व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

भाग १०

जे देवाचं ऐकतात त्यांना कोणते आशीर्वाद मिळतील?

जे देवाचं ऐकतात त्यांना कोणते आशीर्वाद मिळतील?

मरण पावलेल्या बहुतेक लोकांना या पृथ्वीवर पुन्हा जिवंत केलं जाईल. प्रेषितांची कार्यं २४:१५

तुम्ही आज जर यहोवाचं ऐकलं, तर भविष्यात तुम्हाला खूप आशीर्वाद मिळतील. त्या काळाची कल्पना करून पाहा! तुम्हाला आरोग्याच्या कोणत्याच समस्या नसतील. कोणीही आजारी किंवा अपंग नसेल. तिथे वाईट लोक नसतील आणि तुम्ही प्रत्येकावर भरवसा ठेवू शकाल.

तिथे कोणत्याच प्रकारचं दुःख किंवा त्रास नसेल. कोणाच्याही डोळ्यांतून दुःखाचे अश्रू वाहणार नाहीत. कोणीही म्हातारं होणार नाही किंवा मरणार नाही.

तुमच्या कुटुंबातले सदस्य, जवळचे लोक आणि मित्रही तुमच्यासोबत असतील. खरंच, नंदनवनातल्या त्या जीवनात आपण किती आनंदी असू!

तिथे भीतीचं कोणतंच कारण नसेल. सगळे लोक खरा आनंद अनुभवतील.

देवाचं राज्य सर्व प्रकारचं दुःख काढून टाकेल. प्रकटीकरण २१:३, ४