प्रस्तावना
प्रस्तावना
आमच्या वाचकांसाठी:
तुम्हाला समस्या आहेत याची खात्री आम्हाला आहे. प्रत्येकाला त्या आहेत. शाळेत, कामावर तुम्हाला आव्हान देणाऱ्या कित्येक समस्या येतात. इतर काही समस्या खूपच वेदनादायक असतात. तुम्ही गरीब असाल तर पुरेसे खायला मिळणे हेच न संपणारे आव्हान असू शकेल. कुटुंबातील आजार देखील यात अधिक भर घालतो. निरस वैवाहिक जीवन, अहंभाव, वाईट सवयी, राजकीय बंडाळ्या आणि आर्थिक अस्थैर्यता या सर्व गोष्टी जीवन अधिकच कठीण करतात.
या समस्या सोडविता येतील का? हाच आमच्या या प्रकाशनाचा विषय आहे. या प्रश्नाची चर्चा दोन कुटुंबात घडलेल्या संभाषणाकरवी हाताळली गेली आहे हे आपल्याला दिसेल. हे संभाषण तसेच ती कुटुंबे काल्पनिक आहेत. पण यात चर्चिलेल्या समस्या मात्र खऱ्या स्वरुपाच्या आहेत, आणि जे उपाय सांगण्यात आले आहेत ते खरेच कार्यसिद्धि करतात. या प्रकाशनातील माहितीचा तुम्ही अभ्यास केला व तिचे अवलंबन केले तर ती खरोखर तुमचे जीवन चांगल्या अर्थाने बदलू शकेल. पृष्ठ ३० वर काही प्रश्न दिले आहेत. ते साहित्याची उजळणी करण्यासाठी वापरता येतील.
[२९ पानांवरील चित्र]
तुमच्यापाशी उत्तर आहे का?