व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

“अविनाशी” राज्य

“अविनाशी” राज्य

अध्याय १०

“अविनाशी” राज्य

१, २. (अ) जागतिक घडामोडी दररोज कोणत्या वस्तुस्थितीवर जोर देतात व कशा? (ब) त्याचा एकमेव उपाय कोणता?

 यहोवाच्या सार्वभौमत्वाला झुगारून व त्याऐवजी स्वतःवर आपणच शासन करण्याचा प्रयत्न करुन मानवांना आनंद मिळालेला नाही या वस्तुस्थितीवर जागतिक घडामोडी दररोज भर देत आहेत. मानवी शासनाच्या कोणत्याही प्रणालीने मानवजातीला निःपक्षपाती फायदे दिलेले नाहीत. माणसांनी अभुतपूर्व प्रमाणात आपले वैज्ञानिक ज्ञान वाढवलेले असले तरी, एकाही प्रजाजनासाठी त्यांना, पाप मुळापासून नष्ट करणे, रोगांवर विजय मिळवणे व मृत्युचा अंत करणे, शक्य झालेले नाही. उलट राष्ट्रे नवनवी व भयानक शस्त्रे बनवत आहेत. गुन्ह्यांसंबंधी हिंसा झपाट्याने वाढत आहे. तंत्रज्ञान, हाव आणि अज्ञानाच्या संयोगाने जमीन, पाणी व हवा दूषित होत आहे. बेसुमार महागाई व बेरोजगारीमुळे अनेकांना जीवनाच्या गरजा मिळवणे अत्यंत कठीण ठरत आहेत. यातून मार्ग काढण्यासाठी लोक उतावळे आहेत.—उप. ८:९.

याला काय उपाय? येशूने त्याच्या अनुयायांना ज्यासाठी प्रार्थना करण्यास शिकवले ते देवाचे राज्य. (मत्त. ६:९, १०) त्या राज्याने मिळणारी मुक्‍तता आता अत्यंत निकट आहे याबद्दल आपण किती कृतज्ञ असले पाहिजे!

३. (अ) या राज्यासंबंधी इ.स. १९१४ मध्ये स्वर्गात काय घडले? (ब) आपल्याकरिता ते महत्त्वाचे का आहे?

यापूर्वीच, १९१४ सालापासून, येशू ख्रिस्ताच्या हाती देवाचे राज्य कार्यरत आहे. * दानीएलाने भविष्यसूचक दृष्टांतात पाहिलेल्या घटना, त्या वर्षी स्वर्गात खरोखरच घडल्या. “पुराणपुरूष” यहोवाने मानव-पुत्र, येशू ख्रिस्ताला “सर्व लोक, सर्व राष्ट्रे व सर्व भाषा बोलणारे लोक यांनी त्याची सेवा करावी म्हणून त्यास प्रभुत्व, वैभव व राज्य ही दिली.” त्या दृष्टांताचा वृत्तांत सांगताना दानीएलाने लिहिले: “त्याचे प्रभुत्व अक्षय व अढळ आहे; त्याचे राज्य अविनाशी आहे.” (दानी. ७:१३, १४) देवाने आपल्या पहिल्या मानवी जोडप्याला नंदनवनात ठेवले तेव्हा त्याने ज्या अनंत उत्तम गोष्टी योजल्या होत्या त्यांचा उपभोग, याच राज्याद्वारे, नीतिमत्त्वाची आवड असलेल्यांना तो घेऊ देईल.

४. त्या राज्याच्या कोणत्या तपशीलाबद्दल आपल्याला अत्यंत आस्था आहे व का?

या शासनाच्या रचना व कार्यपद्धतीबद्दल देवाच्या राज्याच्या एकनिष्ठ प्रजाननांना अतिशय आस्था आहे. ते राज्य आज काय करत आहे, भविष्यात ते काय साध्य करील व त्यांच्यापासून ते कशाची अपेक्षा करते हे जाणून घेण्याची त्यांना इच्छा आहे. ते त्याची बारकाईने तपासणी करतात व तसे करताना त्याच्याविषयी त्यांना वाटणारा आदर वाढतो आणि त्याच्याबद्दल इतरांना सांगण्यासाठी ते स्वतःला सुसज्ज करतात.—स्तोत्र. ४८:१२, १३.

