व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

तुम्हाला कोणी उत्पन्‍न केले?

तुम्हाला कोणी उत्पन्‍न केले?

तुम्हाला कोणी उत्पन्‍न केले?

देवाने स्वर्ग व पृथ्वी उत्पन्‍न केली.—उत्पत्ती १:१

देवाला स्वतःचे विशिष्ट नाव आहे. त्याचे नाव यहोवा आहे.—स्तोत्रसंहिता ८३:१८

यहोवा स्वर्गात राहतो. तो आत्मिक आहे. तुम्ही त्याला पाहू शकत नाही.—यशया ६६:१; योहान १:१८; ४:२४

यहोवा देवाने स्वर्गात अनेक दिव्यदूतांची निर्मिती केलेली आहे. तेही आत्मिक आहेत. ते सर्व चांगले होते. भूतकाली माणसांना दिसण्यासाठी काही वेळा त्यांनी मानवी आकार धारण केला होता.—इब्रीयांस १:७

माणसाची निर्मिती करण्यापूर्वी, अनेक काळाआधी यहोवाने प्राण्यांची निर्मिती केली.—उत्पत्ती १:२५

यहोवानेच आदाम नावाच्या माणसाची व हव्वा नामे त्याच्या पत्नीची निर्मिती केली.—उत्पत्ती १:२७

देवाने त्यांना नंदनवनात किंवा सुंदर बागेत ठेविले. त्याने आदामासाठी फक्‍त एकच पत्नी घडविली. आपल्या एका पत्नीसोबत त्या माणसाला रहावयाचे होते.—उत्पत्ती २:८, २१, २२, २४

मानव हा एक जीव आहे.—उत्पत्ती २:७

प्राणीही जीव आहेत.—उत्पत्ती १:२४