पाप आणि मरणापासून आमची मुक्तता कशी होते?
पाप आणि मरणापासून आमची मुक्तता कशी होते?
३५ पहिला मानव आदाम याने पाप केले हे तुमच्या लक्षात आहे का? त्याने जीवन व नंदनवन गमाविले आणि आपणही सर्व मरतो कारण आपण त्याची मुले आहोत.—रोमकर ५:१२; ३:२३
३६ दुसऱ्या कोणा अव्यंग (परिपूर्ण) माणसाने स्वतःचे जीवन आपल्यासाठी अर्पण केले किंवा खंडणी भरून मृत्युपासून आपली सुटका केली तरच ते अव्यंग जीवन आपल्याला पुन्हा प्राप्त होऊ शकेल.—१ करिंथकर १५:४५; रोमकर ५:१९, २१
३७ येशू हा देवाचा पुत्र होता. तो अव्यंग मानव होता. त्याने पाप केले नाही.—इब्रीयांस ५:९; ७:२६
३८ देवाला ओळखत नसलेल्या लोकांच्या हातून येशूने मरण पत्करले.—प्रे. कृत्ये २:२३
हेच ते आपल्यासाठी केलेले त्याचे समर्पण.—१ तीमथ्य २:६
३९ एका खोदलेल्या गुहेत किंवा थडग्यात येशूचे दफन करण्यात आले. तीन दिवस तो मेलेला होता. त्यानंतर देवाने त्यास पुन्हा जिवंत केले.—४० तो स्वर्गास परत गेला. आता आज्ञाधारक लोकांची मदत करावी अशी देवाला तो विनंती करू शकतो.—इब्रीयांस ९:२४; १ योहान २:१, २