चित्तवेधक परीक्षण

५. (अ) मशीही राज्याद्वारे कोणाचे सार्वभौमत्व व्यक्‍त होते असे पवित्र शास्त्र कसे दर्शविते? (ब) तेव्हा, त्या राज्याबद्दल मिळणाऱ्‍या ज्ञानामुळे आपल्यावर कसा परिणाम होतो?

अशा परीक्षणातून प्रथमतः प्रकट होणाऱ्‍या गोष्टींपैकी एक अशी की हे मशीही राज्य, यहोवाच्या स्वतःच्या सार्वभौमत्वाची अभिव्यक्‍ती आहे. आपल्या पुत्राला “प्रभुत्व, वैभव व राज्य” देणारा आहे तो, तोच. त्यामुळे, राज्याने शासन सुरू केल्यावर उचितपणे, “जगाचे राज्य आमच्या प्रभूचे [यहोवा देव] व त्याच्या ख्रिस्ताचे झाले आहे आणि तो [यहोवा] युगानुयुग राज्य करील” अशी घोषणा स्वर्गातील वाणींनी केली. (प्रकटी. ११:१५) तेव्हा, या राज्याबद्दल आपल्याला दिसणाऱ्‍या सर्व गोष्टी व त्याने साध्य होणाऱ्‍या गोष्टी आपल्याला खुद्द यहोवाकडे आकर्षित करतात. त्यामुळे कायम त्याच्या सार्वभौमत्वाच्या अधीन राहण्याची इच्छा आपल्या अंतःकरणावर बिंबते.

६. येशू ख्रिस्त हा देवाचा दुय्यम शासक आहे, यात आपल्याला विशेष आस्था का आहे?

आपला दुय्यम शासक म्हणून यहोवाने येशूला सिंहासनावर बसवले आहे. हे किती उत्तम आहे! पृथ्वी व मानव घडवण्यासाठी देवाने कुशल कारागिर म्हणून उपयोग केलेल्या येशूला आपल्या गरजा, आपल्यापैकी कोणाहीपेक्षा अधिक चांगल्या ठाऊक आहेत. ‘मानवजातीच्या ठायी त्याला मिळणारा आनंद’ त्याने मानवी इतिहासाच्या सुरूवातीपासून प्रदर्शित केलेला आहे. (नीति. ८:३०, ३१; कलस्सै. १:१५-१७) ते प्रेम इतके उत्कट आहे की व्यक्‍तिशः तो पृथ्वीवर आला आणि आपल्या वतीने खंडणी म्हणून त्याने स्वतःचा जीव दिला. अशा रीतीने पाप व मृत्युपासून सुटकेचे साधन व सार्वकालिक जीवनाची संधी, त्याने आपल्याला उपलब्ध करून दिली.—मत्त. २०:२८.

७. (अ) कोणत्याही मानवी राज्यकारभाराच्या उलट हे सरकार का टिकेल? (ब) या स्वर्गीय शासनाशी “विश्‍वासू व बुद्धीमान” दासाचा काय संबंध आहे?

हे स्थिर व टिकाऊ सरकार आहे. स्वतः यहोवावर मृत्यूचा ताबा नसल्याने त्याच्या टिकाऊपणाची हमी आहे. (हब. १:१२; स्तोत्र. १४६:३-५, १०) देवाने राज्यपद ज्याच्या स्वाधीन केले आहे तो येशू ख्रिस्तही, मानवी राजांच्या अगदी उलट, अमर आहे. (रोम. ६:९; १ तीम. ६:१५, १६) ख्रिस्तासोबत स्वर्गीय सिंहासनावर, “निरनिराळ्या भाषा बोलणारे, लोक, व राष्ट्रे ह्‍यांमधून” घेतलेले १,४४,००० इतर देवाचे विश्‍वासू सेवक असतील. ह्‍यांनाही अमरत्व दिले जाते. (प्रकटी. ५:९, १०; १ करिंथ. १५:४२-४४, ५३) त्यातले बहुतेक या आधीच स्वर्गात गेलेले आहेत आणि त्यातले पृथ्वीवरील शेष लोकांचा “विश्‍वासू व बुद्धिमान दास” बनला आहे. व तो, त्या राज्याच्या इथल्या हितसंबंधाचा निष्ठेने पाठपुरावा करतो.—मत्त. २४:४५-४७.

