व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

धडा १५

येशू कोण आहे?

येशू कोण आहे?

जगातल्या बहुतेक लोकांनी येशूबद्दल ऐकलंय. पण त्याच्या नावाशिवाय त्यांना त्याच्याबद्दल जास्त काही माहीत नाही. येशू कोण आहे याबद्दल बऱ्‍याच लोकांची वेगवेगळी मतं आहेत. पण बायबल त्याच्याबद्दल काय सांगतं?

१. येशू कोण आहे?

बायबल सांगतं की येशू स्वर्गात राहणारा एक शक्‍तिशाली स्वर्गदूत आहे. त्याला देवाचा “एकुलता एक मुलगा” असं म्हटलंय. (योहान ३:१६) कारण तो एकटाच असा आहे, ज्याला यहोवाने स्वतः निर्माण केलं होतं. त्याला “निर्माण केलेल्या सगळ्या गोष्टींत पहिला जन्मलेला” असंही म्हटलंय. (कलस्सैकर १:१५) कारण यहोवाने बाकी काहीही निर्माण करण्याआधी येशूला बनवलं होतं. इतर सगळ्या गोष्टी यहोवाने आणि येशूने मिळून बनवल्या. यासाठी येशूने आपल्या पित्यासोबत खूप जवळून काम केलं. (नीतिवचनं ८:३० वाचा.) आजही येशूचं यहोवासोबत खूप जवळचं नातं आहे. तो विश्‍वासूपणे देवाचे संदेश आणि सूचना लोकांना आणि स्वर्गदूतांना सांगतो. म्हणून त्याला “शब्द” असंही म्हटलंय.—योहान १:१४.

२. येशू पृथ्वीवर का आला होता?

जवळजवळ २,००० वर्षांआधी यहोवाने त्याच्या पवित्र शक्‍तीद्वारे एक चमत्कार केला. त्याने येशूचं जीवन मरीया नावाच्या कुमारीच्या पोटी घातलं. अशा रितीने येशूचा पृथ्वीवर एक मानव म्हणून जन्म झाला. (लूक १:३४, ३५ वाचा.) येशू वचन दिलेला मसीहा किंवा ख्रिस्त होण्यासाठी, तसंच मानवजातीची सुटका करण्यासाठी पृथ्वीवर आला होता. a बायबलमध्ये मसीहाबद्दल दिलेल्या सगळ्या भविष्यवाण्या येशूने पूर्ण केल्या. त्यामुळे त्या काळचे लोक ओळखू शकले की येशू हाच “ख्रिस्त, जिवंत देवाचा मुलगा” होता.—मत्तय १६:१६.

३. आता येशू कुठे आहे?

येशूचा मृत्यू झाल्यावर यहोवाने त्याला एक स्वर्गदूत म्हणून पुन्हा जिवंत केलं आणि मग तो स्वर्गात परत गेला. तिथे “देवाने एक श्रेष्ठ स्थान देऊन त्याचा गौरव केला.” (फिलिप्पैकर २:९) आज येशूजवळ खूप मोठ्या अधिकाराचं स्थान आहे. यहोवानंतर या विश्‍वात तोच सगळ्यात शक्‍तिशाली आहे.

आणखी जाणून घेऊ या

येशू नेमका कोण आहे आणि त्याच्याबद्दल शिकणं इतकं महत्त्वाचं का आहे, हे जाणून घेऊ या.

४. येशू सर्वशक्‍तिमान देव नाही

येशू शक्‍तिशाली स्वर्गदूत असला तरी बायबल सांगतं, की तो त्याचा देव आणि पिता यहोवा याच्या अधीन आहे. आपण हे कशावरून म्हणू शकतो? सर्वशक्‍तिमान देवाच्या तुलनेत येशूच्या स्थानाबद्दल बायबल काय शिकवतं, हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पाहा.

येशू आणि यहोवाचं काय नातं आहे हे आपल्याला खाली दिलेल्या वचनांवरून समजतं. प्रत्येक वचन वाचा आणि मग त्याखाली दिलेल्या प्रश्‍नांवर चर्चा करा.

लूक १:३०-३२ वाचा.

  • येशू आणि ‘सर्वोच्च देव’ यहोवा यांच्या नात्याबद्दल स्वर्गदूत काय म्हणाला?

मत्तय ३:१६, १७ वाचा.

  • येशूच्या बाप्तिस्म्याच्या वेळी स्वर्गातून काय आवाज आला?

