व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

धडा ५९

छळ झाला तरी धीर सोडू नका!

छळ झाला तरी धीर सोडू नका!

आज ना उद्या यहोवाच्या सगळ्याच साक्षीदारांना विरोधाचा किंवा कदाचित छळाचाही सामना करावा लागेल. पण हे जाणून आपल्याला आश्‍चर्य वाटण्याची काही गरज नाही.

१. आपला छळ होईल अशी अपेक्षा आपण का करू शकतो?

बायबल स्पष्टपणे सांगतं: “ख्रिस्त येशूमध्ये देवाची भक्‍ती करत जीवन जगू इच्छिणाऱ्‍या सगळ्यांचा छळ केला जाईल.” (२ तीमथ्य ३:१२) येशूचाही छळ करण्यात आला होता. कारण तो सैतानाच्या जगाचा भाग नव्हता. तसंच आपणसुद्धा या जगाचा भाग नाही. त्यामुळे जेव्हा या जगातली सरकारं आणि धार्मिक संघटना आपला छळ करतात, तेव्हा आपल्याला आश्‍चर्य वाटत नाही.—योहान १५:१८, १९.

२. छळाचा सामना करण्यासाठी आपण स्वतःला तयार कसं करू शकतो?

आपण आतापासूनच यहोवावरचा आपला भरवसा वाढवला पाहिजे. त्यासाठी आपण दररोज प्रार्थना करायला आणि बायबलचा काही भाग वाचायला वेळ काढला पाहिजे. तसंच आपण मंडळीच्या सभांनाही नेहमी हजर राहिलं पाहिजे. असं केल्यामुळे कोणत्याही प्रकारच्या छळाचा धैर्याने सामना करायचं बळ आपल्याला मिळेल, मग तो कुटुंबाच्या सदस्यांकडून झाला तरीसुद्धा. प्रेषित पौलला बऱ्‍याचदा छळाचा सामना करावा लागला. पण त्याने म्हटलं: “यहोवा मला साहाय्य करतो; मी घाबरणार नाही.”इब्री लोकांना १३:६.

तसंच, नियमितपणे प्रचार केल्यामुळे आपलं धैर्य वाढेल. कारण जेव्हा आपण प्रचार करतो, तेव्हा आपण माणसांच्या भीतीवर मात करून यहोवावर भरवसा ठेवायला शिकतो. (नीतिवचनं २९:२५) म्हणून आताच धैर्याने प्रचार करायला शिका. म्हणजे मग भविष्यात जरी सरकारने आपल्या कार्यावर निर्बंध घातले, तरीसुद्धा तुम्हाला प्रचार कार्य करत राहायला जड जाणार नाही.—१ थेस्सलनीकाकर २:२.

३. धीराने छळाचा सामना केल्यामुळे आपल्याला काय फायदा होतो?

आपला छळ होतो तेव्हा साहजिकच आपल्याला त्रास होतो. पण जेव्हा आपण धीर सोडत नाही आणि छळाचा यशस्वीपणे सामना करतो तेव्हा आपला विश्‍वास आणखी मजबूत होतो. तसंच आपण यहोवाच्या आणखी जवळ येतो. कारण जेव्हा आपल्याला अगदी असाहाय्य वाटत असतं, तेव्हा तो आपल्याला कशी मदत करतो हे आपण स्वतः अनुभवतो. (याकोब १:२-४ वाचा.) जेव्हा आपल्याला छळ सहन करावा लागतो, तेव्हा यहोवाला खूप वाईट वाटतं. पण तशा परिस्थितीतही आपण जेव्हा धीर सोडत नाही, तेव्हा ते पाहून त्याला खूप आनंद होतो. बायबलमध्ये असं म्हटलंय: “जर चांगलं केल्याबद्दल तुम्ही दुःख सोसलं, तर देवाच्या नजरेत ही एक चांगली गोष्ट आहे.” (१ पेत्र २:२०) जे छळाचा धीराने सामना करून शेवटपर्यंत विश्‍वासू राहतात, त्यांना यहोवा मोठं प्रतिफळ देईल. तो त्यांना अशा एका जगात कायमचं जीवन देईल, जिथे खऱ्‍या उपासनेचा कोणीही विरोध करणार नाही.—मत्तय २४:१३.

आणखी जाणून घेऊ या

छळ होत असतानाही आपण यहोवाला एकनिष्ठ राहू शकतो आणि तो आपल्याला याचं मोठं प्रतिफळ देईल, हा आत्मविश्‍वास तुम्ही का बाळगू शकता यावर चर्चा करू या.

४. कुटुंबाकडून विरोध झाला तरी धीर सोडू नका

येशूने सांगितलं होतं की जेव्हा आपण यहोवाची उपासना करायचा निर्णय घेतो, तेव्हा आपल्या कुटुंबातल्या काही सदस्यांना कदाचित ते आवडणार नाही. मत्तय १०:३४-३६ वाचा, आणि मग या प्रश्‍नावर चर्चा करा:

  • कुटुंबातला एक जण यहोवाची उपासना करण्याचा निर्णय घेतो, तेव्हा काय होऊ शकतं?

