व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

देवाच्या वचनावर घट्ट पकड ठेवा

देवाच्या वचनावर घट्ट पकड ठेवा

अध्याय ३

देवाच्या वचनावर घट्ट पकड ठेवा

१. (अ) देवाच्या वचनाची सत्यता प्राचीन इस्राएलांनी कशी अनुभवली? (ब) त्यात आपल्याला रस का आहे?

 “तुम्ही सर्व जण मनात विचार करा आणि लक्षात घ्या की, आपला देव परमेश्‍वर ह्‍याने तुमच्या बाबतीत हिताच्या ज्या गोष्टी सांगितल्या त्यातली एकही निष्फळ झाली नाही; तुमच्याबाबतीत त्या सर्व सिद्धीस गेल्या.” वचनदत्त देशामध्ये इस्राएल स्थाईक झाल्यावर यहोशवाने त्यांच्या वडील मंडळीला वरीलप्रमाणे आठवण करून दिली. परंतु त्यानंतरच्या काळात त्यांनी सातत्याने देवाच्या वचनाकडे लक्ष देऊन ते पाळले नाही. परिणाम काय झाला? यहोवाची आशीर्वादांची वचने जशी खात्रीलायक ठरली, तशाच अवज्ञेच्या परिणामाबद्दल त्याने सांगितलेल्या गोष्टीही त्याने केल्या, असे पवित्र शास्त्र स्पष्ट करते. (यहो. २३:१४-१६) तो अहवाल आणि उर्वरित पवित्र शास्त्र आपल्या शिक्षणासाठी जतन केले गेले—अशासाठी की, “आपण आशा धरावी” आणि ती आशा गमावेल असे काही आपण करू नये.—रोम. १५:४.

२. (अ) पवित्र शास्त्र कोणत्या अर्थाने “ईश्‍वर-प्रेरित” आहे? (ब) ते माहीत असल्याने आपल्यावर कोणती जबाबदारी आहे?

सुमारे ४० मानवी “लेखनिक” पवित्र शास्त्राची नोंद करण्यास वापरले गेले असले तरी यहोवा स्वत: त्याचा लेखक आहे. त्यातल्या सर्व गोष्टी लिहिण्यात त्याने कृतीशील मार्गदर्शन केले असा त्याचा अर्थ आहे का? होय. प्रेषित पौलाने प्रामाणिकपणे म्हटल्याप्रमाणे: “प्रत्येक शास्त्रलेख ईश्‍वरप्रेरित आहे.” ह्‍याची खात्री पटलेली असल्याने जसा आपण प्रयत्न करतो, तसा त्याकडे ध्यान देण्याचा व त्यातील शिकवणींनुसार त्यांचे जीवन घडवण्याचा प्रयत्न करण्यास, सगळीकडच्या लोकांना आपण आग्रह करतो.२ तीम. ३:१६, न्यू.व.; १ थेस्स. २:१३.

त्याची कदर करण्यास इतरांना कशामुळे मदत होईल?

३. पवित्र शास्त्र हे देवाचे वचन असल्याची ज्यांना खात्री नाही, अशांना मदत करण्याचा सर्वोत्तम मार्ग कोणता?

अर्थात, पवित्र शास्त्र हे खरोखरच देवाचे वचन आहे अशी आपल्याला वाटणारी खात्री, ज्यांच्याशी आपण बोलतो त्यातल्या अनेकांना वाटत नाही. आपण त्यांना कशी मदत करू शकू? अनेकदा सर्वोत्तम मार्ग म्हणजे, पवित्र शास्त्र उघडून त्यात काय आहे ते त्यांना दाखवणे. “देवाचे वचन सजीव, सक्रीय, कोणत्याही दुधारी तरवारीपेक्षा तीक्ष्ण असून . . . मनातील विचार व हेतू ह्‍यांचे परीक्षक असे आहे.” (इब्री. ४:१२) “देवाचे वचन” हे पवित्र शास्त्रात नमूद केलेले त्याचे अभिवचन आहे. तो मृत इतिहास नव्हे तर सजीव असून अनिवार्यपणे पूर्ततेकडे वाटचाल करत आहे. तसे करत असताना, त्याच्याशी संबंध आलेल्या व्यक्‍तींचे, अटी पूर्ण करण्याविषयी खरे अंत:स्थ हेतू प्रकट होतात. आपल्या वैयक्‍तिक बोलण्यामुळे होणाऱ्‍या परिणामापेक्षा त्याचा प्रभाव फारच मोठा असतो.

