व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

धडा ५५

तुमच्या मंडळीच्या कामाला हातभार लावा

तुमच्या मंडळीच्या कामाला हातभार लावा

सबंध जगात यहोवाच्या लोकांच्या हजारो मंडळ्या आहेत. आणि या मंडळ्यांमध्ये ते आनंदाने यहोवाची उपासना करतात. सभांमध्ये मिळणाऱ्‍या शिक्षणाची आणि मार्गदर्शनाची ते मनापासून कदर करतात आणि वेगवेगळ्या मार्गांनी आपल्या मंडळीच्या कामाला हातभार लावायला ते उत्सुक असतात. तुम्हालाही तुमच्या मंडळीबद्दल असंच वाटतं का?

१. मंडळीच्या कामाला हातभार लावण्यासाठी तुम्ही आपला वेळ आणि शक्‍ती कशी वापरू शकता?

मंडळीच्या कामाला आपण सगळेच वेगवेगळ्या मार्गांनी हातभार लावू शकतो. उदाहरणार्थ, तुमच्या मंडळीत वयस्कर किंवा शारीरिक समस्या असलेले भाऊबहीण आहेत का? तुम्ही त्यांना सभांना यायला मदत करू शकता का? किंवा घरातलं सामान आणून देण्यात किंवा इतर कामं करण्यात मदत करू शकता का? (याकोब १:२७ वाचा.) आपण आपल्या राज्य सभागृहाच्या साफसफाईच्या आणि दुरुस्तीच्या कामात मदत करण्यासाठीही पुढे येऊ शकतो. ही सगळी कामं करायला कोणीही आपल्याला जबरदस्ती करत नाही. उलट, देवावर आणि आपल्या भाऊबहिणींवर प्रेम असल्यामुळे आपण ही कामं करायला ‘स्वेच्छेने पुढे येतो.’स्तोत्र ११०:३.

बाप्तिस्मा झालेले भाऊबहीण मंडळीला आणखी बऱ्‍याच मार्गांनी मदत करू शकतात. जसं की, बायबलमध्ये दिलेल्या पात्रता पूर्ण करणारे भाऊ सहायक सेवक म्हणून आणि पुढे वडील म्हणूनसुद्धा सेवा करू शकतात. तसंच, पायनियर म्हणून सेवा करण्याद्वारे भाऊ आणि बहिणी दोघंही प्रचार कार्याला आणखी हातभार लावू शकतात. काही भाऊबहीण राज्याच्या कामासाठी वापरल्या जाणाऱ्‍या इमारती बांधण्यासाठी मदत करू शकतात. तसंच, ते जास्त गरज असलेल्या ठिकाणी जाऊन तिथल्या मंडळीला वेगवेगळ्या मार्गांनी मदत करू शकतात.

२. आपल्याजवळ असलेल्या साधनांचा आपण मंडळीला हातभार लावण्यासाठी कसा वापर करू शकतो?

आपण “आपल्या मौल्यवान वस्तूंनी . . . यहोवाचा आदर” करू शकतो. (नीतिवचनं ३:९) आपल्या मंडळीसाठी आणि जगभरातल्या प्रचार कार्यासाठी दान देणं हा आपण एक बहुमान समजतो. (२ करिंथकर ९:७ वाचा.) आपण दिलेल्या दानाचा विपत्ती मदतकार्यासाठीही उपयोग केला जातो. बरेच भाऊबहीण दान देण्यासाठी नियमितपणे “काही रक्कम बाजूला काढून” ठेवतात. (१ करिंथकर १६:२ वाचा.) आपण आपल्या राज्य सभागृहातल्या दानपेटीत दान टाकू शकतो, किंवा donate.pr418.com वर ऑनलाईन दानसुद्धा देऊ शकतो. यहोवाने आपल्याला आपले पैसे आणि इतर गोष्टी त्याच्या कामासाठी वापरून त्याच्यावर असलेलं प्रेम दाखवण्याची एक चांगली संधी दिली आहे.

आणखी जाणून घेऊ या

आपण आणखी कोणकोणत्या मार्गांनी मंडळीला हातभार लावू शकतो यावर विचार करू या.

३. आपण दान देऊ शकतो

आनंदाने दान देणारा यहोवाला आवडतो. येशूलाही याबाबतीत असंच वाटतं. उदाहरणार्थ, खूप गरीब असलेल्या एका विधवेने मंदिरात यहोवासाठी दान दिलं तेव्हा येशूने तिची प्रशंसा केली. लूक २१:१-४ वाचा, आणि मग या प्रश्‍नांवर चर्चा करा:

  • यहोवाला आनंदित करण्यासाठी दान म्हणून मोठी रक्कम देण्याची गरज आहे का?

  • आपण मनापासून दान देतो तेव्हा यहोवाला आणि येशूला कसं वाटतं?

आपण दिलेल्या दानांचा कशा प्रकारे वापर केला जातो हे जाणून घेण्यासाठी, व्हिडिओ पाहा. मग खाली दिलेल्या प्रश्‍नावर चर्चा करा.

