व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

यहोवा आपल्याला एक मुक्‍तीदाता देतो

यहोवा आपल्याला एक मुक्‍तीदाता देतो

यहोवा आपल्याला एक मुक्‍तीदाता देतो

२९ देवाने बनविलेली पहिली आत्मिक व्यक्‍ती त्याला ज्येष्ठ पुत्राप्रमाणे होती.

त्या पुत्रावर देवाचे अतिशय प्रेम आहे, आणि दुष्टांचा नाश व आज्ञाधारकांचा बचाव करण्यास देव त्याचा उपयोग करणार.—योहान ३:१६, ३६

३० यहोवाने आपल्या पुत्राला पृथ्वीवर जन्म घेण्यास पाठविले. त्याचे नाव येशू ठेविले गेले. त्याच्या आईचे नाव मरीया होते.—लूक १:३०-३५

३१ मोठा झाल्यावर येशूने अनेक चांगल्या गोष्टी शिकविल्या. यहोवा हाच एकमेव खरा देव आहे असे त्याने शिकविले.—मार्क १२:२९, ३०

येशू म्हणाला की, आपण केवळ यहोवाचीच भक्‍ती करावी.—मत्तय ४:१०; योहान ४:२३, २४

त्याने लोकांना यहोवाच्या राज्याविषयीही शिकवण दिली.—लूक १७:२०, २१

३२ येशूने अनेक दुखणेकऱ्‍यांना बरे केले व इतरही अनेक चांगल्या गोष्टी केल्या. त्याने वाईट गोष्टी केल्या नाहीत.—प्रे. कृत्ये १०:३८; १ पेत्र २:२१, २२

परंतु तो आपणास पाप व मरणापासून कसे मुक्‍त करील?

३३ चांगल्या लोकांचे तारण व्हावे म्हणून त्याने देवाला यज्ञ अर्पिणे आवश्‍यक होते. आपल्या पापासाठी प्राण्यांचा यज्ञ करावयास देवाने प्राचीन काळी लोकांना सांगितले होते.—इब्रीयांस ७:२५, २७

३४ येशूने प्राणी अर्पिले नाहीत. तर आपल्यासाठी त्याने स्वतःस अर्पण केले.—मत्तय २०:२८; इब्रीयांस १०:१२

का ते तुम्हाला ठाऊक आहे का?