भाग ५ • प्रेषितांची कार्यं १५:१-३५
‘प्रेषित आणि वडील एकत्र जमले’
एक मोठा वाद निर्माण झाला. या वादामुळे मंडळ्यांमधली एकता आणि शांती भंग होण्याचा धोका होता. मंडळ्यांनी हा वाद सोडवण्यासाठी, मार्गदर्शन मिळवण्याकरता काय केलं? पहिल्या शतकातली ख्रिस्ती मंडळी कशी संघटित होती, आणि देवाचे लोकही आज त्याच प्रकारे कसे संघटित आहेत, याबद्दल बरीच माहिती आपल्याला या भागात मिळणार आहे.