भाग १ उजळणी
खाली दिलेल्या प्रश्नांवर चर्चा करा:
१. बायबल भविष्याबद्दल जे सांगतं त्यातली कोणती गोष्ट तुम्हाला सगळ्यात जास्त आवडते?
(धडा ०२ पाहा.)
२. बायबल देवाचं वचन आहे असं तुम्ही का मानता?
३. यहोवाच्या नावाचा वापर करणं का महत्त्वाचं आहे?
(धडा ०४ पाहा.)
४. बायबल देवाबद्दल म्हणतं: “तू सर्व गोष्टी निर्माण केल्या.” (प्रकटीकरण ४:११) तुम्ही हे मानता का?
(धडा ०६ पाहा.)
५. नीतिवचनं ३:३२ वाचा.
यहोवापेक्षा चांगला मित्र असूच शकत नाही असं का म्हणता येईल?
यहोवा आपल्या मित्रांकडून काय अपेक्षा करतो? त्याच्या अपेक्षा योग्य आहेत असं तुम्हाला वाटतं का?
६. स्तोत्र ६२:८ वाचा.
तुम्ही यहोवाला कोणकोणत्या गोष्टींसाठी प्रार्थना केली आहे? तुम्ही आणखी कोणत्या गोष्टींसाठी प्रार्थना करू शकता?
यहोवा प्रार्थनांचं उत्तर कसं देतो?
(धडा ०९ पाहा.)
७. इब्री लोकांना १०:२४, २५ वाचा.
सभांना गेल्यामुळे तुम्हाला कोणते फायदे होतील?
सभांना जायला आपण मेहनत घेतली पाहिजे असं तुम्हाला वाटतं का?
(धडा १० पाहा.)
८. दररोज बायबल वाचलं पाहिजे असं तुम्हाला का वाटतं? तुम्ही रोज बायबल वाचायला कधी वेळ काढता?
(धडा ११ पाहा.)
९. आतापर्यंतच्या बायबल अभ्यासात तुम्हाला कोणती गोष्ट सगळ्यात जास्त आवडली?
१०. तुमच्या बायबल अभ्यासात आतापर्यंत काही अडथळे आले आहेत का? अभ्यास करत राहायला तुम्हाला कशामुळे मदत होईल?
(धडा १२ पाहा.)