व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

‘दुरात्म्यांविरूद्ध लढणे’

‘दुरात्म्यांविरूद्ध लढणे’

अध्याय ८

‘दुरात्म्यांविरूद्ध लढणे’

१. दुष्ट आत्म्यांच्या कारवायांमध्ये आपल्याला विशेष रस का आहे?

 भौतिकवादी लोक दुरात्म्यांच्या कल्पनेचा उपहास करण्याची शक्यता आहे. पण हसण्यावारी नेण्यासारखी ती गोष्ट नव्हे. त्यावर त्यांचा विश्‍वास असो वा नसो दुरात्म्यांच्या कारवायांचा दबाव प्रत्येकावर पडतो. त्याला यहोवाचे उपासक अपवाद नाहीत. वस्तुतः ते प्राथमिक लक्ष्य आहेत. या लढ्याबद्दल आपल्याला सावधान करताना प्रेषित पौल म्हणतो: “आपले झगडणे रक्‍त मांसाबरोबर नव्हे, तर [रक्‍त-मांसाच्या नसलेल्या] सत्तांबरोबर, अधिकाऱ्‍यांबरोबर सध्याच्या काळोखातील जगाच्या अधिपतिबरोबर, आकाशातल्या दुरात्म्यांबरोबर आहे.” (इफिस. ६:१२) सैतानाला स्वर्गातून बाहेर टाकण्यात आले आहे आणि त्याचा काळ थोडा राहिला असल्याचे ठाऊक असल्याने तो संतप्त आहे. या कारणांमुळे आपल्या दिवसात हा दबाव पराकोटीला पोहोचला आहे.—प्रकटी. १२:१२.

२. अतिमानवी आत्म्यांच्या विरूद्ध यशस्वी लढा देणे आपल्याला कसे शक्य आहे?

अतिमानवी आत्मिक शक्‍तींच्या विरूद्ध लढा देण्यात आपल्यापैकी कोणीही कसा यशस्वी होऊ शकेल? फक्‍त यहोवावर पूर्णतया विसंबून. आपण त्याचे ऐकले पाहिजे व त्याचा शब्द पाळला पाहिजे. तसे केल्याने सैतानाच्या ताब्यात असलेल्यांना अनुभवाव्या लागणाऱ्‍या नैतिक, भावनिक व मानसिक हानीपासून आपण वाचू.—इफिस. ६:११; याको. ४:७.

आकाशातले जगाचे अधिपती

३. सैतानाचा कशाला व कोणाला प्रखर विरोध आहे?

यहोवा, स्वर्गातल्या त्याच्या सोईस्कर ठिकाणाहून त्याला दिसत असलेल्या जागतिक परिस्थितीचे, आपल्यासाठी हुबेहुब वर्णन करतो. प्रेषित योहानाला त्याने एक दृष्टांत दिला. त्यामध्ये, शक्य असल्यास, देवाचे मशीही राज्य इ.स. १९१४ मध्ये जन्माला घातल्या घातल्या गिळंकृत करण्यासाठी टपलेल्या ‘एका मोठ्या अग्नीवर्ण अजगरा’च्या रूपात सैतान दाखवला होता. त्यात अपयश आल्याने, त्या राज्याच्या दृश्‍य प्रतिनिधींना, म्हणजेच देवाच्या “स्त्री”च्या संततीच्या दुय्यम वर्गाला सैतानाने मोठा द्वेषपूर्ण विरोध सुरू केला.—प्रकटी. १२:३, ४, १३, १७.

४. (अ) मानवी शासनांच्या सामर्थ्याच्या स्रोताबद्दल कोणत्या वस्तुस्थितीविषयी पवित्रशास्त्र आपल्याला सावध करते? (ब) सर्व राजकीय शासकांना आता कोण व कोठे एकत्रित करत आहे?

