व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी


या अभ्यासाचा पूर्ण फायदा घेण्यासाठी . . .

या अभ्यासाचा पूर्ण फायदा घेण्यासाठी . . .

इथे दिलेली माहिती वाचा आणि मग व्हिडिओ पाहा.

पहिला भाग

प्रत्येक धड्याची तयारी करण्यासाठी धड्याचं पहिलं पान वाचा. यात मुख्य मुद्द्‌यांकडे लक्ष वेधणारे (१) प्रश्‍न आणि (२) वचनं ठळक अक्षरात दिली आहेत. तसंच, “वाचा” असा उल्लेख केलेल्या वचनांकडेही खास लक्ष द्या.

दुसरा भाग

आणखी जाणून घेऊ या  याखाली दिलेली (३) सुरुवातीची वाक्यं पुढे दिलेल्या माहितीचा सारांश देतात. (४) उपशीर्षकं धड्यातल्या मुख्य मुद्द्‌यांकडे लक्ष वेधतात. अभ्यास घेणाऱ्‍यासोबत वचनं वाचा, प्रश्‍नांची उत्तरं द्या आणि व्हिडिओ पाहा.

व्हिडिओ आणि ऑडिओ तुम्हाला धड्यातली माहिती चांगल्या प्रकारे समजून घ्यायला मदत करतील. काही व्हिडिओंमध्ये खरोखर घडलेल्या घटना दाखवल्या आहेत. तर काही व्हिडिओंमध्ये खऱ्‍या घटना किंवा व्यक्‍ती नसून, दररोजच्या जीवनातल्या परिस्थिती नाटकाच्या रूपात दाखवल्या आहेत.

(५) चित्रं आणि त्याखालच्या वाक्यावर विचार करा. त्यानंतर (६) काही जण म्हणतात  यातल्या विधानांना कसं उत्तर देता येईल याचा विचार करा.

तिसरा भाग

धड्याच्या शेवटी (७) थोडक्यात  आणि उजळणी  हे भाग आहेत. धडा संपवला, ती तारीख लिहून ठेवा. (८) ध्येय यात करण्यासारख्या काही गोष्टी सुचवल्या आहेत. (९) हेसुद्धा पाहा यात आवडीप्रमाणे पाहण्यासाठी व्हिडिओ आणि लेखही आहेत.

बायबलची वचनं कशी शोधायची?

बायबल हे ६६ लहान लहान पुस्तकांनी मिळून बनलं आहे. त्यात दोन भाग आहेत: हिब्रू-ॲरामेईक शास्त्रवचनं (“जुना करार”) आणि ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनं (“नवा करार”).

बायबलच्या वचनांत सगळ्यात आधी (१) पुस्तकाचं नाव, मग (२) अध्याय आणि त्यानंतर (३) वचन किंवा वचनं दिलेली असतात.

उदाहरणार्थ, योहान १७:३ म्हणजे योहानच्या पुस्तकामध्ये, १७ व्या अध्यायातलं, ३ रं वचन.