व्हिडिओ पाहण्यासाठी

कौटुंबिक जीवनाचा आनंद लुटा

कौटुंबिक जीवनाचा आनंद लुटा

कौटुंबिक जीवनाचा आनंद लुटा

कुटुंबांना खरेच आनंदी होता येईल का?

हे कसे शक्य आहे?

या पत्रिकेवर दाखवल्याप्रमाणे आनंदी व ऐक्याने राहणारे कुटुंब तुम्ही कोठे पाहिलेत का? सर्वत्र कुटुंबाची विभागणी होत आहे. घटस्फोट, सुरक्षित नोकरीची कमतरता, एक-पालकीय पेच, निराशा—या सर्वामुळे पेचप्रसंग वाढत आहेत. कौटुंबिक जीवनाचा अभ्यास करणारे तज्ज्ञ विलापाने म्हणतातः “कुटुंबाचा विध्वंस होण्याचे जे भविष्य वर्तविण्यात आले होते ते आता सगळीकडे सर्वज्ञात झाले आहे.”

कुटुंबावर इतक्या गंभीर समस्यांचा भडिमार का होत आहे? आम्ही कौटुंबिक जीवनाचा आनंद कसा लुटू शकतो?

कुटुंबाचा आरंभ कसा झाला

या प्रश्‍नांच्या उत्तरासाठी, आपल्याला कुटुंबाचा व विवाहाचा आरंभ कसा झाला त्याची माहिती असणे आवश्‍यक आहे. कारण जर याचा निर्माता—उत्पन्‍नकर्ता—आहे तर कुटुंबातील सर्व सदस्यांनी त्याच्याकडे मार्गदर्शनासाठी पाहावयास हवे, कारण आम्ही कौटुंबिक जीवनाचा पूर्णानंद कसा घ्यावा हे खात्रीने तोच अधिक जाणून असणार.

पुष्कळांचा असा विश्‍वास आहे की कौटुंबिक जीवनाचा कोणीही निर्माता नाही, हे मनोरंजक आहे. द एनस्लायकोपिडीया अमेरिकाना म्हणतेः “मानवाच्या खालोखाल असलेल्या प्राण्यांच्या जोड्यांची योजना मानवाला दिसून आल्यामुळे हेच विवाहाच्या निर्मितीचे कारण आहे यावर जोर देण्याचा कल काही विद्वानांचा आहे.” तथापि, येशू ख्रिस्ताने पुरुष व स्त्रीच्या निर्मितीबद्दल म्हटले होते. त्याने सुरुवातीच्या पवित्र शास्त्र अहवालाचा अधिकार म्हणून संदर्भ घेतला व म्हटलेः “देवाने जे जोडले आहे ते माणसाने तोडू नये.”—मत्तय १९:४-६.

यास्तव, येशू ख्रिस्ताचे बरोबर आहे. एका बुद्धिमान देवाने पहिल्या मानवांची निर्मिती केली व आनंदी कौटुंबिक जीवनाची योजना केली. देवाने पहिल्या जोडप्याला विवाहाद्वारे एकत्र आणले व म्हटले की पुरुष “आपल्या स्त्रीशी जडून राहील; ती दोघे एकदेह होतील.” (उत्पत्ती २:२२-२४) आजच्या कौटुंबिक समस्या निमार्णकर्त्याने त्याच्या वचनात, पवित्र शास्त्रात दाखविलेल्या दर्जांचा भंग करणाऱ्‍या जीवनशैलीचा पाठपुरावा करीत राहिल्यामुळे तर उद्‌भवल्या नाहीत ना?

यशस्वी होण्याचा मार्ग कोणता?

आधुनिक जग हे स्वार्थी व स्वतःची इच्छा पुरविणाऱ्‍या गोष्टींना चेतविते याची तुम्हाला निःसंशये कल्पना आहे. एका अर्थव्यवस्था तज्ज्ञाने अमेरिकेमधील कॉलेजच्या पदवी वर्गात सांगितले. “लोभ हा सशक्‍त असतो, तुम्ही जरी लोभी असलात तरी तुम्हाला स्वतःबद्दल चांगलेच वाटू लागेल.” पण भौतिक संपदेचा पाठपुरावा करणे हे यशाकडे नेत नाही. भौतिकवाद हा वस्तुतः कौटुंबिक जीवनाला एकमेव असा सर्वात मोठा धोका आहे. कारण तो मानवी नातेसंबंधाच्यामध्ये आड येतो आणि लोकांकडून वेळ व पैसा हिरावून घेत असतो. याच्या विरुद्ध, पवित्र शास्त्रातील नीतिसूत्रे यामधील दोन उतारे आनंदासाठी काय महत्वाचे आहे हे पाहण्यास कशी मदत करतात त्याचा विचार करा.

“द्वेषबुद्धी असेल तेथे उत्तम मांसाहार करण्यापेक्षा, प्रेम असेल तेथली भाजीभाकरी बरी.”

“एखाद्या घरात मेजवानीची चंगळ असून त्यात कलह असला तर त्यापेक्षा शांती असून कोरडा तुकडा मिळाला तरी तो बरा.” नीतिसूत्रे १५:१७; कॉमन लँग्वेज मराठी बायबल. १७:१टुडेज्‌ इंग्लिश व्हर्शन.”

किती जोरदार वचने आहेत ही, नाही का? प्रत्येक कुटुंबाने यांना अग्रस्थानी ठेवले तर जग किती निराळे होईल याची कल्पना करा! कौटुंबिक सदस्यांनी एकमेकांसोबत कसा व्यवहार राखावा यासंबंधीही पवित्र शास्त्र बहुमोल मार्गदर्शन पुरविते. यातील काहींचा अधिकृत उल्लेख येथे दिला आहे.

