व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

उपस्थितांसाठी माहिती

उपस्थितांसाठी माहिती

खास सभा

बेथेल सेवा ३५ वर्षं आणि त्याहून कमी वय असलेले बाप्तिस्माप्राप्त प्रचारक, ज्यांना बेथेल सेवा करण्याची इच्छा आहे, त्यांनी शुक्रवारी दुपारी बेथेल अर्जदारांसाठी होणाऱ्या सभेला उपस्थित राहावं. सभेचं निश्‍चित ठिकाण व वेळ यांबद्दल घोषणा केली जाईल.

सुवार्तिकांसाठी प्रशाला ज्या पायनियरांचं वय २३ ते ६५ यामध्ये आहे व ज्यांना आपली सेवा वाढवण्याची इच्छा आहे अशांना, रविवारी दुपारी सुवार्तिकांसाठी असलेल्या प्रशालेकरता ठेवण्यात आलेल्या सभेला उपस्थित राहण्याचं आमंत्रण देण्यात येत आहे. या सभेचे निश्‍चित ठिकाण व वेळ यांबद्दल घोषणा केली जाईल.

उपस्थितांसाठी माहिती

अटेंडंट या बांधवांना तुम्हाला मदत करण्यासाठी नेमण्यात आलं आहे. त्यामुळे पार्किंग, गर्दीवर नियंत्रण ठेवणं, जागा राखणं व इतर गोष्टींबाबत ते जेव्हा तुम्हाला सूचना देतात तेव्हा कृपया त्यांच्याशी सहकार्य करा.

दान सर्वांनाच अधिवेशन कार्यक्रमाचा पूर्ण आनंद घेता यावा व यहोवाच्या आणखी जवळ जाता यावं म्हणून बराच खर्च करून पुरेशी बसण्याची जागा, व्हिडिओ व साऊंड सिस्टम आणि इतर अनेक सुविधांची व्यवस्था करण्यात आली आहे. तुम्ही देत असलेल्या ऐच्छिक दानाकरवी हा खर्च भागवला जातो. याशिवाय, जगभरात होणाऱ्या कार्यासाठीदेखील या दानाचा उपयोग केला जातो. दान टाकण्याकरता सभागृहात ठिकठिकाणी स्पष्ट शब्दांत, ‘दानपेटी’ असं लिहिलेल्या पेट्या ठेवण्यात आल्या आहेत. तुम्ही देत असलेल्या दानाची आम्ही मनापासून कदर करतो. राज्याशी संबंधित कार्याला हातभार लावण्यासाठी तुम्ही उदार मनाने जे काही देता त्याबद्दल नियमन मंडळ तुमचे आभार मानतं.

प्रथमोपचार कृपया हे लक्षात घ्या, की ही वैद्यकीय सेवा फक्त तातडीच्या प्रसंगांकरताच आहे.

हरवलेल्या वस्तू अधिवेशनाच्या आवारात सापडलेल्या सर्व वस्तू हरवलेल्या वसतूंच्या विभागात आणून द्याव्यात. तुमची एखादी वस्तू हरवली असेल, तर या विभागात जाऊन त्या वस्तूची ओळख पटवून ती घ्या. पालकांपासून चुकामूक झालेल्या मुलांनादेखील या विभागात न्यावे. पण, हा विभाग मुलांची काळजी घेणारा विभाग आहे असे समजू नये. कृपया आपल्या मुलांवर लक्ष ठेवा आणि त्यांना नेहमी तुमच्याजवळ असू द्या.

बसण्याची व्यवस्था जागा राखताना कृपया इतरांचाही विचार करा. लक्षात असू द्या, की केवळ तुमच्यासोबत एकाच गाडीतून प्रवास करणाऱ्यांसाठी, तुमच्यासोबत एकाच घरात राहणाऱ्यांसाठी किंवा तुमच्यासोबत बायबलचा अभ्यास करत असलेल्यांसाठीच तुम्ही जागा राखून ठेवू शकता. तुम्ही ज्या सीट्‌सवर बसणार आहात त्यांच्या आजूबाजूच्या सीट्‌सवर वस्तू ठेवू नका.

स्वयंसेवा अधिवेशनातील कामात हातभार लावण्याची तुमची इच्छा असेल, तर माहिती आणि स्वयंसेवा विभागाशी संपर्क साधा.

यहोवाच्या साक्षीदारांच्या नियमन मंडळातर्फे आयोजित