४. पवित्र शास्त्रातल्या सत्यांबद्दल कोणत्या साध्या खुलाशांनी त्याच्याविषयी काही लोकांचे मत बदलले? का?

पवित्र शास्त्रात देवाचे नाव फक्‍त पाहण्याने अनेकांच्या जीवनाला नवे वळण लागले आहे. जीवनाच्या उद्देशाबद्दल, देवाने दुष्टाईला परवानगी देण्याच्या कारणाबद्दल, वर्तमान घटनांच्या महत्त्वाबद्दल किंवा देवाच्या राज्यावर केंद्रित असलेल्या वास्तव आशेबद्दल, पवित्र शास्त्र काय म्हणते ते दाखवल्यावर इतरांनी त्याचा अभ्यास करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या देशात, धार्मिक प्रघातांनी लोकांचा दुरात्म्यांकडून छळ होण्यास मोकळीक दिली आहे, तेथे त्याची कारणे व त्यापासून सुटका मिळवण्याच्या मार्गाबद्दल पवित्र शास्त्रातल्या स्पष्टीकरणामुळे कुतूहल निर्माण केले आहे. हे मुद्दे त्यांना इतके मनोवेधक का वाटतात? कारण या अत्यंत महत्त्वाच्या गोष्टींबद्दल खात्रीलायक माहितीचा, पवित्र शास्त्र हा एकमेव स्रोत आहे.—स्तोत्र. ११९:१३०.

५. त्याचा पवित्र शास्त्रावर विश्‍वास नाही, असे एखादा म्हणत असल्यास, त्याचे कारण काय असू शकेल?

परंतु, पवित्र शास्त्रावर त्याचा विश्‍वास नाही असे एखाद्या व्यक्‍तीने आपल्याला सरळ सांगितले तर? त्यामुळे संभाषण तेथेच संपावे का? तो विचार करण्यास तयार असल्यास, नाही. देवाच्या वचनाच्या वतीने खंबीरपणे बोलण्याची आपली जबाबदारी आहे असे आपल्याला वाटलेच पाहिजे. पवित्र शास्त्र हे ख्रिस्ती धर्मजगताचे पुस्तक असावे असे त्याचे मत असेल. ढोंगीपणा, राजकारणात लुडबुड, तसेच सतत पैशाची याचना करण्याच्या त्यांच्या पूर्वइतिहासामुळे त्याचे पवित्र शास्त्राबद्दल वाईट मत झाले असेल. त्याबद्दल त्यालाच का विचारू नये? ख्रिस्ती धर्मजगताच्या प्रापंचिक वर्तनाचा पवित्र शास्त्राने केलेला निषेध व ख्रिस्ती धर्मजगत आणि ख्रिस्ती धर्म यांच्यातल्या फरकाच्या मुद्यांमुळे त्याचे कुतूहल जागृत होऊ शकेल.—पडताळा मत्तय १५:७-९; याकोब ४:४; मीखा ३:११, १२.

६. (अ) पवित्र शास्त्र हे देवाचे वचन आहे अशी व्यक्‍तिशः तुमची खात्री कशाने पटली आहे? (ब) पवित्र शास्त्र खरोखरच देवाकडून आलेले असल्याची जाणीव लोकांना होण्यासाठी समजूत घालण्याचे आणखी कोणते मार्ग वापरता येतील?

