व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

यहोवा त्याच्या संस्थेला कसे मार्गदर्शन करतो?

यहोवा त्याच्या संस्थेला कसे मार्गदर्शन करतो?

अध्याय १५

यहोवा त्याच्या संस्थेला कसे मार्गदर्शन करतो?

१. यहोवाच्या संस्थेबद्दल पवित्र शास्त्र कोणती माहिती प्रकट करते व ती आपल्या दृष्टीने महत्त्वाची का आहे?

 प्रेरित शास्त्रवचनांमार्फत, यहोवा आपल्याला त्याच्या अद्‌भुत स्वर्गीय संस्थेचे ओझरते दर्शन देतो. (यश. ६:२, ३; यहे. १:१, ४-२८; दानी. ७:९, १०, १३, १४) आपण आत्मिक प्राणिमात्रांना पाहू शकत नसलो तरी, पवित्र देवदूतांच्या कार्याच्या, पृथ्वीवरील खऱ्‍या उपासकांवर होणाऱ्‍या परिणामांविषयी तो आपल्याला सूचना देतो. (उत्प. २८:१२, १३; २ राजे ६:१५-१७; स्तोत्र. ३४:७; मत्त. १३:४१, ४२; २५:३१, ३२) पवित्र शास्त्र यहोवाच्या संस्थेच्या दृश्‍य भागाचेही वर्णन करते व तो तिला कसे मार्गदर्शन करतो हे समजण्यास मदत करते. आपल्याला खरोखर या गोष्टींची आत्मिक समज असल्यास, त्यामुळे “सर्व प्रकारे संतोषविण्याकरिता त्याला शोभेल असे” वागण्यात आपल्याला मदत होईल.—कलस्सै. १:९, १०.

संस्थेच्या दृश्‍य भागाला ओळखणे

२. इ.स. ३३च्या पेन्टेकॉस्टपासून कोण देवाची मंडळी आहेत?

इस्राएलांचे राष्ट्र, १,५४५ वर्षे देवाची मंडळी होते. परंतु नियमशास्त्र पाळण्यात ते उणे पडले; व प्रत्यक्ष देवाच्या पुत्राला त्यांनी नाकारले. त्यामुळे एक नवी मंडळी अस्तित्वात आणून देवाने तिच्याशी नवा करार केला. पवित्र शास्त्रात ख्रिस्ताची “वधू” म्हणून या मंडळीची ओळख करून दिली आहे. ती, त्याच्या पुत्राशी स्वर्गात मिलाप होण्यासाठी, देवाने निवडलेल्या १,४४,००० जणांची मिळून बनली आहे. (इफिस. ५:२२-३२; प्रकटी. १४:१; २१:९, १०) त्यांच्यातल्या सुरुवातीच्यांना इ.स. ३३च्या पेन्टेकॉस्टच्या वेळी पवित्र आत्म्याने अभिषेक झाला. आपला उद्देश साध्य करण्यासाठी तो आता या मंडळीचा उपयोग करील असा स्पष्ट पुरावा, पवित्र आत्म्याद्वारे, देवाने दिला.—इब्री. २:२-४.

३. आज, यहोवाची दृश्‍य संस्था कोणाची मिळून बनली आहे?

या १,४४,००० मधले केवळ शेष आज पृथ्वीवर आहेत. परंतु पवित्र शास्त्रातील भविष्यवाणीच्या पूर्ततेनुसार, ‘दुसऱ्‍या मेंढरां’चा मोठा लोकसमुदाय त्यांच्या सक्रीय सान्‍निध्यात आणला गेला आहे. उत्तम मेंढपाळ, येशू ख्रिस्ताने, या ‘दुसऱ्‍या मेंढरां’ना, आत्म्याने जन्मलेल्या त्याच्या अनुयायांमधल्या शेष लोकांशी एकत्रित केले आहे. त्यामुळे त्यांचा “एक मेंढपाळ” म्हणून त्याच्या हाताखाली ते “एक कळप” बनतात. (योहा. १०:११, १६; प्रकटी. ७:९, १०) या सर्वांची मिळून एक अविभक्‍त संस्था, आजची यहोवाची दृश्‍य संस्था, बनली आहे.

