व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

धडा १२

पौलाचा धाडसी भाचा

पौलाचा धाडसी भाचा

एका मुलानं त्याच्या मामाला कसं वाचवलं ते आपण या धड्यात पाहू या. मामाचं नाव होतं पौल. तो येशूचा एक प्रेषित होता. आपल्याला त्या भाच्याचं नाव माहीत नाही पण त्यानं एक धाडसी कृत्य केलेलं माहीत आहे. ऐकायची का तुला त्याची गोष्ट?—

पौल जेरूसलेमेत एका जेलमध्ये होता. तो येशूबद्दल सांगत होता म्हणून काही वाईट लोकांनी त्याला जेलमध्ये टाकलं. या वाईट लोकांना पौलाला मारून टाकायचं होतं म्हणून ते एक प्लॅन बनवतात. ते म्हणतात: ‘आपण आर्मी कमांडरला सांगू या, की त्याच्या सैनिकांनी पौलाला कोर्टात आणावं. आणि मग आपण रस्त्यात लपून बसू या. जेव्हा पौल इकडून जाईल, तेव्हा आपण त्याला मारून टाकू या.’

पौलाच्या भाच्यानं पौलाला आणि आर्मी कमांडरला त्या वाईट लोकांच्या प्लॅनबद्दल सांगितलं

हे बोलत असताना पौलाचा भाचा त्यांचं बोलणं ऐकतो. मग तो काय करतो? तो लगेच जेलमध्ये पौलाकडं जाऊन त्याला हे सर्व सांगतो. पौल त्याला म्हणतो, ‘जा लवकर जा आणि आर्मी कमांडरला त्या वाईट लोकांच्या प्लॅनबद्दल सांग.’ पण पौलाच्या भाच्याला आर्मी कमांडरला हे सर्व जाऊन सांगणं सोपं वाटत नव्हतं कारण कमांडर हा एक मोठा माणूस होता. त्याला भेटणं सोपं नव्हतं. तरीपण पौलाचा भाचा कसंतरी धाडस करून त्याच्याकडं जातो व त्याला सगळं सांगतो.

आर्मी कमांडरच्या सर्व लक्षात येतं. तो पौलाला वाचवण्यासाठी ५०० सैनिकांना पाठवतो! पौलाला आजच्या रात्री कैसरियाला नेण्यात यावं असं तो सैनिकांना सांगतो. मग पौलाचा जीव वाचतो का?— इतके सैनिक असल्यावर वाचणारच ना? ते वाईट लोक काहीही करू शकले नाहीत.

या गोष्टीतून आपण काय शिकतो?— आपणपण पौलाच्या भाच्यासारखं धाडसी बनू शकतो. इतरांना यहोवाबद्दल सांगताना आपण धाडस दाखवू शकतो. तू दाखवशील का धाडस?— असं केलंस ना तर कुणाचातरी जीव वाचू शकतो.