ईश्‍वरी प्रेरणेच्या प्रमाणांच्या स्पष्ट चर्चेने इतरांना मदत होते. पवित्र शास्त्र देवाकडून आलेले असल्याचे कोणत्या पुराव्याने तुम्हाला स्पष्टपणे पटवले? त्याच्या उगमाबद्दल पवित्र शास्त्र जे म्हणते, त्याने? (२ तीम. ३:१६, १७; प्रकटी. १:१) की, भविष्याबद्दल तपशीलवार माहिती असल्याचे दर्शवणाऱ्‍या अनेक भविष्यवाण्या पवित्र शास्त्रात असल्याने, त्यांचा उगम अतिमानवी असावा, ही गोष्ट? (२ पेत्र १:२०, २१; यश. ४२:९) अथवा कदाचित, १,६१० वर्षांच्या कालावधीत अनेक माणसांनी लिहिलेला असला तरी, पवित्र शास्त्रातल्या मजकुरातली सुसंगती? किंवा त्या काळातल्या इतर साहित्याच्या अगदी विरुद्ध त्याची शास्त्रीय अचूकता? किंवा त्याच्या लेखकांचा स्पष्टवक्‍तेपणा? की, त्याला नष्ट करण्याच्या द्वेषपूर्ण प्रयत्नातूनही त्याचे टिकून राहाणे? ज्या गोष्टीची छाप तुमच्यावर पडली तिचा उपयोग, इतरांना मदत करण्यासाठी करता येऊ शकतो.

आपले वैयक्‍तिक पवित्र शास्त्र वाचन

७, ८. (अ) पवित्र शास्त्रासंबंधी आपण वैयक्‍तिकरित्या काय करत असले पाहिजे? (ब) पवित्र शास्त्राच्या वैयक्‍तिक वाचनाच्या जोडीला आपल्याला आणखीन कशाची गरज आहे व स्वत: पवित्र शास्त्र ही गोष्ट कशी दाखवते? (क) यहोवाच्या उद्देशांबद्दल वैयक्‍तिकपणे तुम्ही समज कशी प्राप्त केली आहे?

पवित्र शास्त्रावर विश्‍वास ठेवण्यास इतरांना मदत करण्याबरोबर, आपण स्वत: ते नियमितपणे वाचण्यासाठी वेळ काढण्याची गरज आहे. तुम्ही तसे करत आहात का? आतापर्यंत लिहिलेल्या सर्व पुस्तकांमध्ये हे पुस्तक सर्वात महत्त्वाचे आहे. अर्थात, ते वाचल्यास आपल्याला इतर कशाचीही गरज नाही, असा अर्थ नव्हे. स्वतंत्रपणे संशोधन करून आपल्याला सर्वकाही कळेल, असा विचार करून स्वत:ला इतर सर्वांपासून अलग करण्याविरूद्ध शास्त्रवचने इशारा देतात. आपल्याला संतुलित ख्रिस्ती व्हावयाचे असल्यास वैयक्‍तिक अभ्यास व सभांमध्ये नियमित उपस्थिती, या दोहोंची गरज आहे.—नीती. १८:१; इब्री. १०:२४, २५.

एक एथिओपियन (कुशी) षंढ यशयाची भविष्यवाणी वाचत असताना, देवदूताने फिलिप्प या ख्रिस्ती सुवार्तिकाला त्याच्याकडे पाठवले. आपल्या फायद्यासाठी पवित्र शास्त्र त्याबद्दल सांगते. फिलिप्पाने त्या माणसाला विचारले: “आपण जे वाचीत आहा ते आपल्याला समजते काय?” नम्रपणे त्या एथिओपियन (कुशी) माणसाने उत्तर दिले: “कोणी मार्ग दाखवल्याखेरीज मला कसे समजणार?” शास्त्रवचनांच्या त्या उताऱ्‍याचा खुलासा करण्यास त्याने फिलिप्पाला आग्रह केला. फिलिप्प, त्या शास्त्रवचनांवर स्वत:चे मत सांगणारा, कोणी एक स्वतंत्र शास्त्र वाचक नव्हता. पवित्र शास्त्रात नमूद केलेल्या गोष्टी दाखवतात की, यरूशलेम येथील मंडळीतल्या प्रेषितांशी त्याने निकट संबंध ठेवला होता. त्यामुळे त्या संस्थेमार्फत यहोवा उपलब्ध करून देत असलेल्या शिकवणीचा फायदा घेण्यात तो त्या एथिओपियन माणसाची मदत करू शकला. (प्रे. कृत्ये ६:५, ६; ८:५, १४, १५, २६-३५) त्याचप्रमाणे आजही, आपल्यातल्या कोणाला यहोवाच्या उद्देशांची स्पष्ट व अचूक समज स्वत:च्या बळावर प्राप्त झाली आहे? उलट, यहोवा त्याच्या दृश्‍य संस्थेमार्फत देत असलेल्या मदतीची आपल्याला गरज होती व अजूनही असते.