मानवी शासनांच्या सामर्थ्य व अधिकाराचा स्रोतही योहानाला दिलेल्या त्या प्रकटीकरणात उघड करण्यात आला. सात डोकी व दहा शिंगे असलेले व “सर्व वंश, लोक, निरनिराळया भाषा बोलणारे व राष्ट्रे” यांच्यावर अधिकार असलेले एक संमिश्र श्‍वापद त्याला दाखवण्यात आले. ते कोणा एका शासनाचे नव्हे तर जागतिक राजकीय व्यवस्थेचे प्रतिनिधित्व करते. योहानाला सांगितले गेले की, “त्याला [श्‍वापदाला] अजगराने [दियाबल सैतानाने] आपली शक्‍ती, आपले आसन व मोठा अधिकार दिला.” (प्रकटी. १३:१, २, ७; पडताळा लूक ४:५, ६.) राजकीय शासक कोणत्याही धर्माचे असल्याचा दावा करोत, त्या “श्‍वापदा”मधल्या सभासद राष्ट्रातील कोणीही यहोवाच्या सार्वभौमत्वाच्या व त्याने नेमलेल्या राजाच्या, येशू ख्रिस्ताच्या, अधीन नाहीत. ते सर्व स्वतःच्या सार्वभौमत्वाला धरून राहण्याची खटपट करत आहेत. प्रकटीकरणात दाखवल्याप्रमाणे आज, “भुतांचे आत्मे” त्या सर्वांना “सर्वसमर्थ देवाच्या त्या मोठया दिवसाच्या लढाईसाठी,” हर्मगिदोन येथे एकत्र करत आहेत. (प्रकटी. १६:१३, १४, १६) खरोखर, प्रेषित पौलाने लिहिल्याप्रमाणे ‘जगाचे अधिपती’ क्षुद्र मानव नव्हेत तर ‘आकाशातले दुरात्मे,’ आहेत. (इफिस. ६:१२) यहोवाचे खरे उपासक म्हणवणाऱ्‍यांनी त्याचे पूर्ण महत्त्व जाणणे आवश्‍यक आहे.

५. क्लुप्तीने आपल्याला या सैतानी व्यवस्थेला पाठिंबा द्यायला लावणे टाळण्यासाठी काळजी घेण्याची गरज का आहे?

मानवी कुटुंबाला छिन्‍नविच्छिन्‍न करणारे झगडे दररोज आपल्या जीवनाला स्पर्श करतात. शब्दाने वा इतर रीतीने ते ज्याचा भाग आहेत अशा देशाची, वंशाची, भाषा बोलणाऱ्‍या गटाची वा सामाजिक वर्गाची कड घेणे, लोकांमध्ये सर्वसाधारण गोष्ट आहे. समाजातील त्यांचा भाग जेव्हा एखाद्या तात्कालिक तंट्यामध्ये थेट गोवलेला नसेल तेव्हाही ते एका बाजूविरूद्ध दुसऱ्‍याची कड घेताना आढळतात. तक्रार कोणतीही असो, ते ज्याला मान्यता देत आहेत ती व्यक्‍ती वा ध्येय काहींही असो, ते खरोखर कशाला पाठिंबा देत आहेत? पवित्र शास्त्र स्पष्टपणे सांगते की “सगळे जग त्या दुष्टाला वश झाले आहे.” (१ योहा. ५:१९) तर मग, एखादी व्यक्‍ती इतर मानवजातीबरोबर फसणे कसे टाळू शकते? फक्‍त, देवाच्या राज्याला संपूर्ण पाठिंबा देऊन आणि जगातल्या गटांमधल्या झगड्यांच्या बाबतीत पूर्णपणे तटस्थ राहून.—योहा. १७:१५, १६

त्या दुष्टाच्या फसव्या युक्त्या

६. खऱ्‍या उपासनेपासून लोकांना परावृत्त करण्यासाठी सैतानाने वापरलेल्या साधनांमध्ये कशा कशाचा अतंर्भाव आहे?

इतिहासामध्ये नेहमी व्यक्‍तींना खऱ्‍या उपासनेपासून परावृत्त करण्यासाठी सैतानाने शाब्दिक व शारीरिक छळाचा वापर केलेला आहे. पण त्याने अधिक छुप्या साधनांचा—कावेबाज कृती व छुप्या युक्त्यांचाही—उपयोग केला आहे.

७. सैतानाने खोट्या धर्माच्या केलेल्या उपयोगाने त्याची हुशारी कशी दिसून येते?