  • तुम्हाला काय वाटतं, तो आवाज कोणाचा होता?

योहान १४:२८ वाचा.

  • कुटुंबात वडील आणि मुलगा यांच्यापैकी कोण मोठं असतं? कोणाजवळ जास्त अधिकार असतो?

  • येशूने यहोवाला ‘पिता’ का म्हटलं?

योहान १२:४९ वाचा.

  • आपण पित्याच्या बरोबरीचे आहोत असं येशूला वाटतं का? तुम्हाला याच्याबद्दल काय वाटतं?

५. वचन दिलेला मसीहा येशूच होता

मसीहा म्हणजे मानवजातीला वाचवण्यासाठी देवाने निवडलेला. हा मसीहा कोण आहे हे लोकांना ओळखता यावं, म्हणून बायबलमधल्या भविष्यवाण्यांमध्ये त्याच्याबद्दल बरीच माहिती दिली होती. येशूने पृथ्वीवर असताना मसीहाबद्दलच्या भविष्यवाण्या पूर्ण केल्या. त्यांपैकी काहींबद्दल जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पाहा.

बायबलमधून या भविष्यवाण्या वाचा आणि मग खाली दिलेल्या प्रश्‍नांवर चर्चा करा:

मसीहाचा जन्म कुठे होणार होता हे जाणून घेण्यासाठी मीखा ५:२ वाचा. b

मसीहाच्या मृत्यूबद्दल कोणकोणत्या भविष्यवाण्या करण्यात आल्या होत्या, हे स्तोत्र ३४:२० आणि जखऱ्‍या १२:१० यांत वाचा.

  • या भविष्यवाण्या पूर्ण झाल्या का?—योहान १९:३३-३७.

  • या भविष्यवाण्या पूर्ण होणं न होणं हे येशूच्या हातात होतं का?

  • मग यावरून येशूबद्दल कोणती गोष्ट सिद्ध होते?

६. येशूबद्दल शिकून घेतल्यामुळे आपल्याला फायदा होतो

बायबल सांगतं की येशूबद्दल आणि त्याच्या भूमिकेबद्दल जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे. योहान १४:६ आणि १७:३ वाचा, आणि मग या प्रश्‍नावर चर्चा करा:

  • येशूबद्दल जाणून घेणं का महत्त्वाचं आहे?

येशूने देवासोबत मैत्री करायचा मार्ग  मोकळा केला. त्याने यहोवाबद्दलचं सत्य  शिकवलं आणि त्याच्याद्वारेच आपल्याला कायमचं जीवन  मिळू शकतं

काही जण म्हणतात: “यहोवाचे साक्षीदार येशूला मानत नाहीत.”

  • तुम्ही त्यांना काय उत्तर द्‌याल?

थोडक्यात

येशू एक शक्‍तिशाली स्वर्गदूत आहे. तो देवाचा मुलगा आणि मसीहा आहे.

उजळणी

  • येशूला “निर्माण केलेल्या सगळ्या गोष्टींत पहिला जन्मलेला” का म्हटलं आहे?

  • पृथ्वीवर येण्याआधी येशूने कायकाय केलं?

  • येशूच मसीहा आहे हे आपल्याला कशावरून कळतं?

ध्येय

हेसुद्धा पाहा

मानव मुलांना जन्म देतात, तसा देवानेही येशूला जन्म दिला का? बायबल काय शिकवतं, हे जाणून घ्या.

“येशूला देवाचा मुलगा का म्हटलंय?” (वेबसाईटवरचा लेख)

त्रैक्याची शिकवण बायबलप्रमाणे चुकीची का आहे हे जाणून घ्या.

“क्या यीशु परमेश्‍वर है?” (ऑनलाईन लेख)

येशू कोण आहे हे बायबलमधून तपासून पाहिल्यावर एका स्त्रीचं जीवन कसं बदललं ते वाचून पाहा.

“अपने धर्म के बारे में एक यहूदी औरत का नज़रिया क्यों बदला?” (ऑनलाईन लेख)

a मानवजातीची कशातून सुटका करण्याची गरज आहे आणि येशू आपली सुटका कशी करेल, हे धडा २६ आणि २७ यांत पाहू या.

b मसीहा पृथ्वीवर नेमका कधी प्रकट होईल याबद्दलची भविष्यवाणी जाणून घेण्यासाठी काही विषयांवर स्पष्टीकरण क्र. २ पाहा.