व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

मोशेच्या नियमशास्त्राचा तुमच्याकरता असलेला अर्थ

मोशेच्या नियमशास्त्राचा तुमच्याकरता असलेला अर्थ

अध्याय १९

मोशेच्या नियमशास्त्राचा तुमच्याकरता असलेला अर्थ

१. (अ) इ.स. ३६ पासून सुंता न झालेले परराष्ट्रीय, ख्रिस्ती या नात्याने यहोवाला मान्य होते असे कशाने सूचित झाले? (ब) परंतु कोणत्या वादाबद्दल सुरूवातीच्या ख्रिश्‍चनांच्या भावना प्रखर होत्या?

 मोशेच्या नियमशास्त्राला अनुसरणे परराष्ट्रीयांना अगत्याचे होते किंवा नाही, हा पौलाच्या काळात मोठ्या चर्चेचा विषय होता. इ.स. ३६ मध्ये, सुंता न झालेल्या परराष्ट्रीयांवर पवित्र आत्मा आला होता ही गोष्ट खरी. परंतु, परराष्ट्रीय शिष्यांची सुंता झालीच पाहिजे व त्यांना मोशेचे नियमशास्त्र पाळण्यास शिकवले गेलेच पाहिजे असे, यहुदी पार्श्‍वभूमीच्या काही ख्रिश्‍चनांना प्रखरतेने वाटले. वस्तुतः, ते नियमशास्त्र अथवा त्याचा काही भाग अनुसरण्याची त्यांना जरूरी होती का? इ.स. ४९च्या सुमाराला हा प्रश्‍न यरूशलेम मधील नियमन मंडळाकडे पाठवण्यात आला.—प्रे. कृत्ये १०:४४-४८; १५:१, २, ५.

२. आपल्याला या वादामध्ये आस्था का आहे?

त्याच्या फलनिष्पत्तीमध्ये आपल्याला अत्यंत आस्था आहे. का बरे? शब्बाथ पाळण्यासारख्या, नियमशास्त्राच्या काही अटीनुसार ख्रिश्‍चनांनी वागले पाहिजे असा वाद घालणारे लोक काही वेळा आपल्याला भेटतात याच कारणामुळे नव्हे तर, “नियमशास्त्र पवित्र आहे, आणि आज्ञा पवित्र, यथान्याय व उत्तम आहे” असे पवित्र शास्त्र स्वतः म्हणते या कारणामुळेही. (रोम. ७:१२) मोशे नियमशास्त्राच्या कराराचा मध्यस्त होता म्हणून मोशेचे नियमशास्त्र असा त्याचा उल्लेख केला जात असला तरी, ते नियमशास्त्र वस्तुतः यहोवापासून अस्तित्वात आले.—निर्ग. २४:३, ८.

नियमशास्त्राचे प्रयोजन काय?

३. इस्राएल लोकांना नियमशास्त्र का दिले गेले?

यहोवाने इस्राएलांना नियमशास्त्र का दिले हे आपल्याला समजले आहे किंवा नाही याचा परिणाम, आज नियमशास्त्राकडे पाहण्याच्या आपल्या दृष्टिकोनावर होतो. पवित्र शास्त्र खुलासा करते: “ज्या संतानाला वचन दिले होते ते येईपर्यंत नियमशास्त्र हे उल्लंघनामुळे [अब्राहामाशी केलेल्या करारासोबत] लावून देण्यात आले . . . ह्‍यावरून आपण विश्‍वासाने नीतिमान ठरविले जावे म्हणून नियमशास्त्र आपल्याला ख्रिस्ताकडे पोहचविणारे बालरक्षक [शिक्षक, न्यू.व.] होते.” (गलती. ३:१९, २४) ही गोष्ट नियमशास्त्राने कशी केली?

४. (अ) नियमशास्त्राने “उल्लंघन” कसे ‘उघड केले’? (ब) तसेच त्याने विश्‍वासूंना ख्रिस्ताकडे कसे पोहोचवले?

