व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

काम

काम

काम आणि आनंद यांचा एकमेकांशी कसा संबंध आहे?

चांगलं आणि कौशल्याचं काम शिकण्याचे कोणते फायदे आहेत?

नीत २२:२९

  • उपयोगी बायबल अहवाल:

    • १शमु १६:१६-२३—तरुण असताना दावीद एक कुशल संगीतकार म्हणून ओळखला जायचा. त्याच्या या कलेची इस्राएलच्या राजाने खूप कदर केली, कारण त्यामुळे राजाचं अस्वस्थ मन शांत व्हायचं

    • २इत २:१३, १४—हूराम-अबी हा एक कुशल कारागीर होता. त्यामुळे शलमोन राजाने एका मोठ्या बांधकामासाठी त्याचा उपयोग केला

कामाच्या बाबतीत यहोवाच्या सेवकांची काय म्हणून ओळख असली पाहिजे?

इफि ४:२८; कल ३:२३

  • उपयोगी बायबल अहवाल:

    • उत्प २४:१०-२१—रिबका खूप मेहनती होती आणि मदत करायला नेहमी तयार असायची. अब्राहामच्या सेवकाने तिला जितकं करायला सांगितलं त्यापेक्षा जास्त काम तिने केलं

    • फिलि २:१९-२३—प्रेषित पौलने तीमथ्यला एक महत्त्वाची जबाबदारी दिली. कारण तीमथ्य नम्र होता आणि इतरांसाठी मेहनत घ्यायला नेहमी तयार असायचा

आपण आळशी का असू नये?

नीत १३:४; १८:९; २१:२५, २६; उप १०:१८

  • उपयोगी बायबल अहवाल:

    • नीत ६:६-११—शलमोन राजाने मुंगीचं उदाहरण देऊन सांगितलं, की आपण मेहनती असलं पाहिजे आणि आळशीपणा टाळला पाहिजे

आपण आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी मेहनत का घेतली पाहिजे?

आपल्या कुटुंबाच्या गरजा भागवण्यासाठी आपण मेहनत का केली पाहिजे?

१ती ५:८

  • उपयोगी बायबल अहवाल:

    • रूथ १:१६, १७; २:२, ३, ६, ७, १७, १८—तरुण वयात विधवा झालेल्या रूथने आपल्या सासूची, नामीची काळजी घेण्यासाठी खूप कष्ट केले

    • मत्त १५:४-९—जे लोक आध्यात्मिक गोष्टींचं कारण पुढे करून आपल्या आईवडिलांची काळजी घेण्याच्या जबाबदारीपासून पळ काढतात, त्यांची येशूने कडक शब्दांत निंदा केली

आपण मेहनतीने जे कमवतो त्याचा आपण इतरांसाठीही उपयोग का केला पाहिजे?

नोकरी-व्यवसायातून कमवलेल्या पैशांबद्दल आपण समतोल दृष्टिकोन कसा ठेवू शकतो?

आपण आपलं काम चांगल्या प्रकारे करावं आणि आपल्या रोजच्या गरजा पूर्ण कराव्यात यासाठी यहोवा आपल्याला मदत करायला तयार आहे हे कशावरून दिसतं?

मत्त ६:२५, ३०-३२; लूक ११:२, ३; २कर ९:१०

  • उपयोगी बायबल अहवाल:

    • उत्प ३१:३-१३—याकोबचा सासरा लाबानने त्याच्यावर अन्याय केला, पण यहोवाने याकोबची मेहनत पाहून त्याला आशीर्वाद दिला

    • उत्प ३९:१-६, २०-२३—योसेफ पोटीफरच्या घरात दास म्हणून काम करत होता त्या वेळी, आणि नंतर जेव्हा तुरुंगात होता तेव्हा यहोवाने त्याच्या कामावर आशीर्वाद दिला

आपण नोकरी-व्यवसायाला यहोवाच्या सेवेपेक्षा खूप जास्त महत्त्व का नाही दिलं पाहिजे?

स्तो ३९:५-७; मत्त ६:३३; योह ६:२७

  • उपयोगी बायबल अहवाल:

    • लूक १२:१५-२१—येशूने उदाहरण देऊन शिकवलं की पैसा कमवण्याला यहोवाच्या नात्यापेक्षा जास्त महत्त्व देणं मूर्खपणाचं आहे

    • १ती ६:१७-१९—प्रेषित पौलने इशारा दिला की श्रीमंत ख्रिश्‍चनांनी इतरांना कमी लेखू नये. उलट त्यांनी “चांगली कामं करण्याच्या बाबतीत श्रीमंत” असावं असं प्रोत्साहन त्याने त्यांना दिलं

कोणत्या प्रकारची नोकरी किंवा व्यवसाय करायचा हे ठरवायला आपल्याला कोणती तत्त्वं मदत करू शकतील?

यहोवासाठी काम करणं

ख्रिश्‍चनांनी कोणत्या सगळ्यात महत्त्वाच्या कामात भाग घेतला पाहिजे?

आपण यहोवाच्या सेवेत जास्त मेहनत घ्यायला का तयार असतो?

भाऊबहीण यहोवाच्या सेवेत जितकं करतात त्याची आपण एकमेकांसोबत तुलना का करू नये?

गल ६:३-५

  • उपयोगी बायबल अहवाल:

    • मत्त २५:१४, १५—येशूच्या उदाहरणावरून दिसून येतं की त्याच्या शिष्यांनी सारख्याच प्रमाणात काम करावं अशी अपेक्षा तो करत नाही

    • लूक २१:२-४—गरीब विधवेने जे छोटंसं दान दिलं त्याचं मोल किती मोठं होतं हे येशूने ओळखलं

यहोवाच्या सेवेत जे काम आपल्याला नेमून दिलंय ते पूर्ण करायची शक्‍ती आपल्याला कुठून मिळते?

२कर ४:७; इफि ३:२०, २१; फिलि ४:१३

  • उपयोगी बायबल अहवाल:

    • २ती ४:१७—प्रेषित पौलने मान्य केलं की त्याला गरज होती तेव्हा देवाने त्याला शक्‍ती दिली

यहोवाच्या सेवेत आपण मेहनत घेतो तेव्हा आपल्याला आनंद का होतो?