व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

धडा ३६

सर्व गोष्टींत प्रामाणिकपणे वागा!

सर्व गोष्टींत प्रामाणिकपणे वागा!

प्रामाणिक लोक सगळ्यांनाच आवडतात. यहोवाचीही अशी इच्छा आहे की जे त्याच्याशी मैत्री करतात, त्यांनी प्रामाणिक असावं. पण आज प्रामाणिक राहणं सोपं नाही. कारण जगात बहुतेक लोक अप्रामाणिक आहेत. असं असलं तरी, सर्व गोष्टींत प्रामाणिक राहिल्यामुळे बरेच फायदे होतात.

१. प्रामाणिक राहण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण कोणतं आहे?

आपण जेव्हा दुसऱ्‍यांशी प्रामाणिकपणे वागतो तेव्हा आपण यहोवाला हे दाखवून देतो, की आपलं त्याच्यावर प्रेम आहे आणि आपण त्याचा आदर करतो. आपण काय विचार करतो आणि कसं वागतो हे सगळं यहोवाला माहीत असतं. (इब्री लोकांना ४:१३) आणि जेव्हा आपण प्रामाणिकपणे वागायचं निवडतो तेव्हा तो त्याकडे लक्ष देतो आणि त्याला खूप आनंद होतो. बायबलमध्ये असं म्हटलंय: “यहोवाला कपटी माणसाची घृणा वाटते, पण सरळ माणसाशी त्याची जवळची मैत्री असते.”नीतिवचनं ३:३२.

२. दररोजच्या जीवनात आपण प्रामाणिक कसं राहू शकतो?

यहोवाची इच्छा आहे की आपण ‘एकमेकांसोबत खरं बोलावं.’ (जखऱ्‍या ८:१६, १७) म्हणून जेव्हा आपण आपल्या घरातल्या लोकांशी, सहकाऱ्‍यांशी, ख्रिस्ती भाऊ-बहिणींशी किंवा सरकारी अधिकाऱ्‍यांशी बोलतो तेव्हा आपण कधीही खोटं बोलू नये किंवा त्यांची दिशाभूल करू नये. प्रामाणिक लोक कधीच दुसऱ्‍यांच्या वस्तू चोरत नाहीत किंवा त्यांना फसवत नाहीत. (नीतिवचनं २४:२८ आणि इफिसकर ४:२८ वाचा.) तसंच, ते कर भरण्याच्या बाबतीत कधीच सरकारची फसवणूक करत नाहीत. (रोमकर १३:५-७) अशा प्रकारे, आपण “सर्व गोष्टींत प्रामाणिकपणे” वागतो.—इब्री लोकांना १३:१८.

३. प्रामाणिक राहिल्यामुळे कोणते फायदे होतात?

आपण प्रामाणिक आहोत हे जेव्हा लोकांना माहीत असतं तेव्हा ते आपल्यावर भरवसा ठेवतात. आपण प्रामाणिकपणे वागतो तेव्हा संपूर्ण मंडळीला फायदा होतो. यामुळे मंडळीतले सगळे जण एका प्रेमळ कुटुंबाप्रमाणे एकमेकांवर भरवसा ठेवू शकतात. तसंच आपला विवेकही शुद्ध राहतो. शिवाय आपण प्रामाणिकपणे वागल्यामुळे, “आपला तारणकर्ता देव याच्या शिक्षणाला शोभा” येते. आणि जे साक्षीदार नाहीत तेसुद्धा खऱ्‍या उपासनेकडे आकर्षित होतात.—तीत २:१०.

आणखी जाणून घेऊ या

आपण प्रामाणिक राहिल्यामुळे यहोवाला कसं वाटतं, याचा आपल्याला काय फायदा होतो आणि वेगवेगळ्या परिस्थितींत आपण प्रामाणिक कसं राहू शकतो, हे आपण पाहू या.

४. यहोवाला प्रामाणिकपणा आवडतो

स्तोत्र ४४:२१ आणि मलाखी ३:१६ वाचा, आणि मग या प्रश्‍नांवर चर्चा करा:

  • आपण सत्य लपवू शकतो असा विचार करणं चुकीचं का आहे?

  • कधीकधी खरं बोलणं सोपं नसतं. पण अशा वेळीही आपण खरं बोलायचं निवडतो, तेव्हा यहोवाला कसं वाटत असेल?

जेव्हा मुलं खरं बोलतात, तेव्हा आईवडिलांना आनंद होतो. तसंच, जेव्हा आपण खरं बोलतो, तेव्हा यहोवाला आनंद होतो

५. नेहमी प्रामाणिकपणे वागा

बऱ्‍याच लोकांना असं वाटतं की प्रामाणिक राहिल्यामुळे कधीकधी आपलं नुकसान होतं. पण आपण नेहमी प्रामाणिक का राहिलं पाहिजे यावर विचार करू या. व्हिडिओ पाहा.

इब्री लोकांना १३:१८ वाचा, आणि मग खाली दिलेल्या परिस्थितींमध्ये आपण प्रामाणिक कसं राहू शकतो यावर चर्चा करा:

  • आपल्या कुटुंबासोबत असताना.

  • कामावर किंवा शाळेत असताना.

  • आणि इतर वेळी.

६. प्रामाणिक राहिल्यामुळे आपल्याला फायदा होतो

प्रामाणिक राहिल्यामुळे कधीकधी सुरुवातीला काही समस्या येऊ शकतात. पण पुढे जाऊन आपला नेहमी फायदाच होईल. स्तोत्र ३४:१२-१६ वाचा, आणि मग या प्रश्‍नावर चर्चा करा:

  • प्रामाणिक राहिल्यामुळे तुम्हाला कोणते फायदे होतील?

  1. १. प्रामाणिक पती-पत्नी आपलं नातं मजबूत करतात

  2. २. प्रामाणिक कर्मचारी आपल्या मालकाचा भरवसा जिंकतात

  3. ३. प्रामाणिक नागरिक अधिकाऱ्‍यांच्या नजरेत चांगलं नाव कमावतात

काही जण म्हणतात: “कोणाचा फायदा होत असेल, तर खोटं बोलायला काय हरकत आहे?”

  • यहोवाला कोणत्याच प्रकारचं खोटं आवडत नाही असं आपण का म्हणू शकतो?

थोडक्यात

यहोवाची अशी इच्छा आहे की त्याच्यासोबत मैत्री करणाऱ्‍यांचं वागणं आणि बोलणं नेहमी प्रामाणिक असलं पाहिजे.

उजळणी

  • दररोजच्या जीवनात आपण प्रामाणिक कसं राहू शकतो?

  • आपण सत्य लपवू शकतो असा विचार करणं चुकीचं का आहे?

  • तुम्हाला काय वाटतं, सर्व गोष्टींत प्रामाणिक राहणं चांगलं का आहे?

ध्येय

हेसुद्धा पाहा

आईवडील आपल्या मुलांना प्रामाणिक राहायला कसं शिकवू शकतात?

नेहमी खरं बोला  (१:४४)

आपण दिलेला शब्द का पाळला पाहिजे?

वादे निभाएँ, आशीषें पाएँ  (९:०९)

टॅक्सच्या पैशांचा गैरवापर होत असला तरीपण आपण तो भरला पाहिजे का?

“क्या टैक्स देना ज़रूरी है?” (ऑनलाईन लेख)

एक माणूस आपल्या जीवनात बदल करून प्रामाणिक कसा बनला?

“यहोवा देव दयाळू व क्षमाशील आहे हे मला कळलं” (टेहळणी बुरूज,  १ जुलै, २०१५)