८, ९. (अ) हे राज्य कोणते विघटनवादी, भ्रष्ट करणारे प्रभाव नाहीसे करील? (ब) तेव्हा, देवाच्या राज्याचे शत्रू होणे आपल्याला टाळावयाचे असल्यास कोणत्या संस्था व कार्यात गुंतणे आपण टाळू?

यहोवाच्या नेमलेल्या वेळी, लवकरच, त्याचे दण्ड देणारे सैन्य पृथ्वी शुद्ध करण्यासाठी कृती करील. स्वेच्छेने त्याचे सार्वभौमत्व मान्य करण्याचे नाकारून, देवाला न ओळखणे पसंत करणाऱ्‍या व त्याने येशू ख्रिस्तामार्फत केलेल्या प्रेमळ तरतुदींना तुच्छ लेखणाऱ्‍या मानवांना, ते कायमचे नष्ट करतील. (२ थेस्सलनी. १:६-९) हा यहोवाचा दिवस, विश्‍वाचा सार्वभौम सत्ताधारी म्हणून त्याचे समर्थन होण्याचा दिवस, खूप वाट पाहिलेला काळ, असेल.

सर्व खोटे धर्म आणि या जगाच्या अदृश्‍य, दुष्ट शासकाने चलाखीने हाताळलेली सर्व मानवी सरकारे व त्यांची सैन्ये कायमची नष्ट केली जातील. आत्मकेंद्रित, अप्रामाणिक व अनैतिक जीवन-मार्ग अनुसरून आपण या जगाचा भाग असल्याची ओळख देणाऱ्‍या सर्वांना मृत्युदण्ड देण्यात येईल. एक हजार वर्षांसाठी कडेकोट बंदोबस्तात ठेऊन सैतान व त्याच्या दुरात्म्यांना पृथ्वीवरील लोकांपासून दूर केले जाईल. नीतिमत्त्वाची प्रीती असणाऱ्‍या सर्वांना त्यामुळे किती दिलासा मिळेल!—प्रकटी. १८:२१, २४; १९:११-१६, १९-२१; २०:१, २.

त्याची ध्येये—कशी साधली जातात

१०. (अ) प्रत्यक्ष पृथ्वीसाठी असलेला यहोवाचा उद्देश ते मशीही राज्य कसे साध्य करील? (ब) त्या वेळी पृथ्वीवर राहात असलेल्या लोकांकरता याचा काय अर्थ होईल?

१० पृथ्वीविषयी देवाचा मूळ उद्देश हे मसीही राज्य पूर्णपणे साध्य करील. (उत्प. २:८, ९, १५; १:२८) आजतागायत, मानव तो उद्देश पूर्ण करण्यात असफल ठरला आहे. परंतु “भावी जग” मनुष्याचा पुत्र, येशू ख्रिस्त याच्या अधीन करण्यात आले आहे. या जुन्या जगावरील यहोवाच्या दंडातून वाचणारे सर्वजण, पृथ्वीवर जागतिक नंदनवन व्हावे म्हणून येशू ख्रिस्त देईल त्या निर्देशानुसार आनंदाने काम करुन त्याच्या हाताखाली एकतेने कार्य करतील. (इब्री. २:५-९) सर्व मानवजात आपल्या कष्टांच्या फळांचा उपभोग घेईल व जमिनीच्या उपजाच्या विपुलतेचा पुरेपुर फायदा घेतील.—स्तोत्र. ७२:१, ७, ८, १६-१९; पडताळा यशया ६५:२१, २२.

११. (अ) त्या राज्याच्या प्रजाजनांसाठी मन व शरीराची पूर्णता कशी केली जाईल? (ब) त्यात कशाचा समावेश असेल?

