आईवडील
यहोवाने विवाहाच्या व्यवस्थेची सुरुवात का केली?
आईवडिलांना आपल्या मुलांबद्दल कसं वाटलं पाहिजे?
हेसुद्धा पाहा: “लहान मुलं; तरुण”
-
उपयोगी बायबल अहवाल:
-
उत्प ३३:४, ५—मुलं ही यहोवाकडून मिळालेला आशीर्वाद आहे असं याकोबने मानलं
-
निर्ग १:१५, १६, २२; २:१-४; ६:२०—अम्राम आणि योखबेद यांना मोशे झाला आणि त्याला वाचवण्यासाठी त्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घातला
-
आईवडिलांवर मुलांच्या कोणत्या जबाबदाऱ्या असतात?
अनु ६:६, ७; ११:१८, १९; नीत २२:६; २कर १२:१४; १ती ५:८
-
उपयोगी बायबल अहवाल:
-
१शमु १:१-४—सणाच्या वेळी एलकाना आपल्या संपूर्ण कुटुंबाला शिलोला घेऊन जायचा. कारण आपल्या सर्व मुलांनी यहोवाची उपासना करावी असं त्याला वाटायचं
-
लूक २:३९, ४१—योसेफ आणि मरीया आपल्या मुलाबाळांना घेऊन नियमितपणे वल्हांडण सण साजरा करण्यासाठी यरुशलेमला जायचे
-
मुलांना यहोवाच्या आज्ञा पाळायला शिकवल्यामुळे कोणते फायदे होतात?
हेसुद्धा पाहा: २ती ३:१४, १५
-
उपयोगी बायबल अहवाल:
-
१शमु २:१८-२१, २६; ३:१९—शमुवेलच्या आईवडिलांनी त्याला उपासना मंडपात सेवा करण्यासाठी दिलं. पण ते नियमितपणे त्याला भेटायला जायचे आणि त्याला गरजेच्या वस्तू पुरवायचे. यामुळे पुढे जाऊन तो यहोवाचा एक विश्वासू सेवक बनला
-
लूक २:५१, ५२—येशूचे आईवडील परिपूर्ण नव्हते तरी तो त्यांच्या अधीन राहिला
-
मुलांना चांगल्या प्रकारे वाढवण्यासाठी आईवडिलांना मार्गदर्शन कुठून मिळू शकतं?
अनु ६:४-९; इफि ६:४; २ती ३:१४-१७
हेसुद्धा पाहा: स्तो १२७:१; नीत १६:३
-
उपयोगी बायबल अहवाल:
-
शास १३:२-८—स्वर्गदूताने मानोहाला सांगितलं की यहोवाच्या आशीर्वादाने त्याला आणि त्याच्या बायकोला एक मुलगा होईल. तेव्हा त्या मुलाचं पालनपोषण कसं करायचं याबद्दल मानोहाने यहोवाकडे मार्गदर्शन मागितलं
-
स्तो ७८:३-८—आईवडील बायबलमधून जे शिकले आहेत ते त्यांनी आपल्या मुलांना शिकवावं अशी यहोवाची इच्छा आहे
-
यहोवावर प्रेम असलेल्या कुटुंबात एखादं मूल वाढलं असेल, तरी ते यहोवाच्या सेवेपासून लांब का जाऊ शकतं?
-
उपयोगी बायबल अहवाल:
-
उत्प ६:१-५; यहू ६—वर्षानुवर्षं यहोवासोबत स्वर्गात असूनही काही स्वर्गदूतांनी यहोवाविरुद्ध बंड केलं
-
१शमु ८:१-३—शमुवेल एक विश्वासू आणि नीतिमान संदेष्टा होता, पण त्याची मुलं मात्र बेइमान आणि भ्रष्ट होती
-
आईवडिलांनी मुलांना यहोवाबद्दल शिकवायला केव्हा सुरुवात केली पाहिजे?
