मानव का मरतो?
मानव का मरतो?
८ मानवाने सर्वांच्या आनंदासाठी सबंध पृथ्वीस सुंदर बनवावे—नंदनवनासारखे—अशी यहोवाची इच्छा होती.—उत्पत्ती १:२८
आदाम व हव्वा यहोवाशी आज्ञाधारक राहिले असते तर मानव चिरकाल जगू शकला असता. बऱ्यावाईटाच्या ज्ञानाच्या झाडाचे फळ खाऊ नये असे त्यांना सांगितले होते.—उत्पत्ती २:१५-१७
९ परंतु एक देवदूत बहकला, व त्याने आदाम आणि हव्वेला देवाविरुद्ध फसविण्यासाठी एका सर्पाचा उपयोग करुन घेतला.—उत्पत्ती ३:१-६
१० हव्वेला फसविणाऱ्या त्या दुष्ट देवदूताला नंतर ‘दियाबल, जुनाट साप व सैतान’ ही नावे पडली.—प्रकटीकरण १२:९
११ यहोवाने अवज्ञा करणाऱ्या त्या जोडप्याला नंदनवनाबाहेर हाकून लाविले.—१२ आदाम व हव्वेला मुले झाली, परंतु ते कुटुंब आनंदी नव्हते. —उत्पत्ती ३:१७, १८
१३ यहोवाने म्हटल्याप्रमाणे त्यांना म्हातारे होऊन मरावे लागले.—उत्पत्ती ३:१९; रोमकर ५:१२
१४ अशाप्रकारे प्राण्याप्रमाणे तेही मरण पावले.
पृथ्वीवरील सर्व जीव मरतात.—उपदेशक ३:१८-२०; यहेज्केल १८:४