लोकांची तशी इच्छाच असल्यास, ते देवाची सेवा करत आहेत अशी कल्पना त्यांना करू देत, त्याने चतुराईने, खोट्या धर्माद्वारे मानवजातीच्या मोठ्या हिश्‍शाला अंधारात ठेवले आहे. सत्याबद्दल खऱ्‍या प्रेमाचा अभाव असल्याने गूढ वा भावनाप्रधान धार्मिक विधींकडे ते आकर्षित होऊ शकतात वा आश्‍चर्यजनक कृत्यांची त्यांच्यावर छाप पडू शकते. (२ थेस्सलनी. २:९, १०) खऱ्‍या उपासनेत सहभागी झालेल्यातलेही काही लोक “फुसलाविणाऱ्‍या आत्म्यांच्या व भुतांच्या शिक्षणाच्या नादी” लागून भ्रष्ट होतील असा इशारा आपल्याला दिलेला आहे. (१ तीम. ४:१) ते कसे होऊ शकेल?

८. यहोवाची उपासना करत असत अशाही काहींना सैतानाने खोट्या धर्मात खेचण्यासाठी कसे भुलवले आहे?

कावेबाजपणे दियाबल माणसाच्या कमकुवतपणाला मोहात पाडतो. मानवाच्या भीतीचा एखाद्यावर अजून पगडा आहे का? असल्यास, खोट्या धर्मात उत्पन्‍न झालेल्या प्रघातामध्ये सहभागी होण्यासाठी नातेवाईक वा शेजाऱ्‍यांनी आणलेल्या दबावाला तो बळी पडेल. तो गर्विष्ठ आहे का? मग त्याला सल्ला दिला गेल्यास वा त्याने मांडलेल्या कल्पना इतर स्वीकारत नसल्यास तो रागावेल. (नीती. २९:२५; १५:१०; १ तीम. ६:३, ४) क्षेत्र सेवेमध्ये त्याचा सहभाग प्रेमाने प्रेरित नसल्यास कसे? ख्रिस्ताच्या उदाहरणाशी अनुरूप होण्यासाठी आपला दृष्टिकोन सुधारण्याऐवजी फक्‍त पवित्र शास्त्राचे वाचन करणे आणि “चांगले जीवन” जगणे पुरेसे आहे, असे म्हणून ‘त्याचे कान खाजवणाऱ्‍यांकडे’ तो झुकेल. (२ तीम. ४:३) जोपर्यंत देवाने त्याच्या वचनाद्वारे वा संस्थेमार्फत निर्देश दिल्याप्रमाणे तो यहोवाची उपासना करत नाही तोवर तो प्रत्यक्ष दुसऱ्‍या धार्मिक गटाला जाऊन मिळतो, की स्वतःच्या मनाच्या धर्माला चिटकून राहतो, यात सैतानाला स्वारस्य नाही.

९. त्याचे उद्देश साध्य करण्यासाठी सैतान लबाडीने लैंगिक समागमाचा कसा उपयोग करतो?

तसेच नैसर्गिक इच्छा चुकीच्या मार्गांनी पूर्ण करण्यास सैतान लोकांना मोहात पाडतो. लैंगिक संबंधाच्या इच्छेबाबत त्याने असे केले आहे. पवित्र शास्त्राच्या नैतिकतेचा अव्हेर करून जगातले अनेक लोक, अविवाहित व्यक्‍तींमधील लैंगिक संबंधाला कायदेशीर सुखोपभोग वा ते प्रौढ असल्याचे सिद्ध करण्याचा मार्ग मानतात. आणि विवाहित व्यक्‍तींबद्दल काय? वैवाहिक समस्या अनुभवणाऱ्‍या सांसारिक लोकांना घटस्फोट घेऊन, पुनर्विवाह करणे वा फक्‍त विभक्‍त होऊन दुसऱ्‍या सोबत्यासह राहणे, ही असामान्य गोष्ट नव्हे. अशी जीवनप्रणाली आपण पाहतो तेव्हा आपण कशालातरी मुकतो आहोत, ख्रिस्ती मार्ग अवास्तव शिस्तीचे आहेत, असे आपल्याला वाटते का? यहोवा आपल्याला काहीतरी चांगल्यापासून वंचित करत आहे असे व्यक्‍तीला वाटायला लावणे हा सैतानाचा छुपा मार्ग आहे. आपल्यावर व इतरांवर त्याचे दूरगामी परिणाम काय होतील तसेच यहोवा आणि त्याच्या पुत्राशी असलेले आपले नाते यांच्याबद्दल खचितच नव्हे, तर आता आपल्याला काय सुख मिळू शकेल याचा विचार करण्याचा आग्रह सैतान आपल्याला करतो—गलती. ६:७, ८; १ करिंथ. ६:९, १०.