११ आदाम व हव्वेची सृष्टी झाली तेव्हा ते परिपूर्ण होते व तन-मनाचे पूर्णत्त्व उपभोगणाऱ्‍या त्यांच्या सर्व संततीने पृथ्वी भरावी असा देवाचा उद्देश होता. देवाच्या राज्याखाली तो उद्देश गौरवाने अस्तित्त्वात येईल. ह्‍यासाठी पापाचे सर्व परिणाम काढून टाकण्याची आवश्‍यकता आहे; आणि त्याकरता येशू ख्रिस्त, फक्‍त राजा म्हणूनच नव्हे तर प्रमुख याजक म्हणूनही काम करतो. त्याच्या स्वतःच्या मानवी जीवनाच्या बलिदानाच्या पाप-विमोचक मूल्याचा फायदा घेण्यास त्याच्या आज्ञाधारक प्रजाजनांना तो सोशीकपणे मदत करील. अंधळ्यांचे डोळे उघडले जातील. बहिऱ्‍यांचे कान खुले होतील. वयोमानपरत्वे वा रोगांमुळे विरूप झालेले शरीर बालकाच्या शरीरापेक्षा टवटवीत होईल. दीर्घकालीन अशक्‍तपणाची जागा सुदृढ स्वास्थ्य घेईल. पाप आणि त्याच्या दुःखद परिणामांच्या ओझ्यापासून सुटका मिळाल्यामुळे “मी रोगी आहे” असे म्हणण्यास कोणालाही कारण नसेल, असा दिवस येईल.—पडताळा यशया ३३:२२, २४; ३५:५, ६; ईयोब ३३:२५; लूक १३:११-१३.

१२. (अ) मानवी पूर्णतेसाठी आणखी कशाची आवश्‍यकता आहे? (ब) ते कसे साध्य केले जाईल?

१२ पूर्णत्व मिळवण्यात स्वस्थ शरीर आणि स्वस्थ मन असण्यापेक्षा पुष्कळसे अधिक गोवलेले आहे. मानव ‘देवाच्या प्रतिरूपाचा, त्याच्याशी सदृश’ घडवला गेला असल्यामुळे योग्यपणे यहोवाच्या व्यक्‍तिमत्त्वाचे गुण प्रदर्शित करणे त्यात सामावलेले आहे. (उत्प. १:२६) त्यासाठी बऱ्‍याच शिक्षणाची गरज पडेल. “ज्यामध्ये नीतीमत्त्व वास करते” अशी ही नवीन व्यवस्था आहे; त्यामुळे यशया संदेष्ट्याने केलेल्या भविष्यवाणीप्रमाणे “जगात राहणारे धार्मिकता” शिकतील. (२ पेत्र ३:१३; यश. २६:९) या गुणामुळे सर्व देशातले लोक, निकटचे सहकारी, कुटुंब यांच्यामध्ये आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे खुद्द देवाशी शांती प्रस्थापित होते. (यश. ३२:१७; स्तोत्र. ८५:१०-१३) नीतिमत्त्व शिकणाऱ्‍यांना त्यांच्याविषयी देवाच्या उद्देशाबद्दल उत्तरोत्तर शिक्षण दिले जाईल. यहोवाच्या मार्गांविषयी आस्थेची मुळे जसजशी त्यांच्या हृदयात खोलवर जातील तसे जीवनातल्या प्रत्येक पैलूमध्ये ते मार्ग अनुसरतील. पूर्ण मानव, येशू, म्हणू शकला: “जे त्याला [पित्याला] आवडते ते मी सर्वदा करतो.” (योहा. ८:२९) ते सर्व मानवजातीबद्दल खरे असेल तेव्हा जीवन किती हर्षदायक असेल!

एव्हाना दिसून येणारी फळे

१३. देवाच्या राज्याने साध्य केलेल्या गोष्टी आणि त्याकारणाने आपण केल्या पाहिजेत अशा गोष्टींवर भर देण्यासाठी वरील प्रश्‍नांचा उपयोग करा.

