व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

भाग १

आपण देवाचं कसं ऐकू शकतो?

आपण देवाचं कसं ऐकू शकतो?

देव आपल्याशी बायबलमधून बोलतो. २ तीमथ्य ३:१६

खऱ्‍या देवाने आपले विचार एका पवित्र पुस्तकात लिहून ठेवायला काही लोकांना सांगितलं. ते पुस्तक म्हणजे बायबल. त्यात खूप महत्त्वाची आणि उपयोगी माहिती आहे. आणि देवाची इच्छा आहे, की तुम्ही ही माहिती जाणून घ्यावी.

आपलं भलं कशात आहे, हे देवालाच माहीत आहे. फक्‍त तोच आपल्याला बुद्धी देऊ शकतो. आपण त्याचं ऐकलं, तर आपण बुद्धिमान होऊ.—नीतिवचनं १:५.

देवाची इच्छा आहे की जगातल्या सगळ्या लोकांनी बायबल वाचावं. आज बायबल पुष्कळ भाषांमध्ये वाचायला मिळतं.

तुम्हाला देवाचं ऐकायचं असेल, तर तुम्ही बायबल वाचलं पाहिजे आणि त्याचा अर्थ समजून घेतला पाहिजे.

आज पूर्ण जगात लोक देवाबद्दल शिकून घेत आहेत. मत्तय २८:१९

यहोवाचे साक्षीदार तुम्हाला बायबलमध्ये दिलेल्या माहितीचा अर्थ समजायला मदत करू शकतात.

ते पूर्ण जगात लोकांना देवाबद्दल खरी माहिती देतात.

ही माहिती शिकून घेण्यासाठी तुम्हाला पैसे द्यावे लागणार नाहीत. तुम्ही यहोवाच्या साक्षीदारांच्या राज्य सभागृहात गेला, तर तुम्हाला देवाबद्दल आणखी शिकून घेता येईल.