९. पवित्र शास्त्र वाचनाच्या कोणत्या कार्यक्रमांचा आपणा सर्वांना फायदा होऊ शकतो?

पवित्र शास्त्र समजण्यात आणि वापरण्यात आपल्याला मदत व्हावी म्हणून यहोवाची संस्था टेहळणी बुरुज व इतर संबंधित प्रकाशनांद्वारे उत्तम शास्त्रीय साहित्य पुरवते. यासोबत, यहोवाच्या साक्षीदारांच्या मंडळ्यांमधल्या ईश्‍वरशासित सेवा-प्रशाळांमध्ये आपल्याकरता पवित्र शास्त्र वाचनाचे एक नियमित वेळापत्रक ठेवलेले आहे. शिवाय यहोवाचे काही साक्षीदार क्रमवार पवित्र शास्त्र वाचन करतात. पवित्र शास्त्राचे परिक्षण करण्यात वेळ खर्च केल्याने मोठा लाभ होतो. (स्तोत्र. १:१-३; १९:७, ८) संपूर्ण पवित्र शास्त्र तुम्ही व्यक्‍तिशः वाचले आहे का? नसल्यास, तसे करण्याचा विशेष प्रयत्न करा. प्रत्येक गोष्ट पूर्णपणे कळली नाही तरी त्याची ढोबळ माहिती तुम्हाला असणे देखील बहुमोल ठरेल. दररोज फक्‍त चार किंवा पाच पाने वाचली तरी तुम्ही सुमारे एका वर्षात संपूर्ण पवित्र शास्त्र वाचाल.

१०. (अ) तुम्ही स्वत: पवित्र शास्त्र वाचन कधी करता? (ब) नियमितपणा महत्त्वाचा का आहे?

१० असे पवित्र शास्त्र वाचन करण्याची योजना तुम्ही वैयक्‍तिकपणे कधी करू शकाल? दिवसाकाठी फक्‍त १० किंवा १५ मिनिटे काढू शकलात तरी ते किती हितकारक होईल! तसे न जमल्यास निदान दर आठवडयाला त्यासाठी नियमित वेळ ठरवा, व ती पाळा. जेवणाप्रमाणे पवित्र शास्त्र वाचन ही आयुष्यभराची सवय असावी. तुम्हाला माहीत आहे की, एखाद्या व्यक्‍तीच्या आहाराच्या सवयी बिघडल्यास त्याची प्रकृती खराब होते. त्याचप्रमाणे, आपल्या आध्यात्मिकतेचेही आहे. “परमेश्‍वराच्या मुखातून निघणाऱ्‍या प्रत्येक वचना”वर नियमित पोषण होण्यावर आपले जीवन अवलंबून आहे.—मत्त. ४:४.

११. पवित्र शास्त्र वाचताना आपले ध्येय काय असावे?

११ पवित्र शास्त्र वाचण्यात आपला उद्देश काय असावा? फक्‍त ठराविक संख्येची पाने वाचणे किंवा फक्‍त सार्वकालिक जीवन प्राप्त करणे एवढेच आपले ध्येय असल्यास ते चूक ठरेल. सनातन हितासाठी आपले हेतू उदात्त असले पाहिजेत. ते म्हणजे, देवाविषयी प्रेम, त्याला अधिक चांगले जाणण्याची लालसा तसेच त्याची इच्छा जाणण्याची व स्वीकारार्ह रीतीने त्याची भक्‍ती करण्याची ओढ असली पाहिजे. (योहा. ५:३९-४२) “हे परमेश्‍वरा, तुझे मार्ग मला दाखीव; तुझ्या वाटा मला प्रकट कर.” असे म्हणणाऱ्‍या शास्त्र-लेखकाप्रमाणे आपलाही कल असला पाहिजे.स्तोत्र. २५:४.

१२. (अ) “पूर्ण ज्ञान” प्राप्त करणे अगत्याचे का आहे व ते मिळवण्यासाठी वाचन करताना काय प्रयत्न करावा लागण्याची शक्यता आहे? (ब) पृष्ठ २७ वर दाखवल्याप्रमाणे, पवित्र शास्त्रात वाचत असलेल्या गोष्टींचे, आपण कोणत्या दृष्टिकोनातून हितकारक विश्‍लेषण करू शकू? (क) या परिच्छेदाच्या शेवटी दिलेल्या प्रश्‍नांची उत्तरे देऊन हे पाच मुद्दे एकानंतर एक असे सोदाहरण सिद्ध करा. आपले पवित्र शास्त्र जरूर वापरा.

