अविवाहित राहणं
अविवाहित राहणं फायद्याचं असू शकतं असं का म्हणता येईल?
एखाद्या अविवाहित भाऊबहिणीवर लग्न करायचा दबाव टाकणं चुकीचं का आहे?
-
उपयोगी बायबल अहवाल:
-
रोम १४:१०-१२—आपले भाऊबहीण वैयक्तिक निर्णय घेतात, तेव्हा त्यांबद्दल आपण त्यांची टीका का करू नये हे प्रेषित पौलने समजावलं
-
१कर ९:३-५—प्रेषित पौलला लग्न करायचा हक्क होता, पण अविवाहित राहिल्यामुळे त्याला आपल्या सेवाकार्यावर पूर्ण लक्ष देता आलं
-
जीवनात आनंदी राहण्यासाठी लग्न केलंच पाहिजे असा अविवाहित जणांनी विचार करावा का?
-
उपयोगी बायबल अहवाल:
-
शास ११:३०-४०—इफ्ताहची मुलगी अविवाहित राहिली आणि तिने आयुष्यभर आनंदाने उपासना मंडपात सेवा केली
-
प्रेका २०:३५—येशूने लग्न केलं नाही, तरी तो आनंदी होता; त्याच्या शब्दांवरून दिसून येतं की इतरांना मदत केल्यामुळे तो आनंदी होता
-
१थेस १:२-९; २:१२—प्रेषित पौल अविवाहित होता आणि त्याला सेवाकार्यातून खूप आनंद मिळाला असं तो म्हणाला. कारण तो बऱ्याच लोकांना यहोवाबद्दल शिकायला मदत करू शकला
-
देवाच्या सगळ्या सेवकांप्रमाणेच अविवाहित भाऊबहिणींनीसुद्धा नैतिक रितीने शुद्ध का असलं पाहिजे?
१कर ६:१८; गल ५:१९-२१; इफि ५:३, ४
-
उपयोगी बायबल अहवाल:
-
नीत ७:७-२३—एका तरुणाला वाईट चालीची स्त्री आपल्या जाळ्यात अडकवते, तेव्हा त्याला कोणते भयानक परिणाम भोगावे लागतात याचं शलमोन राजाने वर्णन केलं
-
गीत ४:१२; ८:८-१०—शुलेमच्या मुलीने लग्नाच्या बाबतीत असलेले यहोवाचे स्तर मोडले नाहीत, म्हणून तिची प्रशंसा करण्यात आली
-
एका अविवाहित व्यक्तीने लग्न करायचा विचार करणं कधी सुज्ञपणाचं राहील?
हेसुद्धा पाहा: १थेस ४:४, ५