जीवनाच्या विविध पैलूंचा अंतर्भाव करणारा आदर्श नमुना रेखाटून यहुदी लोक पापी असल्याचे त्याने दाखवले. उद्देश चांगला असला व परिश्रमपूर्वक प्रयत्न केले असले तरी, त्याच्या अटी त्यांना पूर्ण करता आल्या नाहीत हे स्पष्ट झाले. अपूर्णत्वातील मानवी कुटुंबाचा नमुना म्हणून यहुदी लोकांचा उपयोग करून, आपल्यातील प्रत्येकासहित संपूर्ण जग देवाच्या दृष्टीने शिक्षेला पात्र असल्याचे नियमशास्त्राने उघड केले. (रोम. ३:१९, २०) अशा तऱ्‍हेने मानवजातीला असलेल्या एका उद्धारकाच्या गरजेवर जोर दिला आणि तो उद्धारक म्हणून, विश्‍वासू लोकांना त्याने येशू ख्रिस्ताकडे नेले. कशा प्रकारे? नियमशास्त्राचे अचूक पालन करणारा एकमेव व म्हणून एकमेव पापरहित मानव, अशी त्याने त्याची ओळख करून दिली. नियमशास्त्रातील प्राण्यांच्या बलींना मर्यादित मूल्य होते. परंतु एक पूर्ण मानव म्हणून, विश्‍वास ठेवणाऱ्‍या सर्वांसाठी खरोखरच पापहारक आणि सार्वकालिक जीवनाचा मार्ग खुला करणारे बलिदान म्हणून येशू आपले जीवन देऊ शकला.—योहा. १:२९; ३:१६; १ पेत्र १:१८, १९.

५. दिलेल्या शास्त्रवचनांचा उपयोग करून, या परिच्छेदात समाविष्ट असलेल्या प्रश्‍नांची उत्तरे द्या.

ही पार्श्‍वभूमी लक्षात ठेवून, तुम्ही खालील प्रश्‍नांना कशी उत्तरे द्याल?

 मोशेचे नियमशास्त्र सर्व मानवजातीला बंधनकारक असावे असा उद्देश कधी होता का? (स्तोत्र. १४७:१९, २०; निर्ग. ३१:१२, १३)

 कधी काळी नियमशास्त्राचा अंत होईल याची काही सूचना यहोवाने इस्राएलांना दिली होती का? (यिर्म. ३१:३१-३३; इब्री. ८:१३)

 बाकीचे नियमशास्त्र रद्द झाल्यावर, साप्ताहिक शब्बाथ पाळण्याच्या अटीचा अंतर्भाव असलेल्या दहा आज्ञा जारी राहिल्या का? (कलस्सै. २:१३, १४, १६; २ करिंथ. ३:७-११ [निर्गम ३४:२८-३० मध्ये स्पष्ट केल्याप्रमाणे]; रोम. ७:६, ७)

 यहोवाने कशाच्या योगे नियमशास्त्राचा अंत केला? (कलस्सै. २:१३-१७; मत्त. ५:१७, १८; रोम. १०:४)

६. मोशेचे नियमशास्त्र अजूनही लागू असल्याच्या दाव्याने काय सूचित होते?

ही माहिती लक्षात घेता, मोशेचे नियमशास्त्र अजूनही लागू आहे असा वाद घालण्यात काय सूचित होते? वस्तुतः येशू ख्रिस्तावरील विश्‍वास नाकारणे, असा याचा अर्थ होतो. असे का? कारण हा दृष्टीकोन, येशूने नियमशास्त्र पूर्ण करून त्याचा अंत करण्यासाठी देवाचा मार्ग खुला केला, ही वस्तुस्थिती नाकारतो. ख्रिस्ती असल्याचा दावा करणाऱ्‍या, परंतु नियमशास्त्र किंवा त्याचा काही भाग पाळण्याबाबत अनुकूल मताचा परिणाम झालेल्या लोकांना प्रेषित पौलाने परखडपणे लिहिले: “जे तुम्ही नियमशास्त्राने नीतिमान ठरू पाहता त्या तुमचा ख्रिस्ताबरोबरचा संबंध नाहीसा झाला आहे; तुम्ही कृपेला अंतरला आहां.”—गलती. ५:४; तसेच, रोमकरांस १०:२-४ पहा.

७. (अ) नियमशास्त्राची काही वैशिष्ट्ये अजून लागू असल्याचा वाद करणाऱ्‍यांना कशाची पूर्ण जाणीव झालेली नाही? (ब) खिश्‍चन कार्ये किती महत्त्वाची असतात, आणि आपल्याला सार्वकालिक जीवन मिळण्याशी त्यांचा काय संबंध आहे?

