आज्ञा पाळणं
आज्ञा पाळणं का महत्त्वाचंय?
निर्ग १९:५; अनु १०:१२, १३; उप १२:१३; याक १:२२
-
उपयोगी बायबल अहवाल:
-
१शमु १५:१७-२३—शौल राजाने आज्ञा मोडल्यामुळे शमुवेल संदेष्ट्याने त्याला फटकारलं; नंतर आज्ञा पाळण्याचं महत्त्व त्याला समजावलं
-
इब्री ५:७-१०—येशू नेहमीच आपल्या पित्याच्या आज्ञेत राहिला. पण पृथ्वीवर त्याला खूप काही सोसावं लागलं आणि त्यांतून तो आज्ञाधारकता शिकला
-
एखाद्या अधिकाऱ्याने आपल्याला देवाची आज्ञा मोडायला लावली तर आपण काय केलं पाहिजे?
-
उपयोगी बायबल अहवाल:
-
दान ३:१३-१८—जीवाला धोका असतानाही तीन विश्वासू इब्री तरुणांनी, नबुखद्नेस्सर राजाने उभ्या केलेल्या मूर्तीची उपासना केली नाही
-
मत्त २२:१५-२२—येशूने सांगितलं की सरकारी अधिकारी जोपर्यंत त्याच्या शिष्यांना देवाच्या आज्ञा मोडायला लावत नाहीत, तोपर्यंत त्यांनी त्यांच्या आज्ञा पाळल्या पाहिजेत
-
प्रेका ४:१८-३१—अधिकाऱ्यांनी प्रेषितांना प्रचारकार्य थांबवायचा आदेश दिला, पण तरीही ते धैर्याने प्रचार करत राहिले
-
आपल्याला नेहमी यहोवाच्या आज्ञांचं पालन करता यावं म्हणून आपण काय केलं पाहिजे?
अनु ६:१-५; स्तो ११२:१; १यो ५:२, ३
हेसुद्धा पाहा: स्तो ११९:११, ११२; रोम ६:१७
यहोवा आणि येशूची आज्ञा पाळायला आपल्याला कोणत्या गोष्टीमुळे प्रेरणा मिळते?
आज्ञा पाळण्यावरून आपला विश्वास कसा दिसतो?
रोम १:५; १०:१६, १७; याक २:२०-२३
हेसुद्धा पाहा: अनु ९:२३
-
उपयोगी बायबल अहवाल:
-
उत्प ६:९-२२; इब्री ११:७—यहोवाने आज्ञा दिली होती अगदी त्याच प्रकारे नोहाने जहाज बनवलं. अशा प्रकारे, त्याला सांगितलं होतं ‘अगदी तसंच त्याने केलं’
-
इब्री ११:८, ९, १७—अब्राहामने देवाच्या आज्ञेवरून ऊर देश तर सोडलाच, पण तो आपल्या मुलाचं अर्पण द्यायलाही तयार झाला. यावरून त्याने देवावरचा आपला विश्वास दाखवून दिला
-
आज्ञांचं पालन करणाऱ्यांना यहोवा कसा आशीर्वाद देतो?
यिर्म ७:२३; मत्त ७:२१; १यो ३:२२
-
उपयोगी बायबल अहवाल:
-
लेवी २६:३-६—यहोवाच्या आज्ञांचं पालन करणाऱ्यांना तो वचन देतो, की तो त्यांची काळजी घेईल आणि त्यांना आशीर्वाद देईल
-
गण १३:३०, ३१; १४:२२-२४—कालेबने नेहमी यहोवाचं ऐकलं म्हणून यहोवाने त्याला आशीर्वाद दिले
-
आपण आज्ञांचं पालन केलं नाही तर काय होईल?
-
उपयोगी बायबल अहवाल:
-
उत्प २:१६, १७; ३:१७-१९—आदाम-हव्वाने देवाची आज्ञा मोडल्यामुळे त्यांनी नंदनवनासारखं आपलं घर, परिपूर्णता आणि सर्वकाळाचं जीवन गमावलं
-
अनु १८:१८, १९; प्रेका ३:१२, १८, २२, २३—यहोवाने भविष्यवाणी केली की मोशेपेक्षा एक मोठा संदेष्टा येईल आणि जे त्याच्या आज्ञेचं पालन करणार नाहीत त्यांना तो शिक्षा करेल
-
यहू ६, ७—बंडखोर स्वर्गदूतांनी आणि सदोम व गमोरामध्ये राहणाऱ्या लोकांनी यहोवाची आज्ञा पाळली नाही आणि त्यामुळे यहोवाचा राग भडकला
-
आपण येशू ख्रिस्ताची आज्ञा का पाळली पाहिजे?
-
उपयोगी बायबल अहवाल:
-
योह १२:४६-४८; १४:२४—येशूने सांगितलं की त्याच्या आज्ञा न पाळणाऱ्यांना भयानक परिणाम भोगावे लागतील
-
भाऊबहीण मंडळीत नेतृत्व करणाऱ्यांच्या आज्ञेत का राहतात?
ख्रिस्ती पत्नीने आपल्या पतीच्या अधीन का असलं पाहिजे?
मुलांनी आईवडिलांच्या आज्ञेत का राहिलं पाहिजे?
-
उपयोगी बायबल अहवाल:
-
उत्प ३७:३, ४, ८, ११-१३, १८—योसेफ तरुण असताना त्याचे भाऊ त्याचा द्वेष करायचे, तरी त्याने आपल्या पित्याची आज्ञा पाळली आणि तो त्यांना भेटायला गेला
-
लूक २:५१—येशू परिपूर्ण होता पण तरी तो आपल्या अपरिपूर्ण आईवडिलांच्या, योसेफ आणि मरीयाच्या अधीन राहिला
-
कामाच्या ठिकाणी आपल्याला कोणी पाहत नसलं तरी आपण आपल्या मालकाच्या अधीन का राहिलं पाहिजे?
आपण सरकारच्या अधीन का राहतो?