पती: “पत्नी आपलेच शरीर आहे असे समजून तिच्यावर प्रीति करा.”—इफिसकरांस ५:२८-३०.

साधे, पण व्यवहार्य! पतीने त्याच्या पत्नीला ‘मान द्यावा’ असेही पवित्र शास्त्र सांगते. (१ पेत्र ३:७) हे तो तिच्याकडे खास लक्ष देऊन करु शकतो ज्यात प्रेमळपणा, समजुतदारपणा व धीराचा समावेश आहे. तो तिच्या मतांचाही विचार करतो व तिचे ऐकतोही. (पडताळा उत्पत्ती २१:१२.) पतीला स्वतःला ज्याप्रकारे वागणूक पाहिजे, तशीच त्याने त्याच्या पत्नीशी काळजीपूर्वक वर्तणूक केली तर कोणत्याही कुटुंबाला त्याचा फायदा होईल असे तुम्हाला वाटत नाही का?—मत्तय ७:१२.

पत्नी: “पत्नीने आपल्या पतीची भीड राखावी.”—इफिसकरांस ५:३३.

पतीच्या भारी जबाबदाऱ्‍यांना सहकार्य करुन पत्नी कौटुंबिक आनंदात भर घालू शकते. देवाने पत्नीची योजना केली ती, तिने “त्याच्यासाठी अनुरुप साहाय्यक” असावे याच हेतूने. (उत्पत्ती २:१८) पत्नी जेव्हा आपल्या पतीच्या निणर्यांना पाठिंबा देऊन आदर दाखविते व कौटुंबिक ध्येये गाठण्यास सहकार्य करते तेव्हा कौटुंबिक जीवनाच्या आशीर्वादांची गुणग्राहकता तुम्हाला वाटणार नाही का?

विवाह सोबती: “पती आणि पत्नी यांनी एकमेकांसोबत विश्‍वासू असावे.”—इब्रीकरांस १३:४, टु.इं.व्ह.

ते जर विश्‍वासू असतील तर कौटुंबिक जीवनास खात्रीने याचा फायदा होईल. कित्येकदा व्यभिचारामुळे कुटुंब उध्वस्त होतात. (नीतिसूत्रे ६:२७-२९, ३२) यामुळेच पवित्र शास्त्र अगदी सूज्ञ सल्ला देते: “तरुणपणी केलेल्या स्त्रीसह संतुष्ट ऐस. . .परक्या स्त्रीला तू का आलिंगन द्यावे?”—नीतिसूत्रे ५:१८-२०.

पालक: “मुलाच्या स्थितीस अनुरुप असे शिक्षण त्याला” द्या.—नीतिसूत्रे २२:६.

जेव्हा पालक आपल्या मुलांसाठी पुरेसा वेळ व लक्ष देतात तेव्हा त्यांच्या कौटुंबिक जीवनात खात्रीने सुधारणा होते. यास्तव, पवित्र शास्त्र पालकांना आर्जविते की त्यांनी मुलांना ‘घरी बसलेले असता, मार्गाने चालत असता, निजता, उठता’ योग्य तत्वांना शिकवावे. (अनुवाद ११:१९) तसेच पवित्र शास्त्र हे देखील सांगते की पालकांचे त्यांच्या मुलांवर प्रेम आहे हे त्यांना योग्य शिस्त लावण्याने प्रदर्शित करावे.—इफिसकरांस ६:४.

मुले: “मुलांनो, प्रभूमध्ये तुम्ही आपल्या आईबापाच्या आज्ञेत राहा.”—इफिसकरांस ६:१.

ह्‍या अधार्मिक जगात, तुमच्या पालकांच्या आज्ञेत राहणे हे नेहमीच म्हणावे तितके सोपे नसते, हे खरे. तरीही, कुटुंबाचा निर्माता जे सांगतो त्याप्रमाणे करणे शहाणपणाचे आहे ह्‍याशी तुम्ही सहमत नाहीत का? आमचे कौटुंबिक जीवन कशामुळे आनंदी होऊ शकते हे तो चांगले जाणतो. म्हणूनच, तुमच्या पालकांच्या आज्ञेत राहण्यास परिश्रमी प्रयत्न करा. वाईट ते करण्याच्या या जगाच्या मोहपाशांना टाळण्यात प्रयत्नशील असा.—नीतिसूत्रे १:१०-१९.

जितक्या प्रमाणात कुटुंबातील प्रत्येक सदस्य पवित्र शास्त्राचा सल्ला अनुसरतील, तितक्या अधिक प्रमाणात कौटुंबिक जीवनास फायदा होईल. आनंदी कौटुंबिक जीवनाचा उपभोग केवळ आताच नव्हे तर देवाने अभिवचन दिलेल्या नवीन जगाच्या सुंदर भवितव्यातही घेता येईल. (२ पेत्र ३:१३; प्रकटीकरण २१:३, ४) यास्तव सबंध कुटुंब मिळून एकत्र पवित्र शास्त्र अभ्यास करण्याची सवय लावून घ्या! जगभरातील लाखो कुटुंबांना सुंदर चित्रांनी युक्‍त असलेले तुम्ही पृथ्वीवर नंदनवनात अनंतकाल जगू शकाल या पुस्तकाद्वारे फायदा मिळाला.

अन्यथा सूचित केले नसल्यास येथे वापरलेले बायबल भाषांतर द होली बायबल मराठी—आर. व्ही. हे आहे.