१२ ती शिकवण मिळत असताना, “पूर्ण ज्ञान” प्राप्त करण्याची ओढ आपल्याला असावी. त्याशिवाय आपण देवाचे वचन आपल्या जीवनात योग्यपणे कसे आचरणात आणू शकू वा ते अचूकपणे इतरांना कसे समजावून सांगू शकू? (कलस्सै. ३:१०; २ तीम. २:१५) पूर्ण (अचूक, न्यू.व.) ज्ञान प्राप्त करण्यासाठी आपण काळजीपूर्वक वाचण्याची गरज आहे. आणि तो भाग गहन असल्यास, त्याचा अर्थ नीट लक्षात येण्यासाठी आपल्याला तो अधिक वेळा वाचावा लागेल. त्या मजकुराचा विचार वेगवेगळ्या दृष्टीकोनातून करून, त्यावर चिंतन करण्यासाठी वेळ काढल्यास देखील आपल्याला फायदा होईल. या पुस्तकाच्या २७व्या पानावर अभ्यासासाठी मननाच्या पाच बहुमोल मार्गांवर प्रकाश टाकण्यात आला आहे. त्यातील एक वा अनेकांचा उपयोग करून, शास्त्रातील अनेक भागांचे फायदेशीर विश्‍लेषण करता येते. ते कसे हे पुढे दिलेल्या पानांवरील प्रश्‍नांची उत्तरे देतांना तुम्हाला दिसेल.

 () अनेकदा तुम्ही वाचत असलेला शास्त्रवचनाचा भाग, यहोवा कशाप्रकारची व्यक्‍ती आहे याचा संकेत देतो.

 यहोवाच्या सृष्टीच्या कामांबद्दल पवित्र शास्त्र सांगत असलेल्या गोष्टींविषयी आपण गुणग्राहकतेने चिंतन करतो तेव्हा त्याचा, आपल्या मनातल्या त्याच्याविषयी असलेल्या भावनेवर कसा परिणाम होतो? (स्तोत्र. १३९:१३, १४; इयोबाच्या ३८ ते ४२ अध्यायांमध्ये ३८:१, २४०:२, ; आणि मग ४२:१-६ कडे विशेष ध्यान द्या.)

 योहान १४:९, १० येथील येशूचे शब्द लक्षात घेता, लूक ५:१२, १३ मध्ये नोंदलेल्या घटनांवरून आपण यहोवाबद्दल काय अनुमान काढू शकतो?

 () पवित्र शास्त्राच्या मध्यवर्ती कल्पनेला, म्हणजेच वचनदत्त संतान येशू ख्रिस्ताच्या अधिपत्याखालील राज्याद्वारे, यहोवाच्या नावाच्या समर्थनाला, या वृत्तांताने कसा हातभार लागतो याचा विचार करा.

 इजिप्त (मिसर) वरील पीडांचा या मध्यवर्ती कल्पनेशी कसा संबंध आहे? (निर्गम ५:२; ९:१६; १२:१२ पहा.)

 मवाबी रूथविषयी हर्षदायक वृत्तांताबद्दल काय म्हणता येईल? (रूथ ४:१३-१७; मत्त. १:१, ५)

 येशूच्या भावी जन्माबद्दल गब्रीएलाने मरीयेपुढे केलेली घोषणा त्यात कशी बसते? (लूक १:२६-३३)

 पेन्टेकॉस्टला येशूच्या शिष्यांचा पवित्र आत्म्याने झालेला अभिषेक महत्त्वपूर्ण का आहे? (प्रे. कृत्ये २:१-४; १ पेत्र २:४, ५, ९; २ पेत्र १:१०, ११)

 () विशिष्ट वचनांचा अर्थ संदर्भानुसार लागतो.

 रोमकरांस ५:१ व ८:१६ मधील विधाने कोणाला उद्देशून आहेत? (रोमकरांस १:७ पहा.)