१०. हिंसेबद्दल आपल्या प्रवृत्तीला सुरूंग लावण्याचा प्रयत्न सैतान कोणत्या साधनाने करतो?

१० दुसरी स्वाभाविक इच्छा करमणुकीची होय. हितावह असल्यास ती शारीरिक, मानसिक व भावनिक दृष्ट्या तरतरी आणते. पण देवाच्या विचारांपासून आपल्या विचारांची फारकत करण्यासाठी विरंगुळ्याच्या प्रसंगांचा सैतान हुशारीने उपयोग करतो तेव्हा, आपली प्रतिक्रिया काय असते? उदाहरणार्थ, आपल्याला माहीत आहे की हिंसा आवडणाऱ्‍या लोकांचा यहोवाला वीट येतो. (स्तोत्र. ११:५) पण दूरदर्शनवर अथवा चित्रपटगृहात सिनेमामध्ये दाखवली जाते तेव्हा आपण स्वस्थ बसून ती सर्व पाहतो? किंवा खेळाच्या नावाखाली ती सादर केली जाते तेव्हा त्यात भाग घेणाऱ्‍यांना ओरडून प्रोत्साहनही देत आपण तिचा स्वीकार करतो का?—पडताळा उत्पत्ती ६:१३.

११. चेटकाबद्दल सत्य माहीत असलेली व्यक्‍तीही सावध नसल्यास कोणकोणत्या मार्गांनी त्याच्या जाळ्यात सापडू शकते?

११ भविष्य सांगणे, चेटूक करणे वा मृतांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न, अशा कोणत्याही प्रकारचा जादूटोणा करणाऱ्‍यांचा “यहोवाला वीट आहे” याचीही आपल्याला जाणीव आहे. भूतविद्याप्रवीण लोकांचा सल्ला घेण्याचा आपण विचार करणार नाही आणि त्यांच्या भूतविद्या करण्यासाठी आपल्या घरात त्यांचे स्वागत नक्कीच करणार नाही. पण ते आपल्या दूरदर्शनच्या पडद्यावर आल्यास आपण त्यांचे ऐकू व कुतुहलाने पाहू का? मांत्रिकाकडून आपण कधीही उपचार करून घेणार नसलो तरी गंडा-दोरा आपल्या तान्ह्या बाळाला वाचवील असा विचार करून तो बाळाच्या मनगटाला बांधू का? किंवा पवित्रशास्त्र “वशीकरणा”चा धिक्कार करते हे माहीत असताना तात्पुरता का होईना, मोहिनी-विद्या-प्रवीण माणसाला आपण आपल्या मनाचा ताबा घेऊ देऊ का?—अनु. १८:१०-१२; गलती. ५:१९-२१.

१२. (अ) ज्या कल्पना चूक आहेत असे आपल्याला ठाऊक आहे त्यांचा विचार करायला लावण्यासाठी संगीताचा वापर कसा केला जातो? (ब) एखाद्या व्यक्‍तीच्या वेशभूषेने, केशभूषेने व बोलण्याच्या पद्धतीने, यहोवाला ज्यांची जीवनपद्धती नापसंत आहे त्यांच्याबद्दल, कौतुक कसे दिसून येते? (क) सैतानाच्या फसव्या युक्त्यांना बळी पडणे टाळण्यासाठी आपण काय करण्याची गरज आहे?