१३ एव्हाना राज्याने साध्य केलेल्या परिणामकारक गोष्टी, विश्‍वासाचे नेत्र असलेल्या व्यक्‍तींना स्पष्ट दिसून येत आहेत. खालील प्रश्‍न व सोबत दिलेली शास्त्रवचने त्यातील काहींचे, तसेच त्या राज्याच्या प्रजेला करता येतात व त्यांनी सध्या केल्या पाहिजेत अशा गोष्टींचे, तुम्हाला स्मरण करून देतील:

 सर्वप्रथम राजाने कोणाविरूद्ध कारवाई केली व त्याचा परिणाम काय झाला? (प्रकटी. १२:७-१०, १२)

 कोणत्या गटाचे शेवटले सभासद गोळा करण्याकडे ख्रिस्त सिंहासनारूढ झाल्यावर तात्काळ लक्ष दिले गेले? (मत्त. २४:३१; प्रकटी. ७:१-४)

 सिंहासनस्थ झाल्यावर आणि दुष्टांचा नाश करण्यापूर्वी तो कोणते काम करील अशी भविष्यवाणी येशूने मत्तय २५:३१-३३ मध्ये केली?

 हे काम कसे साध्य केले जाते? त्यात कोण भाग घेतात? (मत्त. २४:१४; स्तोत्र. ११०:३; प्रकटी. १४:६, ७)

 राजकीय व धार्मिक विरोधक त्याला का थांबवू शकलेले नाहीत? (प्रे. कृत्ये ५:३८, ३९; जख. ४:६)

 सध्या चालू असलेल्या शैक्षणिक कार्यामुळे राज्याच्या शासनाधीन होणाऱ्‍या व्यक्‍तींच्या जीवनात एव्हाना कोणते बदल झालेले आहेत? (यश. २:४; १ करिंथ. ६:९-११)

राज्याचा टिकाऊपणा

१४. (अ) ख्रिस्त किती काळ राज्य करील? (ब) त्या कालावधीत काय साध्य केले जाईल?

१४ सैतान व त्याच्या दुरात्म्यांना अथांग डोहात टाकल्यावर येशू ख्रिस्त त्याच्या १,४४,००० सहवारसांसह एक हजार वर्षे राज्य करील. (प्रकटी. २०:६) त्या काळात मानवजात पूर्णत्वाच्या स्थितीला आणली जाईल. यहोवाला विरोध करणारी सर्व सरकारे, अधिकार व सत्ता नाहीशी केली जातील. ते साध्य केल्यावर “देव सर्वांना सर्वकाही व्हावा” म्हणून, येशू ते राज्य त्याच्या पित्याला परत देईल.—१ करिंथ. १५:२४, २८.

१५. हे राज्य “अविनाशी” आहे, हे खरे कसे?

१५ त्यामुळे पृथ्वीच्या बाबतीत येशूचे स्वतःचे स्थान बदलेल. तरीही, त्याचे प्रभुत्व “अक्षय” आणि त्याचे राज्य “अविनाशी” असेल. (दानी. ७:१४) ते कोणत्या अर्थी? त्याचा अर्थ, वेगळी ध्येये असलेल्यांच्या हाती राज्याधिकार जाणार नाही. त्या राज्याने साध्य केलेल्या गोष्टी “अविनाशी” असतील. यहोवाचे नाव आणि पृथ्वीविषयी त्याचा उद्देश यांचा निर्दोषपणा शाबीत करण्यासाठी त्या राज्याने केलेले कार्य सर्वदा अबाधित राहील.

[तळटीपा]

^तुझे राज्य येवो” या पुस्तकाची पृष्ठे १२७-१३९ पाहा.

पुनरावलोकन चर्चा

मानवजातीच्या समस्यांवर देवाचे राज्य हाच एकमेव उपाय का आहे? त्याची सत्ता कधी सुरु झाली?

• देवाचे राज्य व त्याने साध्य होणाऱ्‍या गोष्टींच्या बाबतीत तुम्हाला काय विशेष आकर्षण वाटते? व का?

• एव्हाना त्या राज्याने साध्य केलेल्या कोणत्या गोष्टी आपल्याला दिसू शकतात? त्यात आपला काय सहभाग आहे?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[८४, ८५ पानांवरील चित्रं]

लोक धार्मिकता शिकतील