व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

धडा १९

यहोवाचे साक्षीदार खरे ख्रिस्ती आहेत का?

यहोवाचे साक्षीदार खरे ख्रिस्ती आहेत का?

आम्ही यहोवाचे साक्षीदार असं मानतो की आम्ही खरे ख्रिस्ती आहोत. पण आम्ही असं का मानतो? हे जाणून घेण्यासाठी आमचे विश्‍वास कशावर आधारित आहेत, आमच्या खास नावाचा काय अर्थ होतो आणि आमचं एकमेकांवर प्रेम आहे हे आम्ही कसं दाखवतो, यावर विचार करा.

१. यहोवाच्या साक्षीदारांचे विश्‍वास कशावर आधारित आहेत?

येशू म्हणाला होता: “[देवाचं] वचन सत्य आहे.” (योहान १७:१७) येशूप्रमाणेच यहोवाचे साक्षीदारसुद्धा जे काही मानतात ते देवाच्या वचनावर आधारित असतं. साक्षीदारांच्या अलीकडच्या काळातल्या इतिहासाचा जरा विचार करा. एकोणीसाव्या शतकाच्या शेवटीशेवटी काही बायबल विद्यार्थ्यांनी सोबत मिळून बायबलचा काळजीपूर्वक अभ्यास करायला सुरुवात केली. त्यांना बायबलमधून जे सत्य समजलं ते त्यांनी मनापासून स्वीकारलं. काही गोष्टी चर्चमध्ये अगदी वेगळ्या शिकवल्या जात होत्या, पण तरीही त्यांनी बायबलमध्ये जे सांगितलंय त्यावरच भरवसा ठेवला. आणि मग त्यांनी हे सत्य इतरांनाही सांगायला सुरुवात केली. a

२. आम्ही स्वतःला यहोवाचे साक्षीदार का म्हणतो?

यहोवा आपली उपासना करणाऱ्‍यांना आपले साक्षीदार म्हणतो, कारण ते लोकांना त्याच्याबद्दलचं सत्य सांगतात. (इब्री लोकांना ११:४-१२:१) जुन्या काळात देव आपल्या लोकांना असं म्हणाला: “तुम्ही माझे साक्षीदार आहात.” (यशया ४३:१० वाचा.) येशूलाही “विश्‍वासू साक्षीदार” असं म्हटलंय. (प्रकटीकरण १:५) म्हणूनच १९३१ मध्ये आम्ही यहोवाचे साक्षीदार हे नाव स्वीकारलं. आणि आम्हाला या नावाचा अभिमान आहे.

३. यहोवाचे साक्षीदार येशूसारखं प्रेम कसं दाखवतात?

येशूने आपल्या शिष्यांवर अगदी आपल्या घरच्यांसारखं प्रेम केलं. (मार्क ३:३५ वाचा.) त्याचप्रमाणे यहोवाचे साक्षीदारसुद्धा सबंध जगात असले, तरी ते एका मोठ्या कुटुंबासारखे आहेत आणि म्हणूनच ते एकमेकांना भाऊ-बहीण म्हणतात. (फिलेमोन १, २) तसंच, आम्हाला अशी आज्ञाही देण्यात आली आहे की “संपूर्ण बंधुसमाजावर प्रेम करा.” (१ पेत्र २:१७) यहोवाचे साक्षीदार हे प्रेम बऱ्‍याच वेगवेगळ्या मार्गांनी दाखवतात. जसं की, जगात कुठेही आमचे भाऊबहीण कठीण परिस्थितीचा सामना करत असले, तर आम्ही त्यांना मदत करतो.

आणखी जाणून घेऊ या

यहोवाच्या साक्षीदारांच्या इतिहासाबद्दल थोडी माहिती घेऊ या. आणि आम्ही खरे ख्रिस्ती आहोत, हे दाखवणारे अजून काही पुरावे पाहू या.

खरे ख्रिस्ती जे काही मानतात ते बायबलवर आधारित असतं आणि ते इतरांनाही याबद्दल सांगतात

४. आम्ही जे काही मानतो ते बायबलवर आधारित असतं

यहोवाने आधीच सांगितलं होतं, की त्याच्या लोकांना शेवटच्या काळात बायबलमधल्या सत्याचं स्पष्ट ज्ञान मिळेल. दानीएल १२:४ आणि तळटीप वाचा, आणि मग या प्रश्‍नावर चर्चा करा:

  • बायबलचं परीक्षण करत राहिल्यामुळे देवाच्या लोकांमध्ये कोणती गोष्ट “खूप वाढेल” असं सांगण्यात आलं होतं?

चार्ल्स रस्सल यांच्यासोबत मिळून आणखी काही बायबल विद्यार्थ्यांनी देवाच्या वचनाचा अभ्यास कसा केला हे जाणून घ्या. व्हिडिओ पाहा, आणि मग खाली दिलेल्या प्रश्‍नावर चर्चा करा.

  • चार्ल्स रस्सल आणि त्यांच्यासोबतच्या बायबल विद्यार्थ्यांची अभ्यास करायची पद्धत कशी होती?

तुम्हाला माहीत होतं का?

काही वेळा आम्ही आमच्या शिकवणींमध्ये फेरबदल केले आहेत. आम्ही हे फेरबदल का केले? कारण, ज्या प्रकारे सूर्य उगवताना पृथ्वीवरचं दृश्‍य हळूहळू स्पष्ट होत जातं, त्याच प्रकारे देवाने त्याच्या वचनावर हळूहळू प्रकाश टाकलाय. (नीतिवचनं ४:१८ वाचा.) मुळात बायबलमधलं सत्य कधीच बदलत नाही. पण त्या सत्याबद्दल आमचं ज्ञान जसजसं स्पष्ट होत जातं, तसतसे आम्ही आमच्या शिकवणींमध्ये फेरबदल करतो.