नियमशास्त्राची काही वैशिष्ट्ये लागू राहावी म्हणून वाद घालणाऱ्‍यांना, देवाच्या हिशेबी नीतिमान लौकिक एखाद्याच्या नियमशास्त्र पाळण्याच्या कर्मावर नव्हे तर येशूच्या बलिदानाच्या मूल्यावरील त्याच्या विश्‍वासावर अवलंबून असतो, याचे पूर्ण आकलन नाही. (गलती. ३:११, १२) अशाच कार्यांनी व्यक्‍तीने स्वतःला नीतिमान सिद्ध केले पाहिजे असे त्यांना वाटते आणि ही गोष्ट पापी मानवांना अशक्य आहे. ख्रिश्‍चनांना लागू होणाऱ्‍या, देव आणि ख्रिस्ताच्या आज्ञा पाळण्यासाठी कार्य, हे मात्र खरोखरीच महत्त्वाचे आहे. (याको. २:१५-१७; मत्त. २८:१९, २०) आपले प्रेम व विश्‍वास व्यक्‍त करण्याची ती साधने आहेत. त्यांची उणीव, आपला विश्‍वास निर्जीव असल्याचे सूचित करील. कितीही परिश्रमपूर्वक कार्य केले तरी आपण उद्धार कमावू शकत नाही. येशू ख्रिस्ताच्या बलिदानाविना पाप व मृत्यूपासून उद्धार शक्य होणार नाही, तेव्हा सार्वकालिक जीवन ही येशू ख्रिस्तामार्फत देवाने दिलेली भेट, अलौकिक कृपेची अभिव्यक्‍ती आहे, आपल्या कामांचा मोबदला नव्हे.—इफिस. २:८, ९; रोम. ३:२३, २४; ६:२३.

८. मोशेचे नियमशास्त्र परराष्ट्रीय ख्रिश्‍चनांना लागू करण्याच्या वादाबद्दल, पहिल्या शतकातल्या नियमन मंडळाने काय निर्णय घेतला?

परराष्ट्रीय ख्रिश्‍चनांना मोशेचे नियमशास्त्र लागू करण्याबाबतचा वाद पहिल्या शतकात यरूशलेम मधल्या नियमन मंडळापुढे सादर केला गेला तेव्हा, त्यांचा निर्णय या वस्तुस्थितीशी सुसंगत होता. परराष्ट्रीय विश्‍वासू लोकांवर पवित्र आत्म्याचा वर्षाव होण्यापूर्वी मोशेच्या नियमशास्त्राशी आज्ञाधारक कार्ये त्यांनी करावीत, अशी अपेक्षा यहोवा करत नसल्याचे त्यांनी जाणले हाते. त्या नियमन मंडळाने दिलेल्या निर्णयात, नियमशास्त्राशी सुसंगत अशा, मनाई केलेल्या “जरूरीच्या गोष्टीं”ची यादी दिली होती हे खरे, पण त्या गोष्टी, नियमशास्त्रापूर्वीच्या घटनांबद्दल पवित्र शास्त्रातील वृत्तांतावर आधारित होत्या. तेव्हा, मोशेच्या नियमशास्त्राला अनुसरण्याची जबाबदारी परराष्ट्रीय ख्रिश्‍चनांवर लादली गेली नाही, तर मोशेहून आधीच्या मान्यता प्राप्त मानकांना पुष्टी देण्यात आली.—प्रे. कृत्ये १५:२८, २९; पडताळा उत्पत्ती ९:३, ४; ३४:२-७; ३५:२-५.

९. (अ) यहुद्यांनी मोशेचे नियमशास्त्र पाळावे अशी अपेक्षा देव करतो का? (ब) ख्रिस्त ज्या रीतीने मरण पावला त्यामुळे त्यांच्यासाठी कोणती विशेष तरतूद करण्यात आली?