-
उपयोगी बायबल अहवाल:
-
अनु २९:१०-१२, २९; ३१:१२; एज १०:१—इस्राएली लोक यहोवाबद्दल शिकण्यासाठी एकत्र यायचे, तेव्हा ते आपल्या मुलांनाही घेऊन यायचे; म्हणजे त्यांनाही यहोवाबद्दल शिकता येईल
-
लूक २:४१-५२—दरवर्षी योसेफ आणि मरीया येशूला आणि आपल्या इतर मुलांना वल्हांडण सण साजरा करण्यासाठी यरुशलेमच्या मंदिरात घेऊन जायचे
-
मुलांना ज्यांच्यापासून धोका आहे त्यांच्यापासून त्यांचं संरक्षण करण्यासाठी आईवडिलांनी कोणाच्या उदाहरणाचं अनुकरण केलं पाहिजे?
-
उपयोगी बायबल अहवाल:
-
निर्ग १९:४; अनु ३२:११, १२—यहोवाने स्वतःची तुलना एका गरुडाशी केली. कारण हा पक्षी आपल्या पिल्लांना पंखांवर उचलून घेतो, त्यांचं संरक्षण करतो आणि त्यांची काळजी घेतो
-
यश ४९:१५—अंगावर पाजणारी स्त्री आपल्या बाळावर खूप माया करते. पण त्या आईपेक्षा कितीतरी पटीने जास्त यहोवा आपल्या सेवकांची काळजी घ्यायचं आणि त्यांचं संरक्षण करायचं अभिवचन देतो
-
मत्त २:१-१६—बाळ येशूला मारून टाकण्याच्या उद्देशाने, सैतानाने मूर्तिपूजा करणाऱ्या ज्योतिषांना दुष्ट हेरोद राजाकडे नेलं. पण यहोवाने आपल्या मुलाचं संरक्षण केलं. त्याने योसेफला त्याच्या कुटुंबाला घेऊन इजिप्तला जायला सांगितलं
-
मत्त २३:३७—कोंबडी जशी आपल्या पिल्लांना आपल्या पंखांखाली एकत्र करते आणि त्यांचं संरक्षण करते, तसं येशू आपल्या लोकांची काळजी घेतो
-
आईवडिलांनी आपल्या मुलांना लैंगिक शिक्षण का दिलं पाहिजे?
-
उपयोगी बायबल अहवाल:
-
लेवी १५:२, ३, १६, १८, १९; अनु ३१:१०-१३—मोशेच्या नियमशास्त्रात लैंगिक विषयांबद्दल अगदी स्पष्ट माहिती दिली होती. यहोवाची इच्छा होती की नियमशास्त्र वाचलं जात असताना मुलांनीही ते ऐकावं
-
स्तो १३९:१३-१६—यहोवाने मानवी शरीराची रचना किती सुंदर केली आहे याबद्दल आणि जन्म देण्याची क्षमता मानवांना दिली आहे याबद्दल दावीदने यहोवाचे आभार मानले
-
नीत २:१०-१५—विकृत आणि फसवणाऱ्या लोकांपासून यहोवाची बुद्धी आणि ज्ञान आपलं संरक्षण करू शकते
-
आईवडिलांनी मुलांना प्रेमाने शिस्त का लावली पाहिजे?
नीत १३:२४; २९:१७; यिर्म ३०:११; इफि ६:४
हेसुद्धा पाहा: स्तो २५:८; १४५:९; कल ३:२१
-
उपयोगी बायबल अहवाल:
-
स्तो ३२:१-५—दावीदने केलेल्या पापाबद्दल यहोवाने त्याला ताडन दिलं. पण खऱ्या मनाने पश्चात्ताप करणाऱ्यांना यहोवा क्षमा करतो हे माहीत झाल्यामुळे त्याला खूप दिलासा मिळाला
-
योन ४:१-११—योना संदेष्टा यहोवाशी रागाने आणि अनादराने बोलला, तरी यहोवाने त्याला धीराने दयेबद्दल शिकवलं
-
मुलांवर प्रेम असल्यामुळेच आईवडील त्यांना शिस्त लावतात असं का म्हणता येईल?
हेसुद्धा पाहा: नीत १५:३२; प्रक ३:१९