  • आपल्या दानांचा जगभरातल्या मंडळ्यांसाठी कशा प्रकारे वापर केला जातो?

४. आपण मदतीचा हात पुढे करू शकतो

बायबलच्या काळात, यहोवाच्या सेवकांनी त्यांच्या उपासनेची ठिकाणं चांगल्या स्थितीत ठेवण्यात खूप उत्साहाने सहभाग घेतला. पण यासाठी त्यांनी फक्‍त पैशांची मदत केली नाही. हे कशावरून म्हणता येईल? २ इतिहास ३४:९-११ वाचा, आणि मग या प्रश्‍नावर चर्चा करा:

  • यहोवाच्या मंदिराची काळजी घेण्यासाठी प्रत्येक इस्राएली कशी मदत करायचा?

यहोवाचे साक्षीदार प्राचीन काळातल्या इस्राएली लोकांच्या उदाहरणाचं कशा प्रकारे अनुकरण करतात हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पाहा. मग खाली दिलेल्या प्रश्‍नांवर चर्चा करा.

  • आपलं राज्य सभागृह स्वच्छ आणि चांगल्या स्थितीत ठेवणं का महत्त्वाचं आहे?

  • यासाठी तुम्ही कोणकोणत्या मार्गांनी मदत करू शकता?

५. मंडळीतले भाऊ जास्त जबाबदारी घेण्यासाठी पुढे येऊ शकतात

बायबलमध्ये ख्रिस्ती पुरुषांना मंडळीच्या कामाला जास्तीत जास्त हातभार लावण्यासाठी पुढे येण्याचं प्रोत्साहन दिलंय. याचं एक उदाहरण पाहण्यासाठी व्हिडिओ पाहा. मग खाली दिलेल्या प्रश्‍नावर चर्चा करा.

  • रायन मंडळीच्या कामाला जास्तीत जास्त हातभार लावण्यासाठी कसा पुढे आला?

सहायक सेवक आणि वडील म्हणून सेवा करण्यासाठी बांधवांनी कोणत्या पात्रता पूर्ण केल्या पाहिजेत हे बायबलमध्ये सांगितलंय. १ तीमथ्य ३:१-१३ वाचा, आणि मग या प्रश्‍नांवर चर्चा करा:

  • सहायक सेवक आणि वडील म्हणून सेवा करण्यासाठी भावांनी कोणत्या पात्रता पूर्ण केल्या पाहिजेत?

  • त्यांच्या कुटुंबाकडून काय अपेक्षा केली जाते?— आणि ११ ही वचनं पाहा.

  • मंडळीतले भाऊ या पात्रता पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा संपूर्ण मंडळीला कसा फायदा होतो?

कदाचित कोणी विचारेल: “यहोवाच्या साक्षीदारांच्या कामासाठी पैसा कुठून येतो?”

  • तुम्ही त्यांना काय उत्तर द्याल?

थोडक्यात

आपण आपला वेळ, शक्‍ती आणि साधनांचा उपयोग करून मंडळीला हातभार लावतो तेव्हा यहोवाला खूप आनंद होतो.

उजळणी

  • मंडळीच्या कामाला हातभार लावण्यासाठी आपण आपला वेळ आणि शक्‍ती कशी वापरू शकतो?

  • मंडळीच्या कामाला हातभार लावण्यासाठी आपण आपल्या पैशांचा आणि साधनांचा कसा वापर करू शकतो?

  • मंडळीच्या कामाला हातभार लावण्यासाठी तुम्हाला कायकाय करायला आवडेल?

ध्येय

हेसुद्धा पाहा

देव आपल्या उपासकांकडून आता दशमांशाची अपेक्षा का करत नाही हे जाणून घ्या.

“दशांश देण्याबद्दल बायबल काय म्हणतं?” (वेबसाईटवरचा लेख)

बायबलमध्ये सांगितलंय की काही जबाबदाऱ्‍या बाप्तिस्मा झालेल्या पुरुषांनी हाताळाव्यात. पण जर या जबाबदाऱ्‍या बाप्तिस्मा घेतलेल्या स्त्रीयांना हाताळण्याची गरज पडली तर काय?

“वडिलांना मंडळीत कोणता अधिकार देण्यात आला आहे?” (टेहळणी बुरूज,  फेब्रुवारी २०२१)

आपल्या बांधवांपर्यंत प्रकाशनं पोहचवण्यासाठी काही साक्षीदारांनी धैर्य कसं दाखवलं ते पाहा.

काँगोमध्ये बायबल साहित्याचं वितरण (४:२५)

इतर धार्मिक संघटनांच्या तुलनेत आपल्या कार्याला किती वेगळ्या प्रकारे आर्थिक हातभार लावला जातो याबद्दल वाचा.

“यहोवाच्या साक्षीदारांच्या कार्यासाठी पैसा कुठून मिळतो?” (वेबसाईटवरचा लेख)