इ.स. ३३च्या पेन्टेकॉस्ट नंतर स्वतः यहुद्यांनी मोशेचे नियमशास्त्र पाळावे अशी देवाची अपेक्षा नव्हती. आणि विश्‍वास धरणाऱ्‍या यहुद्यांना ते हर्षाचे विशेष कारण वाटत होते. का बरे? परराष्ट्रीय लोकही पापी असले व त्यामुळे मृत्यू पावत असले तरी, यहुदी लोक नियमशास्त्राच्या कराराचे उल्लंघन करणारे असल्याने फक्‍त त्यांच्यावरच देवाचा कोप होता. परंतु ख्रिस्त ज्या रीतीने मरण पावला—जणू एखादा अत्यंत निंद्य गुन्हेगार असल्यासारखा खांबाला खिळून—त्यामुळे त्याच्यावर विश्‍वास ठेवणाऱ्‍या यहुद्यांची जागा त्याने घेतली व नियमशास्त्राच्या उल्लंघनामुळे त्यांच्यावर आलेल्या शिक्षेपासून त्यांच्या सुटकेची तरतूद केली. (गलती. ३:१०-१३) अशा तऱ्‍हेने, मोशेच्या नियमशास्त्रानुसार कधीही मिळाली नसती, त्या माफीची तरतूद त्याने त्यांच्यासाठी केली.—प्रे. कृत्ये १३:३८, ३९.

१०. नियमशास्त्राला काढून टाकणे हा संयुक्‍त उपासनेचा एक घटक कसा झाला आहे?

१० वस्तुतः नियमशास्त्राने यहुद्यांना परराष्ट्रीयांपासून अलग केले होते. परराष्ट्रीयांना लागू नसलेल्या अटी यहुद्यांवर बंधनकारक होत्या, आणि सुंता न झालेल्या परराष्ट्रीयांना यहुद्यांच्या उपासनेत सहभागी होण्याची पूर्णपणे मनाई होती. (पडताळा निर्गम १२:४८; प्रे. कृत्ये १०:२८.) परंतु नियमशास्त्राने त्याचा उद्देश साध्य केला व त्याला काढून टाकण्यात आले तेव्हा, ख्रिस्तामार्फत एकमेव देवाची उपासना करण्यात यहुदी आणि सुंता न झालेल्या परराष्ट्रीयांना एकत्र येणे शक्य झाले.—इफिस. २:११-१८.

आपल्याला नियमशास्त्राच्या माहितीचा फायदा होतो

११. नियमशास्त्राबद्दलच्या ज्ञानाने ख्रिस्ताच्या शिकवणी समजण्यास आपल्याला कशी मदत होते?

११ आज आपल्याला नियमशास्त्र लागू नसले तरी, त्याबद्दलची माहिती आपल्यातील प्रत्येकाच्या फायद्याची आहे. ती कशी? हे ध्यानात ठेवा की, येशू एका यहुदी मातेपासून जन्मला व मोशेच्या नियमशास्त्राच्या अधीन होता. नियमशास्त्रातील अटींच्या माहितीच्या आधारे त्याने केलेल्या काही गोष्टी पूर्णपणे समजू शकतात. (गलती. ४:४; तसेच, लूक २२:७, ८ पहा.) त्याचप्रमाणे त्या नियमशास्त्राच्या अधीन असलेल्या लोकांमध्ये त्याने सेवाकार्य केले. त्यामुळे अनेकदा त्याच्या शिकवणी नियमशास्त्राशी संबंधित परिस्थितीवर आधारित होत्या.—पडताळा मत्तय ५:२३, २४.

१२. (अ) मोशेचे नियमशास्त्र आणि स्वतःचे जीवन यातला कोणता संबंध येशूने दाखवून दिला? (ब) नियमशास्त्राबद्दलच्या ज्ञानाचे महत्त्व पौलाने कसे सुचवले? (क) त्याच्या अटींचे आध्यात्मिक महत्त्व आपण जाणल्याने काय निष्पन्‍न होऊ शकते?

१२ त्याच्या पुनरूत्थानानंतर येशूने त्याच्या शिष्यांना, नियमशास्त्र, संदेष्टे व स्तोत्रांमध्ये त्याच्याबद्दल लिहिलेल्या गोष्टी त्याच्या मानवी जीवनाने पूर्ण केल्या होत्या, याची आठवण करून दिली. (लूक २४:४४) तसेच, प्रेषित पौलाने, नियमशास्त्राच्या करारासंबंधी वैशिष्ट्यांचा उल्लेख “स्वर्गीय वस्तूचे प्रतिरूप व छाया” असा केला आणि तो म्हणाला की “ज्या पुढे होणाऱ्‍या चांगल्या गोष्टी आहेत त्यांची नियमशास्त्रात छाया आहे.” (इब्री. ८:४, ५; १०:१) येशू ख्रिस्ताचे याजकपण आणि त्याच्या मानवी जीवनाचे बलिदान यांमध्ये पूर्ण झालेले बारीक तपशील मोशेच्या नियमशास्त्रात साकार झालेले आहेत. त्यांचे आकलन झाल्याने, आपल्या मनात अशा तरतुदींना अधिक अर्थ प्राप्त होतो. त्या पूर्वसूचित नमुन्यांमध्ये, आज यहोवाच्या भव्य आध्यात्मिक मंदिरात तो स्वीकारील अशा रीतीने त्याची उपासना करण्याच्या योजनेकडे अंगुली-निर्देश करणारा, तपशील होता. त्यांच्याबद्दल आपली समज जसजशी वाढते तशी आपल्या उपासनेच्या संबंधात आत्म्याने अभिषिक्‍त मंडळी आणि येशू ख्रिस्ताच्या हाताखालची तिची भूमिका, यांच्याविषयी आपल्याला वाटणारी कदरही वाढते.