ईश्‍वरशासित रचना

४. या संस्थेचे मार्गदर्शन कोण करते, व कसे?

“जिवंत देवाची मंडळी” या पवित्र शास्त्रातील वाक्प्रचारावरून, तिचे मार्गदर्शन कोण करत असेल हे उघड होते. ही संस्था ईश्‍वरशासित वा देवाच्या सत्तेखाली आहे. या मंडळीचा अदृश्‍य मस्तक म्हणून त्याने ज्याची नेमणूक केली त्या प्रभू येशू ख्रिस्तामार्फत, आणि त्याचे स्वतःचे प्रेरित वचन असलेल्या पवित्र शास्त्रामार्फत, यहोवा त्याच्या लोकांचे मार्गदर्शन करतो.—१ तीम. ३:१४, १५; इफिस. १:२२, २३; २ तीम. ३:१६, १७.

५. (अ) मंडळीला होणारे स्वर्गीय मार्गदर्शन, पहिल्या शतकात स्पष्टपणे कसे दिसून येत होते? (ब) येशू अद्यापही मंडळीचा प्रमुख असल्याचे कशाने दिसून येते?

इ.स. ३३च्या पेन्टेकॉस्टला, मंडळीचे पहिले सभासद पवित्र आत्म्याने कार्यास प्रवृत्त झाले तेव्हा असे ईश्‍वरशासित मार्गदर्शन स्पष्ट दिसून आले. (प्रे. कृत्ये २:१-४, ३२, ३३) आफ्रिकेमध्ये सुवार्तेचा प्रसार होण्यात ज्यांचे पर्यवसान झाले अशा घटनांना यहोवाच्या स्वर्गदूताने मार्गदर्शन केले तेव्हा ते उघड होते. (प्रे. कृत्ये ८:२६-३९) त्याचप्रमाणे, तार्सच्या शौलाचे परिवर्तन झाले तेव्हा येशूच्या वाणीने मार्गदर्शन केले, आणि परराष्ट्रीयांमध्ये प्रचार कार्याचा आरंभ केला गेला तेव्हाही ते दिसून आले. (प्रे. कृत्ये ९:३-७, १०-१७; १०:९-१६, १९-२३; ११:१२) पण जरुरीचे मार्गदर्शन नेहमीच अशा नेत्रदीपक मार्गांनी दिले गेले नाही. कालांतराने आकाशवाणी थांबल्या, देवदूतांचे प्रकटणे बंद झाले आणि आत्म्याच्या अद्‌भुत भेटी संपल्या. पण येशूने आपल्या विश्‍वासू अनुयायांना वचन दिले होते: “पहा, युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्या बरोबर आहे.” आणि वस्तुस्थितीही दर्शवते की, तो त्यांच्याबरोबर आहे. (मत्त. २८:२०; १ करिंथ. १३:८) यहोवाचे साक्षीदार त्याच्या प्रमुखपदाचा अधिकार मानतात इतकेच नव्हे तर, त्याच्या मदतीविना, प्रखर विरोधात राज्याच्या संदेशाची घोषणा करत राहणे त्यांना अशक्य झाले असते हे उघड आहे.

६. (अ) “विश्‍वासू व बुद्धिमान दास” कोणाचा मिळून बनला आहे व का? (ब) त्याने त्या ‘दासाला’ काय काम नेमून दिले?