१२ अयोग्य हेतूने, ‘जारकर्म व सर्व प्रकारची अशुद्धता ह्‍यांचे आपल्यामध्ये नावसुद्धा निघू नये’ असे आपण शास्त्रवचनात वाचले आहे. (इफिस. ५:३-५) पण सुरेख लय, लक्षात राहणारा ताल वा भारणाऱ्‍या ठेक्याच्या संगीताची अशा गीतांना चतुराईने साथ दिलेली असेल तर कसे? विवाहाविना लैंगिक संबंध, सुखासाठी अमली पदार्थांचा वापर व आणखी अशाच गोष्टींचा गौरव करणारी गाणी आपण नकळत घोळू लागू का? अशा गोष्टी करणाऱ्‍या लोकांच्या जीवनाची नक्कल आपण करू नये हे ठाऊक असताना त्यांच्या वेषभूषा, केशभूषा वा त्यांच्या बोलण्याच्या पद्धतीची नक्कल करून त्यांच्यातलेच एक आहोत असे दाखवण्याचा आपला कल असतो का? सैतान किती लबाड आहे! त्याच्या स्वतःच्या विकृत मनाच्या अनुरूप त्यांनी व्हावे म्हणून मानवांना भुलवण्यासाठी तो कशा कावेबाज पद्धती वापरतो! (२ करिंथ. ४:३, ४) त्याच्या कावेबाज युक्त्यांना बळी पडू नये म्हणून जगाबरोबर वाहात जाणे आपण टाळले पाहिजे. ‘सध्याच्या काळोखातील जगाचे अधिपती’ कोण आहेत ते आपण लक्षात ठेवले पाहिजे व त्यांच्या प्रभावाविरूद्ध निश्‍चयाने लढले पाहिजे.—इफिस. ६:१२; १ पेत्र ५:८.

विजयी होण्यास सुसज्ज

१३. आपण अपूर्ण असताना सैतानाच्या अधिपत्याखालील जगावर विजय मिळवणे, आपल्यापैकी कोणालाही कसे शक्य आहे?

१३ आपल्या मृत्यूपूर्वी येशू त्याच्या शिष्यांना म्हणाला: “धीर धरा; मी जगाला जिंकले आहे.” त्याच्यासारखे तेही विजयी होऊ शकत होते. आणि ६० वर्षांहून अधिक काळानंतर प्रेषित योहानाने लिहिले: “येशू देवाचा पुत्र आहे असा विश्‍वास जो धरतो त्याच्यावाचून जगावर जय मिळवणारा कोण आहे?” (योहा. १६:३३; १ योहा. ५:५) येशूने केल्याप्रमाणे त्याच्या आज्ञा पाळल्याने व त्याच्याप्रमाणे देवाच्या वचनावर विसंबल्याने असा विश्‍वास प्रदर्शित होतो. याशिवाय अधिक कशाची गरज आहे? तो ज्या मंडळीचा प्रमुख आहे तिच्या निकट सान्‍निध्यात आपण राहण्याची. आपण उणे पडतो तेव्हा मनःपूर्वक पश्‍चात्ताप करून येशूच्या बलिदानाच्या आधारे देवाची क्षमा मागावी. अशा रीतीने अपूर्ण असलो तरी आपणही विजयी होऊ शकतो.

१४. (अ) इफिसकरांस ६:१३-१८ वाचा. (ब) आत्मिक शस्त्रसामग्रीच्या प्रत्येक शस्त्राच्या फायद्यांवर चर्चा करण्यासाठी, आधार म्हणून पुरवलेल्या प्रश्‍नांचा व शास्त्रवचनांचा उपयोग करा.

१४ यशस्वी होण्यासाठी आपण कोणत्याही भागाकडे दुर्लक्ष न करता “देवाची संपूर्ण शस्त्रसामग्री” धारण करण्याची गरज आहे. कृपया इफिसकरांस ६:१३-१८ येथे आपले पवित्र शास्त्र उघडून त्यातील या शस्त्रसामग्रीचे वर्णन वाचा. त्यानंतर खालील प्रश्‍नांची उत्तरे देत असता प्रत्येक शस्त्र देत असलेल्या संरक्षणाचा फायदा तुम्हाला कसा मिळू शकेल हे विचारात घ्या.