व्हिडिओ पाहा, आणि मग खाली दिलेल्या प्रश्‍नावर चर्चा करा.

  • तुमच्या एखाद्या नातेवाइकाने किंवा मित्राने यहोवाची उपासना करण्यापासून तुम्हाला रोखायचा प्रयत्न केला तर तुम्ही काय कराल?

स्तोत्र २७:१० आणि मार्क १०:२९, ३० वाचा. प्रत्येक वचन वाचून झाल्यावर या प्रश्‍नावर चर्चा करा:

  • कुटुंबाकडून किंवा मित्रांकडून तुम्हाला विरोधाचा सामना करावा लागला तर या वचनातले शब्द तुम्हाला कशी मदत करतील?

५. छळ होत असतानाही यहोवाची उपासना करायचं सोडू नका

इतर जण रोखायचा प्रयत्न करतात, तेव्हासुद्धा यहोवाची उपासना करत राहण्यासाठी धैर्य लागतं. व्हिडिओ पाहा, आणि मग खाली दिलेल्या प्रश्‍नावर चर्चा करा.

  • या व्हिडिओमधल्या उदाहरणांतून तुम्हाला कशा प्रकारे धैर्य मिळालं?

प्रेषितांची कार्यं ५:२७-२९ आणि इब्री लोकांना १०:२४, २५ वाचा. प्रत्येक वचन वाचून झाल्यावर या प्रश्‍नावर चर्चा करा:

  • आपल्या प्रचार कार्यावर किंवा सभांवर निर्बंध लावले जातात, तेव्हासुद्धा यहोवाची उपासना करत राहणं इतकं महत्त्वाचं का आहे?

६. यहोवा तुम्हाला धीर धरायला मदत करेल

वेगवेगळ्या वयोगटांतले आणि देशांतले यहोवाचे साक्षीदार छळ होत असतानाही एकनिष्ठपणे यहोवाची उपासना करत आहेत. त्यांना कशामुळे मदत मिळाली आहे, हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पाहा. मग खाली दिलेल्या प्रश्‍नावर चर्चा करा.

  • व्हिडिओमध्ये दाखवलेल्या साक्षीदारांना धीराने छळाचा सामना करायला कशामुळे मदत झाली?

रोमकर ८:३५, ३७-३९ आणि फिलिप्पैकर ४:१३ वाचा. प्रत्येक वचन वाचून झाल्यावर या प्रश्‍नावर चर्चा करा:

  • तुम्ही कोणत्याही प्रकारच्या परीक्षेचा धीराने सामना करू शकता, असं आश्‍वासन तुम्हाला या वचनातून कसं मिळतं?

मत्तय ५:१०-१२ वाचा, आणि मग या प्रश्‍नावर चर्चा करा:

  • छळ होत असतानाही तुम्ही आनंदी का राहू शकता?

यहोवाच्या लाखो उपासकांनी छळाचा धीराने सामना केलाय. तुम्हीही नक्कीच करू शकता!

काही जण म्हणतात: “मला नाही वाटत, मी छळ सहन करू शकेन.”

  • कोणत्या वचनांमधून आपल्याला छळाचा सामना करण्यासाठी लागणारं धैर्य मिळू शकतं?

थोडक्यात

छळ होत असतानाही यहोवाची उपासना करत राहण्यासाठी आपण जे प्रयत्न करतो, ते यहोवाला खूप मोलाचे वाटतात. त्याच्या मदतीने आपण नक्कीच छळाचा यशस्वीपणे सामना करू शकतो.

उजळणी

  • आपला छळ होईल अशी यहोवाच्या साक्षीदारांनी अपेक्षा का केली पाहिजे?

  • पुढे होणाऱ्‍या छळाचा सामना करण्यासाठी तुम्ही आताच तयारी कशी करू शकता?

  • कोणतीही परीक्षा आली तरी यहोवाची सेवा करत राहण्याचा आत्मविश्‍वास तुम्हाला कशामुळे मिळेल?

ध्येय

हेसुद्धा पाहा

निष्पक्ष राहिल्यामुळे जेलमध्ये टाकण्यात आलं, तेव्हा एका तरुण भावाला यहोवाने कशी मदत केली हे त्याच्याकडूनच ऐका.

छळ होत असतानाही हार मानू नका  (२:३४)

बरीच वर्षं विरोध होऊनही यहोवाची विश्‍वासूपणे सेवा करत राहायला एका जोडप्याला कशामुळे मदत मिळाली, हे पाहा.

बदलते माहौल में यहोवा की सेवा करना  (७:११)

छळाचा धैर्याने कसा सामना करायचा हे जाणून घ्या.

“छळाचा सामना करण्यासाठी आताच तयारी करा” (टेहळणी बुरूज,  जुलै २०१९)

कुटुंबाकडून विरोध होतो तेव्हा आपण त्याबद्दल कसा विचार केला पाहिजे आणि यामुळे येणाऱ्‍या समस्यांचा यशस्वीपणे आपण कसा सामना करू शकतो?

“सत्यामुळे ‘शांती’ आणली जात नाही, तर ‘तलवार’ चालवली जाते” (टेहळणी बुरूज,  ऑक्टोबर २०१७)