आपल्या मृत्यूपूर्वी, धनी म्हणून तो ज्याला विशेष जबाबदारी सोपवणार होता अशा एका “विश्‍वासू व बुद्धिमान्‌ दासा”बद्दल, येशू त्याच्या शिष्यांशी बोलला. येशूच्या वर्णनाप्रमाणे, प्रभू स्वर्गाला जातो तेव्हा तो “दास” अस्तित्वात असेल व ख्रिस्ताच्या पुनरागमनाच्या वेळीही हयात असेल. हे वर्णन एखाद्या मानवी व्यक्‍तीला लागू पडू शकत नाही. परंतु येशूच्या एकूण विश्‍वासू अभिषिक्‍त मंडळीला पाहता ते नेमके लागू पडते. तो स्वतःच्या रक्‍ताने त्यांना विकत घेणार असल्याचे येशूला माहीत असल्यामुळे उचितपणे, त्याचे “दास” असा संघटितरित्या त्यांचा उल्लेख त्याने केला. शिष्य बनवणे व मग त्यांना “यथाकाळी [आध्यात्मिक] अन्‍न खावयास” देऊन आध्यात्मिकरित्या पोसणे हे काम त्याने त्यांना दिले. इ.स. ३३च्या पेन्टेकॉस्टला, पवित्र आत्म्याने त्यांची नेमणूक पक्की झाली.—मत्त. २४:४५-४७; २८:१९, २०; १ करिंथ. ६:१९, २०; पडताळा यशया ४३:१०.

७. (अ) आज या ‘दासा’वर कोणत्या विस्तृत जबाबदाऱ्‍या आहेत? (ब) या मार्गाने आपल्याला मिळणाऱ्‍या सूचनांना आपण प्रतिसाद देणे महत्त्वाचे का आहे?

धन्याच्या परतीच्या वेळी तो “दास” प्रामाणिकपणे त्याचे काम करत असल्यास त्याला अधिक विस्तृत जबाबदाऱ्‍या सोपवल्या जातील. त्यानंतरच्या वर्षांत देवराज्याला जगभर साक्ष देण्याचा काळ असेल, व ‘मोठ्या संकटातून’ वाचण्याच्या दृष्टीने यहोवाच्या उपासकांच्या एका ‘मोठ्या लोकसमुदाया’ला गोळा केले जाईल. (मत्त. २४:१४; प्रकटी. ७:९, १०) त्यांनाही आध्यात्मिक अन्‍नाची गरज असेल आणि संयुक्‍त “दासा”मार्फत, ख्रिस्ताच्या अभिषिक्‍त कारभाऱ्‍यामार्फत, ते त्यांना पुरवले जाईल. यहोवाला संतोषविण्यासाठी, या मार्गाने तो देत असलेल्या सूचना आपण स्वीकारल्या पाहिजेत आणि त्यानुसार कृती केली पाहिजे.

८, ९. (अ) पहिल्या शतकात धर्म-तत्त्वासंबंधी प्रश्‍न सोडवण्यासाठी व सुवार्तेच्या प्रचाराच्या बाबतीत जरूर ते मार्गदर्शन देण्यासाठी काय व्यवस्था होती? (ब) त्यासारखी कोणती व्यवस्था आज अस्तित्वात आहे?

अर्थात काही वेळा तत्त्वप्रणाली व कार्य-पद्धतीबद्दल प्रश्‍न उद्‌भवतील. तेव्हा कसे? परिवर्तित परराष्ट्रीयांबाबतच्या अपेक्षांविषयी प्रश्‍न कसा सोडवला गेला, हे प्रे. कृत्यांच्या १५व्या अध्यायात सांगितले आहे. केंद्रीय नियमन मंडळ म्हणून काम करणाऱ्‍या, यरुशलेम मधल्या प्रेषित व वडील-वर्गाकडे तो पाठवला गेला. तो वडील-वर्ग जात्या बिनचूक नव्हता. ज्यांच्या हातून कधी चूक होत नाही असे ते नव्हते. (पडताळा गलतीकरांस २:११-१४.) पण देवाने त्यांचा उपयोग केला. त्यांच्यापुढील विषयावर प्रेरित शास्त्रवचने काय म्हणतात, तसेच परराष्ट्रीयांचे क्षेत्र खुले करण्यात देवाच्या आत्म्याच्या कार्याचा पुरावा, यांचा विचार करुन मग त्यांनी निर्णय दिला. देवाने त्या व्यवस्थेला आशीर्वाद दिला. (प्रे. कृत्ये १५:१-२९; १६:४, ५) स्वत: प्रभूने दिलेल्या अधिकारानुसार सुवार्तेच्या प्रचाराच्या प्रगतीसाठी, त्या केंद्रीय मंडळाकडून काही व्यक्‍तींनाही पाठवण्यात आले.—प्रे. कृत्ये ८:१४; गलती. २:९.