१३. नियमशास्त्रात प्रतिबिंबित झालेल्या उत्तम मूल्यांचे चिंतन करणे हितावह का आहे?

१३ मोशेचे नियमशास्त्र ईश्‍वरप्रेरित पवित्र शास्त्राचा भाग आहे. ते सर्व, “सद्‌बोध, दोष दाखवणे, सुधारणूक, नीतिशिक्षण ह्‍यांकरता उपयोगी” आहे. (२ तीम. ३:१६) नियमशास्त्र ज्यांच्यावर आधारित आहे अशा सनातन मूल्यांचा शोध घेतल्याने व त्यांचे चिंतन केल्याने, देवाला प्रसन्‍न करणाऱ्‍या गोष्टी करण्यासाठी आपल्या अंतःकरणात तीव्र इच्छा उत्पन्‍न करण्यास मदत होते. ज्या वृत्तीकडे नियमशास्त्राने इशारा केला ती आपण जाणली आणि आपल्या जीवनात प्रकट केली तर ते किती फायद्याचे होईल!

१४. (अ) नियमशास्त्राच्या अटी ज्याच्याकडे इशारा करत होत्या, ती वृत्ती जाणण्याचे महत्त्व येशूने कसे सोदाहरण स्पष्ट केले? (ब) पृष्ठ १५२ वर दाखवल्याप्रमाणे, नियमशास्त्रात अंतर्भूत असलेल्या काही उत्तम मूल्यांचा उल्लेख करा. (क) देवाला संतुष्ट करण्यात, या गोष्टींची कदर आपल्याला कशी मदत करील?

१४ डोंगरावरल्या त्याच्या प्रवचनात, येशूने हे प्रभावीपणे सोदाहरणासह स्पष्ट केले. त्या काळी, नियमशास्त्राच्या अधीन असलेल्या लोकांशी बोलताना त्याने दाखवले की, राग धरण्याची वृत्ती व आपल्या बांधवांबद्दल अनादर दाखवणारे भाषण करण्यासाठी आपल्या जिभेचा वापर टाळण्याची त्यांना गरज होती. कधीही व्यभिचार न केल्याबद्दल समाधान मानण्यापेक्षा, एखाद्या स्त्रीकडे त्यांनी वासनेच्या नजरेने पाहूही नये. हे जसे त्यांच्याबाबतीत खरे होते तसे आपणही, यहोवाच्या नीतिमान मार्गांना अनुसरून आपल्या सर्व अवयवांचा उपयोग करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. (मत्त. ५:२१, २२, २७-३०; तसेच रोमकरांस १३:८-१० पहा.) आपण तसे केल्यास, “तू आपला देव परमेश्‍वर [यहोवा, न्यू.व.] ह्‍याच्यावर पूर्ण अंतःकरणाने, पूर्ण जिवाने व पूर्ण मनाने प्रीती कर” या नियमशास्त्रातल्या सर्वात मोठ्या आज्ञेचा अर्थही आपल्या ध्यानात आल्याचे आपण दाखवू. (मत्त. २२:३६, ३७) यामुळे आपण खचितच यहोवा देवाच्या निकट जाऊ. मोशेच्या नियमशास्त्राच्या अधीन नसलो तरी ते ज्या तत्त्वांवर आधारित आहे त्यांच्या व त्यात अंतर्भूत असलेल्या पूर्वसूचित नमुन्यांच्या यथार्थ ज्ञानाने आपल्याला निश्‍चितपणे फायदा होईल.

पुनरावलोकन चर्चा

• मोशेचे नियमशास्त्र पाळण्याचा आग्रह करणारे वस्तुतः ख्रिस्ताचा अव्हेर का करत आहेत?