५. आम्ही आमच्या नावाप्रमाणेच कार्य करतो

आम्ही यहोवाचे साक्षीदार हे नाव का स्वीकारलं? व्हिडिओ पाहा, आणि मग खाली दिलेल्या प्रश्‍नावर चर्चा करा:

  • यहोवाचे साक्षीदार हे नाव अगदी योग्य का आहे?

यहोवा त्याच्या लोकांना साक्षीदार का म्हणतो? कारण आज लोकांना खऱ्‍या देवाबद्दल बऱ्‍याच चुकीच्या गोष्टी शिकवण्यात आल्या आहेत; पण त्याचे साक्षीदार लोकांना सांगतात, की यहोवा हाच खरा देव आहे आणि ते त्याच्याबद्दलची खरी माहिती देतात. देवाबद्दल शिकवण्यात आलेल्या चुकीच्या गोष्टींपैकी दोन उदाहरणं पाहू या.

काही धर्मांमध्ये असं शिकवलं जातं, की आपण उपासनेत मूर्तींचा उपयोग केला पाहिजे आणि ही देवाची इच्छा आहे. पण हे खरंय का? लेवीय २६:१ वाचा, आणि मग या प्रश्‍नांवर चर्चा करा:

  • या वचनात कोणतं सत्य सांगितलंय? यहोवाला मूर्तींबद्दल काय वाटतं?

काही लोक असं शिकवतात, की येशूच देव आहे. पण हे खरंय का? योहान २०:१७ वाचा, आणि मग या प्रश्‍नांवर चर्चा करा:

  • या वचनात कोणतं सत्य सांगितलंय? देव आणि येशू एकच व्यक्‍ती आहेत का?

  • यहोवाची इच्छा आहे की लोकांना त्याच्याबद्दल आणि त्याच्या मुलाबद्दल खरी माहिती मिळावी. आणि म्हणून तो आपल्या साक्षीदारांना त्यांच्याकडे पाठवतो. हे जाणून तुम्हाला कसं वाटतं?

६. आमचं एकमेकांवर प्रेम आहे

बायबलमध्ये ख्रिस्ती बांधवांची तुलना शरीराच्या वेगवेगळ्या भागांशी केली आहे. १ करिंथकर १२:२५, २६ वाचा, आणि मग या प्रश्‍नांवर चर्चा करा:

  • आपले बांधव दुःखात किंवा त्रासात आहेत, हे पाहून खरे ख्रिस्ती काय करतात?

  • यहोवाचे साक्षीदार एकमेकांबद्दल प्रेम कसं दाखवतात हे तुम्ही स्वतः पाहिलंय का? तुम्हाला एखादं उदाहरण देता येईल का?

जगाच्या एखाद्या भागात जेव्हा यहोवाच्या साक्षीदारांवर संकट येतं, तेव्हा सबंध जगातले त्यांचे भाऊबहीण लगेच त्यांच्या मदतीसाठी पुढे येतात. याचं एक उदाहरण जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पाहा. त्यानंतर खाली दिलेल्या प्रश्‍नावर चर्चा करा.

  • यहोवाच्या साक्षीदारांच्या मदतकार्यातून त्यांचं प्रेम कसं दिसून येतं?

खरे ख्रिस्ती दुःखात आणि त्रासात असलेल्यांना प्रेम दाखवतात

काही जण म्हणतात: “यहोवाच्या साक्षीदारांबद्दल कधी ऐकलं नाही. हा नवीन धर्म आहे का?”

  • यहोवा फार पूर्वीपासूनच आपल्या उपासकांना साक्षीदार म्हणतो हे कशावरून कळतं?

थोडक्यात

यहोवाचे साक्षीदार खरे ख्रिस्ती आहेत. जगभरातले आम्ही सगळे भाऊबहीण एका कुटुंबासारखे आहोत. आमचे विश्‍वास बायबलवर आधारित आहेत आणि आम्ही लोकांना यहोवाबद्दलची खरी माहिती देतो.

उजळणी

  • यहोवाचे साक्षीदार हे नाव आम्ही का स्वीकारलं?

  • आम्ही एकमेकांबद्दल प्रेम कसं दाखवतो?

  • यहोवाचे साक्षीदार खरे ख्रिस्ती आहेत असं तुम्हाला वाटतं का?

ध्येय

हेसुद्धा पाहा

यहोवाच्या साक्षीदारांनी खोट्या शिकवणींचा पर्दाफाश कसा केला याचं एक उदाहरण पाहा.

परमेश्‍वर के लोग उसके नाम की महिमा करते हैं  (७:०८)

यहोवाच्या साक्षीदारांबद्दल तुमच्या मनात येणाऱ्‍या प्रश्‍नांची उत्तरं जाणून घ्या.

“यहोवाच्या साक्षीदारांबद्दल सहसा विचारले जाणारे प्रश्‍न” (वेबसाईटवरचं पेज)

स्टीफन पूर्वी दुसऱ्‍या वंशांच्या लोकांचा खूप द्वेष करायचा. यहोवाच्या साक्षीदारांमध्ये त्याने असं काय बघितलं, ज्यामुळे त्याचं जीवन पूर्णपणे बदललं?

“माझं आयुष्य बरबाद होण्याच्या वाटेवर होतं” (ऑनलाईन लेख)

a १८७९ पासून टेहळणी बुरूज  (इंग्रजी) या आमच्या प्रमुख नियतकालिकातून बायबलमधलं सत्य लोकांपर्यंत पोहोचवलं जात आहे.