आपल्या दिवसात, वेगवेगळ्या देशातील, आत्म्याने अभिषिक्‍त बंधूंचे मिळून नियमन मंडळ बनले आहे. ते यहोवाच्या साक्षीदारांच्या जागतिक प्रमुख कार्यालयात आहे. येशू ख्रिस्ताच्या मार्गदर्शनाखाली ते एकनिष्ठेने शुद्ध उपासनेच्या हितसंबंधांची जोपासना करतात. त्यांचा दृष्टिकोन प्रेषित पौलासारखा आहे. ख्रिस्ती बंधूंना आध्यात्मिक सल्ला देताना त्याने लिहिले: “आम्ही तुमच्या विश्‍वासावर सत्ता गाजवितो असे नाही, तर तुमच्या आनंदात साहाय्यकारी आहो; तुमची स्थिती आहे ती विश्‍वासाने आहे.”—२ करिंथ. १:२४.

१०. (अ) कोण वडील वा सेवा-सेवक होईल, हे कसे ठरवले जाते? (ब) अशा पदांवर नेमलेल्यांशी आपण निकट सहकार्य का केले पाहिजे?

१० जगभरातले यहोवाचे साक्षीदार या ईश्‍वरशासित व्यवस्थेला मान्यता देतात. त्यांच्या सर्व स्थानिक मंडळ्या त्याला निकटचे सहकार्य देत कार्य करतात. मंडळीचे काम सुरळीत चालावे म्हणून वडील व सेवा-सेवकांच्या नेमणूका करण्यासाठी ते नियमन मंडळावर अवलंबून राहतात. अशी नेमणूक करताना कशाच्या आधारावर व्यक्‍तींची निवड केली जाते? त्यासाठी अपेक्षित गोष्टींची स्पष्ट नोंद पवित्र शास्त्रात आहे. देवासमक्ष त्यांना चिकटून राहण्याची गंभीर जबाबदारी, शिफारस करणारे वडील आणि नेमणूक करण्याचा अधिकार असलेले, अशा दोघांवर असते. (१ तीम. ३:१-१०, १२, १३; ५:२२; तीत १:५-९) मंडळीच्या सभासदांमध्ये, निवडून येण्यासाठी प्रचार नसतो वा मतदानही नसते. तर, पहिल्या शतकात नेमणूका करताना प्रेषितांनी केले तसे, शिफारस करण्याची व त्यानंतर नेमणुका करण्याची जबाबदारी असलेले पर्यवेक्षक, देवाच्या आत्म्याची मदत मिळवण्याकरता प्रार्थना करतात आणि त्याच्या प्रेरित वचनातून मार्गदर्शन प्राप्त करतात. (प्रे. कृत्ये ६:२-४, ६; १४:२३; पडताळा स्तोत्रसंहिता ७५:६, ७.) वडिलांच्या मार्गदर्शनाला आपण देत असलेल्या प्रतिसादाने, आपणा सर्वांना ‘परिपूर्ण ज्ञानाचे एकत्व’ मिळण्यास मदत व्हावी म्हणून ख्रिस्ताने प्रेमळपणाने “मानवांना देणग्या” देण्याची जी तरतूद केली आहे, तिच्यासाठी आपल्याला वाटणारी कदर आपण प्रदर्शित करु.—इफिस. ४:८, ११-१६.

११. (अ) ईश्‍वरशासित व्यवस्थेत स्त्रिया कोणती बहुमोल कामे करत आहेत? (ब) त्यांनी मस्तक आच्छादणे कधी आवश्‍यक आहे, व का?