• नियमशास्त्राच्या माहितीमुळे, यहोवाच्या उद्देशातली येशूची भूमिका समजण्यास आपल्याला कशी मदत होते?

• आपण नियमशास्त्राच्या अधीन नसलो तरी, त्याच्या अभ्यासाने आपल्याला कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी समजतात?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[१५२ पानांवरील चौकट]

मोशेच्या नियमशास्त्रातील काही मूलभूत तत्वे

देवासंबंधी जबाबदाऱ्‍या

केवळ यहोवाची उपासना करा निर्ग. २०:३; २२:२०

त्याच्या नावाचा आदर करा निर्ग. २०:७; लेवी. २४:१६

पूर्ण अंतःकरणाने, जिवाने व शक्‍तीने त्याच्यावर प्रीती करा व त्याची सेवा करा अनु. ६:५; १०:१२; ३०:१६

त्याची अवज्ञा करण्यास भ्या, त्याचा भीतियुक्‍त आदर बाळगा अनु. ५:२९; ६:२४

त्याला पसंत पडेल अशाच रीतीने त्याच्या जवळ या लेवी. १:१-५; गण. १६:१-५०; अनु. १२:५-१४

त्याला तुमच्या जवळचे उत्तम ते द्या; ते त्याच्याकडूनच आले निर्ग. २३:१९; ३४:२६

उपासकांनी शारीरिकरित्या स्वच्छ असले पाहिजे निर्ग. १९:१०, ११; ३०:२०

ऐहिक ध्येयांसाठी पवित्र हितसंबंधांना बाजूस सारु नये निर्ग. २०:८-१०; ३४:२१; गण. १५:३२-३६

मनाई केलेल्या धार्मिक चालीरीती

मूर्तिपूजा निर्ग. २०:४-६; अनुवाद ७:२५

संमिश्रविश्‍वास निर्ग. २३:१३; ३४:१२-१५; अनु. ६:१४, १५; १३:१-५

भूतविद्या, चेटूक, भविष्य सांगणे, अंतर्ज्ञान, जादू-टोणा, मोहिनी विद्या निर्ग. २२:१८; लेवी. २०:२७; अनु. १८:१०-१२

विवाह आणि कौटुंबिक जीवन

व्यभिचाराला बंदी निर्ग. २०:१४; लेवी. २०:१०

यहोवाची सेवा न करणाऱ्‍याशी विवाह न करणे अनु. ७:१-४

गोत्रगमनास मनाई लेवी. १८:६-१६; २०:११

लैंगिक विकृती टाळा लेवी. १८:२३; २०:१३

गर्भातील बालकाच्या जीवनाला आदर दाखवा निर्ग. २१:२२, २३

पालकांचा आदर करा निर्ग. २०:१२; २१:१५, १७; अनु.वाद २१:१८-२१

आपल्या मुलांना यहोवाचे मार्ग शिकवा अनु. ६:४-९; ११:१८-२१

इतरांसंबंधी कर्तव्ये

मानवी जीवन पवित्र माना निर्ग. २०:१३; गण. ३५:९-३४

शेजाऱ्‍यांवर प्रेम करा; द्वेष टाळा लेवी. १९:१७, १८

वडिलधाऱ्‍यांना मान द्या लेवी. १९:३२

आर्थिक अडचणीत असलेले, पोरके व विधवा यांची प्रेमळ काळजी घ्या लेवी. २५:३५-३७; अनु.वाद १५:७-११; २४:१९-२१

बहिऱ्‍यांशी व आंधळ्यांशी दुर्वर्तन न करणे लेवी. १९:१४; अनु. २७:१८

काम-धंद्यात प्रामाणिक असा लेवी. १९:३५, ३६; २५:१४

मालमत्तेच्या हक्कांचा आदर करा निर्ग. २०:१५; २२:१, ६; २३:४; अनु. २२:१-३

इतरांच्या चीजवस्तूंचा लोभ धरू नका निर्ग. २०:१७

निंदास्पद अपराध्यांचा दोष उघड करा लेवी. ५:१; अनु. १३:६-११

प्रामाणिक असा; खोटी साक्ष देऊ नका निर्ग. २०:१६; २३:१, २

पदाला अनुलक्षून पक्षपात न करणे निर्ग. २३:३, ६; लेवी. १९:१५