व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

तुम्ही काय करावे?

तुम्ही काय करावे?

तुम्ही काय करावे?

५० त्या सुंदर नंदनवनात चिरकाल राहावे असे तुम्हाला वाटते का?

तर मग, देव सांगतो, त्याचे अधिक शिक्षण घ्या. पवित्र शास्त्र वाचण्यास शिका.—योहान १७:३; प्रकटीकरण १:३

५१ येशूविषयी अधिक शिका.—अनुवाद १८:१८, १९; योहान ३:१६; प्रे. कृत्ये ३:१९-२३

५२ फक्‍त चांगल्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करा व यहोवाशी आज्ञाधारक रहा.—रोमकर ६:१७, १८, २२

५३ लक्षात ठेवा, यहोवा म्हणतो, आपण मनुष्यहत्या करू नये.—निर्गम २०:१३; १ योहान ३:११, १२

५४ इतरांच्या वस्तू आपण घेऊ नये.—निर्गम २०:१५; इफिसकर ४:२८

५५ पुरुषाने आपल्या पत्नीशिवाय इतर कोणत्याही स्त्रीसोबत राहू नये वा शय्यासोबत करु नये.—निर्गम २०:१४, १७; १ थेस्सलनीकाकर ४:३

५६ पतीला किती बायका करण्याची परवानगी देवाने दिली आहे, ते तुम्हाला आठवते का? पतीने किती काळ आपल्या पत्नीसोबत राहावे?—उत्पत्ती २:२२, २४; मत्तय १९:५, ६; १ करिंथकर ७:२, १०, ११

५७ तसेच आपण केवळ यहोवाचीच भक्‍ती केली पाहिजे हेही ध्यानात ठेवावे.—मत्तय ४:१०; १ करिंथकर ८:६

५८ मूर्ती वा प्रतिमा आमची मदत करू शकत नाही. का बरे?—१ करिंथकर ८:४

मूर्ती बाळगणे चांगले आहे काय?—अनुवाद २७:१५; १ योहान ५:२१

५९ गंडे, दोरे घालणे व शकुन पाहणे वाईट का आहे?—अनुवाद १८:१०-१३; प्रकटीकरण २१:८

६० दुष्ट देवदूतांनी किंवा दुरात्म्यांनी देवाविरुद्ध बंड केले. त्यांनी मानवाला ठकविण्यासाठी जोतिष्यांचा उपयोग केला.—प्रे. कृत्ये १६:१६

६१ आपण देवाला प्रार्थना केली पाहिजे. प्रार्थना म्हणजे देवाशी बोलणे, त्याची सेवा करण्याची आमची इच्छा व्यक्‍त करणे व त्याची मदत मागणे.—फिलिप्पैकर ४:६, ७

६२ आपण येशूला आज्ञाधारक राहिले पाहिजे व त्यावर विश्‍वास ठेवला पाहिजे.—इब्रीयांस ५:९; योहान ३:१६

६३ आपल्या तारणासाठी तो मेला हे ध्यानात ठेवा.—रोमकर ५:८

६४ येशू आपला अदृश्‍य राजा आहे हे लक्षात ठेवा. आपण त्याच्या आज्ञांकित राहावयास हवे.—फिलिप्पैकर २:९-११; प्रकटीकरण १९:१६

६५ तुम्ही शिकलेल्या या सर्व चांगल्या गोष्टी इतरांना सांगितल्या पाहिजेत व ज्यांना देवाची सेवा करण्याची इच्छा आहे त्यांनी बाप्तिस्मा घेतला पाहिजे असे येशूने सांगितले आहे. —मत्तय २८:१९, २०; योहान ४:७-१५

६६ याकरता, तुम्ही आपल्या मित्रांना या चांगल्या गोष्टी सांगू शकता.—मत्तय १०:३२

६७ तुम्हास वाचनाची आवड लागली तर तुम्ही आणखी अनेक गोष्टीविषयी शिकाल व इतरांनाही चांगली मदत करू शकाल.—२ तीमथ्य २:१५

६८ येशूने लहान मुलांनाही देवाच्या आज्ञांकित राहावयास शिकविले. त्यांच्याशी बोलण्याचा त्याने कधीही कंटाळा केला नाही.—मत्तय १९:१३-१५

६९ पालकांनी आपल्या मुलांना देवाची आज्ञा पाळण्यास व देवावर प्रेम करण्यास शिकविले पाहिजे.—अनुवाद ६:६, ७; नीतीसूत्रे ६:२०-२२; इफिसकर ६:४

७० अनेक प्रकारची चर्चेस आहेत. त्यांच्या बऱ्‍याचशा शिकवणी पवित्र शास्त्रातून नाहीत. ते धर्म, सत्य शिकवीत नाहीत, अशांचा त्याग करावा असे यहोवा आम्हाला सांगतो.—प्रकटीकरण १८:४; योहान ४:२३, २४

७१ तुम्हाला यहोवाविषयी अधिक माहिती देणारे लोक जगात आहेत. ते कोण आहेत हे तुम्हाला माहीत आहेत का?—प्रे. कृत्ये १५:१४; रोमकर १०:१४, १५

७२ ते यहोवाचे साक्षीदार आहेत. त्यांच्यात आपसात शांती आहे. याचे कारण तुम्हाला माहीत आहे का? कारण ते एकमेकांवर प्रीती करतात.—यशया ४३:१०-१२; योहान १३:३४, ३५

७३ त्यांचे यहोवावरही प्रेम असल्यामुळे त्यांनी बाप्तिस्मा करवून घेतलेला आहे. अशा रितीने ते हे जाहीर करतात की त्यांनी आपला पूर्वीचा वाईट मार्ग सोडून दिला आहे व यापुढील जीवन देवाच्या सेवेसाठी अर्पण केले आहे.—प्रे. कृत्ये २:४१

७४ यहोवाचे साक्षीदार सुंदर नव्या नंदनवनात राहण्याची आशा बाळगतात.—स्तोत्रसंहिता ३७:९-११, २९

७५ त्यांच्याबरोबर तुम्हालाही तेथे रहावयाचे असल्यास तुम्हाला काय करावे लागेल?—याकोब १:२२, २५; २:२०-२६

यहोवाची सेवा कशी करावी हे त्यांच्या सहवासात शिका. त्यांची यहोवा व येशूवर प्रीती आहे व ते त्यांच्या आज्ञेत राहतात. तुम्हीही यहोवा व येशूवर प्रीती करता का? इतरांना देवाची ओळख करुन द्यावयास तुम्हाला आवडेल का?—योहान ६:४५-४७

७६ यहोवा व ख्रिस्त येशूचे तुमच्यावर प्रेम आहे व तुम्हीही नंदनवनात चिरकाल राहावे अशी त्यांची इच्छा आहे.—योहान ३:१६

या माहितीपत्रकातील चित्रे पाहून व माहिती वाचून पृथ्वीवर चिरकालिक जीवनाचा आनंद लुटण्याची इच्छा तुम्हाला खचितच झाली असेल. त्याविषयी तुम्हाला अधिक माहिती मिळविणे आहे तर यहोवाच्या साक्षीदारांपैकी एकाचा स्थानिकरित्या संपर्क साधा, किंवा पान २ वर दिलेल्या यादीतील तुमच्या सर्वात जवळच्या कार्यालयाला तुम्ही लिहा किंवा इतर कोणाकरवी लिहा.