११ मंडळीमध्ये पर्यवेक्षकाच्या पदावर पुरुषांनी काम करावे असे मार्गदर्शन शास्त्रवचने करतात. यामुळे स्त्रियांना कमी लेखले जात नाही. कारण स्वर्गीय राज्याच्या वारसांमध्ये त्यांच्यातल्या अनेकींचा अंतर्भाव आहे. नम्र, शुद्ध आचरणाने आणि आपल्या कुटुंबाची काळजी घेण्यात परिश्रम घेऊन, ख्रिस्ती स्त्रिया देखील मंडळीच्या उत्तम लौकिकाला हातभार लावतात. (तीत २:३-५) अनेकदा, नुकतीच आस्था दाखवू लागलेल्यांना शोधण्यातले आणि त्यांना संस्थेच्या संपर्कात आणण्यातले बरेचसे काम त्या करतात. (स्तोत्र. ६८:११) परंतु मंडळीमध्ये शिकवण्याचे काम नेमलेले पुरुष करतात. (१ तीम. २:१२, १३) मंडळीने योजलेल्या सभेत पात्रता असलेले पुरुष नसल्यास, सभेची अध्यक्षता करताना वा प्रार्थना करताना स्त्री मस्तक आच्छादील. * अशा रीतीने, त्याच्या पित्याच्या अधीन राहण्यात येशूने सर्वांसाठी घालून दिलेल्या उदाहरणाप्रमाणे, ती यहोवाच्या संस्थेला मान दाखवते.—१ करिंथ. ११:३-१६; योहा. ८:२८, २९.

१२. (अ) स्वत:च्या पदाकडे वडिलांनी कोणत्या दृष्टीने पहावे असा आग्रह पवित्र शास्त्र करते? (ब) आपण सर्व कोणत्या उत्तम विशेषाधिकारात सहभागी होऊ शकतो?

१२ जगामध्ये महत्त्वाच्या पदावरल्या व्यक्‍तीला मोठे समजले जाते. पण देवाच्या संस्थेत, “तुम्हां सर्वांमध्ये जो कनिष्ठ आहे तोच श्रेष्ठ आहे” असा नियम आहे. (लूक ९:४६-४८; २२:२४-२६) तेव्हा वडिलांनी, यहोवाचे वतन असलेल्यांवर धनीपण न करता, उलट कळपाला कित्ता घालून देण्याची जबाबदारी घ्यावी असा सल्ला पवित्र शास्त्र देते. (१ पेत्र ५:२, ३) फक्‍त काही मोजक्यांनाच नव्हे तर, स्त्रिया व पुरुष अशा यहोवाच्या सर्व साक्षीदारांना, विश्‍वाच्या सार्वभौम सत्ताधीशाच्या नावाने नम्रतेने बोलून व त्याच्या राज्याबद्दल लोकांना सांगून, त्याचे प्रतिनिधित्व करण्याचा उत्तम विशेषाधिकार आहे.

१३. उद्धृत केलेल्या शास्त्रवचनांचा उपयोग करून, या परिच्छेदाच्या शेवटी दिलेल्या प्रश्‍नांवर चर्चा करा.

१३ आपण स्वत:ला विचारावे: “यहोवा त्याच्या संस्थेला करत असलेल्या मार्गदर्शनाची आपण खरोखर कदर करतो का? आपल्या मनोधारणेत, भाषणात व कृतीत त्याचे प्रतिबिंब दिसते का?” खालील मुद्यांवर विचार केल्याने असे विश्‍लेषण करण्यास आपल्यातील प्रत्येकाला मदत होऊ शकेल:

 मंडळीचा प्रमुख म्हणून खरोखर ख्रिस्ताच्या अधीन राहिल्यास, खालील शास्त्रवचनांनी दाखवल्याप्रमाणे, आपण काय करत असू? (मत्त. २४:१४, २८:१९, २०; लूक २१:३४-३६; योहा. १३:३४, ३५)

 या संस्थेचा भाग असलेल्या सर्वांना, फलदायी ख्रिस्ती बनण्याच्या त्यांच्या प्रयत्नात, देव आणि ख्रिस्तावर किती प्रमाणात अवलंबून राहावेसे वाटले पाहिजे? (योहा. १५:५; १ करिंथ. ३:५-७)

 व्यक्‍तींचा दृष्टिकोन संस्थेच्या उर्वरित गोष्टींशी सुसंगत असावा म्हणून वडील जेव्हा त्यांची विचारसरणी सुधारण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा त्यात कोणाची प्रेमळ आस्था आपल्या ध्यानात यावी? (इफिस. ४:७, ८, ११-१३; २ करिंथ. १३:११)

 “दास” वर्ग आणि त्याच्या नियमन मंडळामार्फत येणाऱ्‍या आध्यात्मिक तरतुदींचे महत्त्व जाणून आपण त्यांचा स्वीकार करतो, तेव्हा कोणाला आदर प्रदर्शित करतो? पण आपण त्यांच्याविषयी तुच्छतेने बोलल्यास काय प्रदर्शित होईल? (लूक १०:१६; पडताळा ३ योहान ९, १०.)