 “कंबर सत्याने कसा”

 आपल्याला सत्य माहीत असले तरी नियमित अभ्यास, पवित्र शास्त्रातील सत्याचे चिंतन व सभांना उपस्थिती या गोष्टी आपले संरक्षण कसे करतात? (फिलिप्पै. ३:१; ४:८, ९; १ करिंथ. १०:१२, १३; २ करिंथ. १३:५; १ पेत्र १:१३. किंगडम इंटरलीनियर)

 “नीतिमत्त्वाचे उरस्त्राण”

 नीतिमत्त्वाचे हे मानक कोणी ठरवलेले आहे? (प्रकटी. १५:३)

 यहोवाच्या मार्गांविषयी आस्था जोपासण्यात उणे पडल्यामुळे, त्याची अवज्ञा केल्याने आपल्याला मोठी आध्यात्मिक हानी कशी होऊ शकते हे सोदाहरण सांगा. (पहा, १ शमुवेल १५:२२, २३; अनुवाद ७:३, ४.)

 “शांतीच्या सुवार्तेने लाभलेली सिद्धता पायी चढवा”

 देवाने शांतीसाठी केलेल्या तरतुदींबद्दल लोकांशी बोलण्यासाठी आपल्या पायांना कामास लावण्याने सुरक्षा कशी मिळते? (रोम. १०:१५; स्तोत्र. ७३:२, ३; १ तीम. ५:१३)

 “विश्‍वासाची (मोठी, न्यू.व.) ढाल”

 भक्कम पायावर उभारलेला विश्‍वास असल्यास, आपल्याला शंका वा भीतीग्रस्त करण्यासाठी चाललेल्या प्रयत्नांना आपली कशी प्रतिक्रिया असेल? (पडताळा २ तीम १:१२; २ राजे ६:१५-१७.)

 “तारणाचे शिरस्त्राण”

 उद्धाराच्या (तारणाच्या) आशेमुळे, भौतिक मालमत्तेबद्दल फाजील काळजीत अडकणे टाळण्यास कशी मदत होते? (१ तीम. ६:७-१०, १९)

 “आत्म्याची तरवार”

 आपल्या वा इतरांच्या आध्यात्मिकतेवर होणारे हल्ले परतवण्यासाठी आपण नेहमी कशावर अवलंबून राहावे? (स्तोत्र. ११९:९८; नीति. ३:५, ६; पडताळा मत्तय ४:३, ४.)

 याला अनुसरून इफिसकरांस ६:१८, १९ येथे आध्यात्मिक युद्धात यश मिळवण्यासाठी आणखी काय अत्यावश्‍यक असल्याचे दर्शवले आहे? त्याचा वापर कधी करावा? कोणासाठी करावा?

१५. (अ) आपण सर्व लढत असलेले हे आध्यात्मिक युद्ध केवळ व्यक्‍तिगत आहे का? (ब) या लढ्यात आपण चढाई कशी करू शकतो?

१५ ख्रिस्ती सैनिक म्हणून आपण आध्यात्मिक युद्ध करणाऱ्‍या एका मोठ्या सैन्याचा भाग आहोत. जागरूक राहून देवाच्या संपूर्ण शस्त्रसामग्रीचा सदुपयोग केल्यास या युद्धात आपण प्राणाला मुकणार नाही. उलट देवाची सेवा करणाऱ्‍या आपल्या सहकाऱ्‍यांना बळकटी येण्यास आपण मदत करू. हल्ला करण्यास, सैतानाचा ज्या शासनाला प्रखर विरोध आहे, त्या देवाच्या मसीही राज्याची सुवार्ता पसरवण्यास, आपण तयार व उत्सुक असू.

पुनरावलोकन चर्चा

• जगाच्या घटकांच्या आपसातील झगड्यात संपूर्ण तटस्थता ठेवण्याचा प्रयत्न यहोवाचे उपासक का करतात?

• ख्रिश्‍चनांचा आध्यात्मिक नाश करण्यासाठी सैतानाने वापरलेल्या काही फसव्या युक्त्या कोणत्या?

• या आध्यात्मिक युद्धात देवाची शस्त्रसामग्री कोणत्या महत्त्वाच्या मार्गांनी आपले संरक्षण करते?

[अभ्यासाचे प्रश्‍न]