भूतलावर जीवनाचा आनंद चिरकाल लूटा!
भूतलावर जीवनाचा आनंद चिरकाल लूटा!
ही पृथ्वी व तिच्यावरील सर्व सृष्ट वस्तु कोणी निर्मिल्या याविषयी तुम्हाला माहिती देण्याकरिता हे माहितीपत्रक छापलेले आहे. पृथ्वीची उत्पत्ती करणाऱ्या देवाला एक विशिष्ठ नाव आहे हे तुम्ही शिकाल. देवाने माणसाची निर्मिती का केली व तुम्हाला या पृथ्वीवर जीवनाचा आनंद चिरकाल कसा घेता येईल याविषयीचेही स्पष्टीकरण यात आम्ही दिले आहे.
देवाने ज्या गोष्टी करीन म्हणून अभिवचन दिले आहे त्या पाहण्यात यातील अनेक चित्रांची तुम्हाला मदत होईल अशी आम्ही आशा करतो. सर्वाधिक फायदा प्राप्त करण्यात बहुतेक चित्रासोबत दिलेली शास्त्रवचने वाचणे फायदेशीर होईल. यामार्गी पवित्र शास्त्रात दिलेल्या देवाकडील हितकारक अभिवचनांचे वाचन होईल, शिवाय या वचनांची पूर्तता अनुभवण्यास तुम्ही काय करावे म्हणून देव सांगतो, तेही वाचाल.
तुम्हाला कदाचित या माहितीपत्रकाद्वारे इतर लोकांचेही सहाय्य करावेसे वाटेल. तुम्हाला जर मुले आहेत तर देवाबद्दल शिकविण्यात त्यांचेही या पत्रकाच्या उपयोगाने मार्गदर्शन करु शकाल. तुम्ही जर कोणा अशा देशाचे रहिवासी आहात ज्यात बहुसंख्य प्रौढ अशिक्षित आहेत तर त्यांनाही देवाचा संदेश कळावा म्हणून चित्रांचा चांगला उपयोग करु शकता, की ज्यायोगे ते त्यांच्या परिने त्यांच्या शेजाऱ्यांचे सहाय्य करु शकतील.
या माहितीच्या अभ्यासाने अनेक ईश्वरी प्रसादाचे मार्ग खुले होतील, शिवाय पृथ्वीवर चिरकालिक जीवन कसे जगता येईल याची स्पष्टता तुम्हाला इतरांपाशीही करता येईल अशीच आम्ही मनःपूर्वक आशा बाळगतो.