मला ती पोकळी जाणवते. अशा वेळी रडत बसण्याऐवजी मी इतरांना मदत करण्याचा प्रयत्न करते. यामुळं मलाही फायदा होतो.” निराश झाल्यावर लोकांपासून दूर जाण्याचं टाळा, असा सल्ला बायबलमध्ये दिला आहे. या सल्ल्याचं पालन केल्यामुळंही जॅनेट आपल्या चिंतांवर मात करते.—नीतिसूत्रे १८:१.

यहोवा अनाथांचा बाप आहे आणि तो विधवांची काळजी घेतो.—स्तोत्र ६८:५

ती म्हणते: “यहोवा अनाथांचा बाप आहे आणि तो विधवांची काळजी घेतो, या विचारानंच मला सर्वात जास्त सांत्वन मिळतं. माझा नवरा जसा आम्हाला टाकून गेला, तसं यहोवा आम्हाला कधीच सोडणार नाही.” (स्तोत्र ६८:५) आपल्यावर वाईट प्रसंग येऊ देण्याद्वारे देव कधीच आपली परीक्षा पाहत नाही तर चिंतांचा सामना करण्यासाठी तो आपल्याला “उदारपणे” बुद्धी व शक्ती देतो.—याकोब १:५, १३; २ करिंथकर ४:७.

पण मग, जीव धोक्यात असल्यामुळं आपल्याला चिंता वाटते तेव्हा काय? (w15-E 07/01)