व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

भाग ५

नोहाच्या काळातला महापूर—कोणी देवाचं ऐकलं? आणि कोणी ऐकलं नाही?

नोहाच्या काळातला महापूर—कोणी देवाचं ऐकलं? आणि कोणी ऐकलं नाही?

नोहाच्या काळातले बहुतेक लोक वाईट कामं करायचे. उत्पत्ती ६:५

आदाम आणि हव्वाला मुलं झाली आणि पृथ्वीवर लोकांची संख्या वाढत गेली. काही काळाने, सैतानासोबत मिळून काही स्वर्गदूतही देवाचा विरोध करू लागले.

पृथ्वीवर स्त्रियांशी लग्न करण्यासाठी ते स्वर्गातून खाली आले आणि त्यांनी माणसांचं शरीर धारण केलं. त्यांना झालेली मुलं इतर मुलांसारखी नव्हती. ती खूप ताकदवान, धिप्पाड आणि क्रूर होती.

हळूहळू संपूर्ण पृथ्वी दुष्ट लोकांनी भरून गेली. बायबल सांगतं, की पृथ्वीवर माणसांचा दुष्टपणा फार वाढला होता. त्यांच्या मनातला प्रत्येक विचार आणि इच्छा ही नेहमी वाईटच असायची.

नोहाने देवाचं ऐकलं आणि जहाज बांधलं. उत्पत्ती ६:१३, १४, १८, १९, २२

नोहा एक चांगला माणूस होता. यहोवाने नोहाला सांगितलं, की मी एक महापूर आणून सगळ्या दुष्ट लोकांचा नाश करणार आहे.

देवाने नोहाला एक मोठं जहाज बांधायला सांगितलं. तसंच, नोहाने आपल्या कुटुंबाला आणि सगळ्या प्रकारच्या प्राण्यांना त्या जहाजात न्यावं, असंही देवाने सांगितलं.

पृथ्वीवर महापूर येणार आहे असं नोहाने लोकांना सांगितलं. पण त्यांनी त्याचं ऐकलं नाही. काही लोक नोहाची टिंगल करू लागले आणि काहींना तर त्याचा खूप राग आला.

जहाज बांधून पूर्ण झाल्यावर नोहाने प्राण्यांना आत नेलं.