 देवाच्या नवीन व्यवस्थेमध्ये पृथ्वीवरच्या जीवनाबद्दल १ करिंथकरांस २:९ येथे सांगितले आहे, असे संदर्भ सूचित करतो का? ६-८ वचनांमध्ये दाखवल्याप्रमाणे, पौल लिहीत असलेल्या गोष्टींबद्दल कोणाच्या डोळ्यांना व कानांना समज नव्हती?

 () तुम्ही वाचत असलेल्या गोष्टी वैयक्‍तिकपणे तुम्हाला कशा लागू करता येतील, हे स्वत:ला विचारा.

 काइनाने हाबेलाची हत्या केल्याचा अहवाल केवळ ऐतिहासिक महत्त्वाचा आहे की, त्यात आपल्यासाठी मार्गदर्शन आहे? (उत्प. ४:३-१२; १ योहा. ३:१०-१५; इब्री. ११:४)

 इस्त्राएलांच्या, अरण्यातल्या अनुभवांबद्दल (निर्गम ते अनुवाद या पुस्तकांमध्ये) आपण वाचतो तेव्हा, त्यातून वैयक्‍तिकपणे काय बोध घ्यावा? (१ करिंथ. १०:६-११)

 वर्तनाविषयी, अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांना दिलेला सल्ला, पृथ्वीवर सार्वकालिक जीवनाची आशा असलेल्यांना देखील लागू आहे का? (पडताळा गणना १५:१६; योहान १०:१६.)

 ख्रिस्ती मंडळीमध्ये आपला लौकिक चांगला असला तरी, आपल्याला आधीच माहीत असलेला पवित्र शास्त्राचा उपदेश उत्तरोत्तर अधिक लागू करण्याच्या मार्गांचा विचार करण्याची गरज आहे का? (२ करिंथ. १३:५; १ थेस्स. ४:१)

 () तुम्ही वाचत असलेल्या गोष्टींचा उपयोग इतरांना मदत करण्यासाठी कसा करता येईल याकडे लक्ष द्या.

 याईराच्या मुलीच्या पुनरुत्थानाच्या वृत्तांताने कोणाला मदत होईल? (लूक ८:४१, ४२, ४९-५६)

१३. पवित्र शास्त्र वाचनाच्या सतत चालणाऱ्‍या कार्यक्रमापासून व यहोवाच्या संस्थेसह होणाऱ्‍या अभ्यासापासून आपण कोणत्या परिणामांची अपेक्षा करू शकतो?

१३ अशा रीतीने केलेले पवित्र शास्त्राचे वाचन किती फलदायक ठरते! पवित्र शास्त्राचे वाचन हे नक्कीच एक आव्हान आहे. आयुष्यभर त्यावर मेहनत करून फायदा प्राप्त करावा, असा तो प्रकल्प आहे. पण ते करत असताना आपण आध्यात्मिकरित्या प्रबळ होऊ. ते आपल्याला, आपला प्रेमळ पिता यहोवा आणि आपले ख्रिस्ती बांधव, यांच्या अधिक निकट आणील. “जीवनाच्या वचनावरची पकड घट्ट” ठेवावी, या उपदेशाकडे ध्यान देण्यास ते आपली मदत करील.—फिलिप्पै. २:१६, न्यू.व.

पुनरावलोकन चर्चा

• पवित्र शास्त्र कशासाठी लिहिले गेले व आपल्या दिवसापर्यंत का जपले गेले?

• त्याची कदर करण्यास आपण इतरांना कशी मदत करू शकतो?

• पवित्र शास्त्राचे नियमित वैयक्‍तिक वाचन फायदेशीर का आहे? आपण जे वाचतो त्याचे कोणत्या पाच दृष्टिकोनातून हितकारकपणे विश्‍लेषण करता येईल?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[२७ पानांवरील चौकट/चित्रं]

तुम्ही पवित्र शास्त्र वाचाल तेव्हा विचार करा—

प्रत्येक भाग, एक व्यक्‍ती म्हणून यहोवाबद्दल तुम्हाला काय सांगतो

पवित्र शास्त्राच्या समग्र मध्यवर्ती कल्पनेशी त्याचा कसा संबंध आहे

संदर्भाचा अर्थावर कसा परिणाम होतो

त्याचा तुमच्या जीवनावर कसा परिणाम व्हावा

इतरांची मदत करण्यासाठी तुम्ही त्याचा कसा उपयोग करू शकता