व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

भाग २

खरा देव कोण आहे?

खरा देव कोण आहे?

सगळ्या गोष्टी निर्माण करणारा खरा देव फक्‍त एकच आहे आणि त्याचं नाव यहोवा आहे. (स्तोत्र ८३:१८) तो स्वर्गात राहतो. आपण त्याला पाहू शकत नाही. त्याचं आपल्यावर प्रेम आहे आणि आपणही त्याच्यावर प्रेम करावं असं त्याला वाटतं. तसंच, आपण दुसऱ्‍यांवरही प्रेम करावं अशी त्याची इच्छा आहे. (मत्तय २२:३५-४०) तो सगळ्यात शक्‍तिशाली आहे आणि त्यानेच सर्व गोष्टी बनवल्या आहेत.

सगळ्यात आधी देवाने एका शक्‍तिशाली स्वर्गदूताला बनवलं. हा स्वर्गदूत नंतर पृथ्वीवर आला आणि लोक त्याला येशू ख्रिस्त या नावाने ओळखू लागले. या स्वर्गदूताला बनवल्यानंतर यहोवाने आणखी स्वर्गदूतांनाही बनवलं.

स्वर्गात जे काही आहे ते सगळं यहोवाने बनवलं . . . आणि पृथ्वीवरच्याही सगळ्या गोष्टी त्यानेच बनवल्या. प्रकटीकरण ४:११

यहोवाने सूर्य, चंद्र आणि तारे बनवले. तसंच त्याने पृथ्वी आणि तिच्यावर असलेल्या सगळ्या गोष्टी बनवल्या.—उत्पत्ती १:१.

यहोवा देवाने पहिल्या मानवाला मातीपासून बनवलं; त्याचं नाव आदाम होतं.—उत्पत्ती २:७.