२०१७ अधिवेशन कार्यक्रम
अधिवेशनाच्या प्रत्येक दिवशी होणारा कार्यक्रम पाहा. चांगलं ते करत राहण्यासाठी आणि संकटांत धीर धरण्यासाठी तुम्हाला या अधिवेशनामुळे मदत मिळेल.
शुक्रवार
संकटांचा धीराने सामना करता यावा यासाठी मदत करतील असे गुण एक ख्रिस्ती व्यक्ती कशी विकसित करू शकते?
शनिवार
सर्वसमर्थ देव आपल्याला धीर आणि सांत्वन कसं पुरवतो?
रविवार
येशूने म्हटलं, की “जो शेवटपर्यंत धीर धरेल त्यालाच वाचवलं जाईल.” येशूच्या या शब्दांचं पालन करण्यासाठी तुम्ही काय करू शकता?
उपस्थितांसाठी माहिती
अधिवेशनादरम्यान तुम्ही कदाचित त्यात होणाऱ्या खास सभांसाठी उपस्थित राहण्याची योजना करत असाल. अटेंडन्ट, दान, प्रथमोपचार, हरवलेल्या वसतूंसंबंधी माहिती, बसण्याची व्यवस्था, किंवा स्वयंसेवक म्हणून काम करण्याविषयीची माहिती पाहा.