चित्रसूची
चित्रसूची पान क्रमांकानुसार
पुस्तकाच्या कव्हरवर पौल, तबीथा, गल्लियो, लूक, प्रेषितांसोबत मंदिराचा एक अधिकारी, एक सदूकी, पौलला कैसरीयाला नेलं जात असताना, आणि लाउडस्पीकर लावलेली कार आणि फोनोग्राफच्या मदतीने आधुनिक काळातली प्रचारकार्याची दृश्यं.
पान १ साखळ्यांनी बांधलेला पौल, आणि लूक रोमला जात असलेल्या एका मालवाहू जहाजावर.
पान २, ३ नियमन मंडळाचे बंधू जे. ई. बार आणि टी. जॅरझ जगाच्या नकाशाचं निरीक्षण करताना.
पान ११ येशू गालीलमध्ये एका डोंगरावर ११ विश्वासू प्रेषितांना आणि इतर शिष्यांना प्रचाराची आज्ञा देतो.
पान १४ येशूला आकाशात घेतलं जातं. प्रेषित त्याच्याकडे पाहत राहतात.
पान २० पेन्टेकॉस्टच्या दिवशी, शिष्य इतर ठिकाणांहून आलेल्या लोकांशी त्यांच्या भाषांमध्ये बोलू लागतात.
पान ३६ प्रेषित संतापलेल्या कयफासमोर उभे आहेत. मंदिराचे अधिकारी, महासभेकडून आदेश मिळताच प्रेषितांना अटक करायला तयार आहेत.
पान ४४ खाली: दुसऱ्या महायुद्धानंतर, पूर्व जर्मनीच्या न्यायालयाने यहोवाच्या साक्षीदारांवर अमेरिकेचे हेर असण्याचा आरोप लावून त्यांना दोषी ठरवलं.—न्यू बर्लिनर इलसट्रीयेट नियतकालिकाचा ३ ऑक्टोबर, १९५० अंक.
पान ४६ स्तेफन न्यायसभेसमोर आरोपी म्हणून उभा आहे. पाठीमागे श्रीमंत सदूकी, आणि समोर रूढीवादी परूशी लोक दिसत आहेत.
पान ५४ पेत्र एका नव्या शिष्यावर हात ठेवतो; शिमोनच्या हातात नाण्यांची पिशवी आहे.
पान ७५ पेत्र आणि त्याच्यासोबत प्रवास करणारे कर्नेल्यच्या घरी येतात. शंभर सैनिकांवर अधिकारी असलेल्या कर्नेल्यने, डाव्या खांद्यावर त्याची पदवी दाखवणारं एक खास प्रकारचं वस्त्र घातलं आहे.
पान ८३ स्वर्गदूत पेत्रला तुरुंगाबाहेर नेत आहे; पेत्रला कदाचित ॲन्टोनियाच्या बुरुजामध्ये असलेल्या तुरुंगात ठेवण्यात आलं असेल.
पान ८४ खाली: १९४५ साली क्विबेक, माँट्रिऑल इथे साक्षीदारांवर जमावाचा हल्ला.—वीकेंड मॅगझीन या नियतकालिकाचा जुलै १९५६ चा अंक.
पान ९१ पौल आणि बर्णबा यांना पिसिदियाच्या अंत्युखिया शहरातून हाकललं जातं. पाठीमागे, कदाचित इ.स. पहिल्या शतकाच्या सुरुवातीला बांधण्यात आलेला शहराचा नवीन पाण्याचा कालवा दिसत आहे.
पान ९४ लुस्त्र इथे पौल आणि बर्णबा, त्यांची पूजा करायचा प्रयत्न करणाऱ्या लोकांना थांबवतात. त्या काळी बलिदानं देण्याच्या वेळी सजावट, नाचगाणं आणि भरपूर गोंगाट असायचा.
पान १०० वरती: सीला आणि यहूदा, सीरियाच्या अंत्युखियातल्या मंडळीला प्रोत्साहन देतात. (प्रे. कार्ये १५:३०-३२) खाली: एक विभागीय पर्यवेक्षक युगांडा देशातल्या एका मंडळीत भाषण देत आहेत.
पान १०७ यरुशलेमच्या मंडळीची घरात चाललेली सभा.
पान १२४ पौल आणि तीमथ्य रोमन व्यापारी जहाजातून प्रवास करत असल्याचं दृश्य. दूर अंतरावर लाइटहाऊस दिसत आहे.
पान १३९ पौल आणि सीला फाटक असलेल्या अंगणातून संतापलेल्या जमावापासून पळ काढताना दाखवले आहेत.
पान १५५ गल्लियो पौलवर आरोप करणाऱ्यांना घालवून देतो. त्याने उच्च पदावर असलेल्या अधिकाऱ्याचा पेहराव केला आहे: रुंद जांभळ्या काठाचा पांढरा झगा आणि कॅल्सेई म्हटलेले खास प्रकारचे बूट.
पान १५८ देमेत्रिय इफिसमध्ये एका सोनाराच्या दुकानातल्या कामगारांशी बोलत आहे. अर्तमी देवीचे चांदीचे देव्हारे त्या काळात विकले जायचे.
पान १७१ पौल आणि त्याचे सोबती एका जहाजावर चढत आहेत. इ.स.पू. पहिल्या शतकात बंदरावर बांधलेलं मोठं स्मारक पाठीमागे दिसत आहे.
पान १८० खाली: १९४० च्या दशकात कॅनडामध्ये साहित्यावर बंदी असताना, एक साक्षीदार मुलगा लपूनछपून बायबलचं साहित्य आणत आहे. (खऱ्या घटनेचं नाट्यचित्रण.)
पान १८२ पौल वडिलांची विनंती मान्य करतो. पाठीमागे लूक आणि तीमथ्य बसलेले दिसत आहेत, ते देणग्यांचं वाटप करण्यात मदत करत आहेत.
पान १९० पौलचा भाचा ॲन्टोनियाच्या बुरुजात क्लौद्य लुसिया याच्याशी बोलताना. पौल कदाचित इथल्या तुरुंगात होता. पाठीमागे हेरोदचं मंदिर दिसत आहे.
पान २०६ मालवाहू जहाजात थकलेल्या प्रवाशांसाठी पौल प्रार्थना करत आहे.
पान २२२ कैदेत असलेल्या पौलचे हात साखळीने एका रोमन सैनिकाला बांधलेले आहेत, तो रोम शहराकडे पाहत आहे.