 नियुक्‍त वडिलांवर आपण प्रखर टीका का करू नये? (प्रे. कृत्ये २०:२८; रोम. १२:१०)

१४. (अ) ईश्‍वरशासित संस्थेविषयी आपल्या मनोवृत्तीने आपण काय दाखवून देतो? (ब) या बाबतीत, दियाबल खोटा असल्याचे सिद्ध करण्यास व यहोवाचे मन आनंदित करण्यास आपल्याला कोणत्या संधी आहेत?

१४ नियुक्‍त प्रमुख या नात्याने, ख्रिस्ताच्या अधीन असलेल्या त्याच्या दृश्‍य संस्थेच्या सहाय्याने यहोवा आज आपल्याशी व्यवहार करत आहे. या संस्थेबाबत आपली वृत्ती, सार्वभौमत्वाविषयी आपण घेत असलेली भूमिका व्यवहार्यपणे प्रदर्शित करते. (इब्री. १३:१७) आपण सर्व वैयक्‍तिक लाभाच्या लालसेने प्रवृत्त असून, आपली आस्था केवळ आत्मकेंद्रित असते असा सैतानाचा दावा आहे. परंतु ज्या उक्‍तीने वा कृतीने, विनाकारण आपल्याकडे लक्ष वेधले जाईल त्या टाळून, जरूर असेल त्या रीतीने सेवा करण्यास आनंदाने तयार झाल्यास, दियाबल खोटा असल्याचे आपण सिद्ध करतो. त्यांच्या विश्‍वासाचे अनुकरण करून, आपल्यातील ‘अधिकाऱ्‍यां’वर प्रेम व आदर प्रदर्शित केले व “लाभासाठी तोंडपुजेपणा” करणाऱ्‍या लोकांसारखे होणे टाळले, तर आपण यहोवाचे मन आनंदित करतो. (इब्री. १३:७; यहू. १६) यहोवाच्या संस्थेला हितावह आदर जोपासून व तो मार्गदर्शित करत असलेले काम मन:पूर्वक करून, यहोवा खरोखरच आपला देव असल्याचा आणि एकतेने त्याची उपासना करत असल्याचा पुरावा आपण देऊ.—१ करिंथ. १५:५८.

[तळटीपा]

^ सुवार्तेचा प्रचार करण्याची जबाबदारी सर्व खिश्‍चनांवर असल्याने, घरोघर प्रचार करताना स्त्रीला मस्तक आच्छादण्याची गरज नाही. परंतु तिच्या पतीच्या (तो ख्रिस्ती नसला तरी, तिचा प्रमुख असल्याने) उपस्थितीत, एखादा गृह पवित्र शास्त्र अभ्यास घेण्याची वेळ तिच्यावर आल्यास तिने मस्तक आच्छादावे. तसेच, अपवादात्मक परिस्थितीत, आधी ठरलेला पवित्र शास्त्र अभ्यास ती घेत असताना, मंडळीतला समर्पित पुरुष सभासद उपस्थित असल्यास, तिने आपले मस्तक आच्छादावे. पण त्याने प्रार्थना करावी.

पुनरावलोकन चर्चा

• आज यहोवाची दृश्‍य संस्था कोणती आहे? तिचा उद्देश काय आहे?

• मंडळीचा नियुक्‍त प्रमुख कोण आहे? कोणत्या दृश्‍य व्यवस्थेमार्फत तो आपल्याला प्रेमळ मार्गदर्शन करतो?

• संस्थेतील जबाबदाऱ्‍या व व्यक्‍तींबद्दल आपण कोणती हितकारक मनोवृत्ती जोपासली पाहिजे?

[अभ्यासाचे प्रश्‍न]