व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

क्षमा

क्षमा

यहोवा क्षमा करायला खरंच तयार असतो का?

स्तो ८६:५; दान ९:९; मीख ७:१८

हेसुद्धा पाहा: २पेत्र ३:९

  • उपयोगी बायबल अहवाल:

    • स्तो ७८:४०, ४१; १०६:३६-४६—इस्राएली लोकांनी कित्येकदा यहोवाचं मन दुखावलं; पण त्याने वारंवार त्यांना माफ केलं

    • लूक १५:११-३२—यहोवा किती मोठ्या मनाने क्षमा करतो हे सांगण्यासाठी येशूने अशा एका वडिलांचं उदाहरण दिलं, जे पश्‍चात्ताप केलेल्या आपल्या मुलाशी दयाळूपणे वागतात

यहोवा कशाच्या आधारावर आपले पाप माफ करतो?

योह १:२९; इफि १:७; १यो २:१, २

  • उपयोगी बायबल अहवाल:

    • इब्री ९:२२-२८—प्रेषित पौलने स्पष्ट केलं, की येशूने दिलेल्या बलिदानामुळे यहोवा आपले पाप माफ करू शकतो

    • प्रक ७:९, १०, १४, १५—प्रेषित योहानने सांगितलं, की यहोवा ‘मोठ्या लोकसमुदायातल्या’ लोकांचं पाप माफ करतो, कारण त्यांचा येशूच्या बलिदानावर विश्‍वास आहे

यहोवाने आपल्याला क्षमा करावी असं जर आपल्याला वाटत असेल तर आपण आधी काय केलं पाहिजे?

मत्त ६:१४, १५; मार्क ११:२५; लूक १७:३, ४; याक २:१३

  • उपयोगी बायबल अहवाल:

    • ईयो ४२:७-१०—यहोवाने ईयोबला बरं केलं आणि त्याला आशीर्वाद दिला; पण त्याआधी यहोवाने चुकीचं बोलणाऱ्‍या त्याच्या तीन मित्रांसाठी त्याला प्रार्थना करायला सांगितली

    • मत्त १८:२१-३५—यहोवाने आपल्याला माफ करावं असं वाटत असेल, तर आपणही इतरांना माफ करणं किती महत्त्वाचंय हे समजवण्यासाठी येशूने एक उदाहरण दिलं

पाप कबूल करणं आणि मनापासून पश्‍चात्ताप करणं किती महत्त्वाचंय?

प्रेका ३:१९; २६:२०; १यो १:८-१०

  • उपयोगी बायबल अहवाल:

    • स्तो ३२:१-५; ५१:१, २, १६, १७—गंभीर पाप केल्यामुळे दावीद राजा खूप दुःखी झाला आणि खचून गेला; पण त्याने मनापासून पश्‍चात्ताप केला

    • याक ५:१४-१६—जर आपल्या हातून गंभीर पाप झालं, तर आपण मंडळीतल्या वडिलांची मदत घ्यावी असं याकोबने सांगितलं

यहोवाने आपल्याला माफ करावं म्हणून आपण स्वतःत कोणते बदल केले पाहिजेत?

नीत २८:१३; यश ५५:७; इफि ४:२८

  • उपयोगी बायबल अहवाल:

    • १रा २१:२७-२९; २इत १८:१८-२२, ३३, ३४; १९:१, २—यहोवाने अहाब राजाला शिक्षा सुनावली तेव्हा तो नम्र झाला आणि यहोवाने त्याला दया दाखवली; पण आपल्या वाईट कामांबद्दल त्याने मनापासून पश्‍चात्ताप केला नाही. त्यामुळे यहोवाने त्याला माफ केलं नाही आणि त्याला मृत्यूदंड दिला

    • २इत ३३:१-१६—मनश्‍शे राजाने खूप वाईट कामं केली होती; पण त्याने मनापासून पश्‍चात्ताप केल्यामुळे यहोवाने त्याला माफ केलं. त्यानंतर मनश्‍शेने देशातून मूर्तिपूजा काढून टाकली आणि शुद्ध उपासनेला बढावा दिला

मनापासून पश्‍चात्ताप करणाऱ्‍यांना यहोवा किती प्रमाणात क्षमा करतो?

स्तो १०३:१०-१४; यश १:१८; ३८:१७; यिर्म ३१:३४; मीख ७:१९

  • उपयोगी बायबल अहवाल:

    • २शमु १२:१३; २४:१; १रा ९:४, ५—दावीदने खूप गंभीर पापं केली होती; पण त्याने मनापासून पश्‍चात्ताप केल्यामुळे यहोवाने त्याला माफ केलं, आणि नंतर ‘खऱ्‍या मनाने चालणारा’ असा त्याचा उल्लेख केला

यहोवासारखंच येशूसुद्धा क्षमा करायला तयार होता हे कशावरून दिसतं?

स्तो ८६:५; लूक २३:३३, ३४

  • उपयोगी बायबल अहवाल:

    • मत्त २६:३६, ४०, ४१—येशूला आपल्या शिष्यांच्या आधाराची सगळ्यात जास्त गरज होती नेमकं तेव्हाच ते झोपले होते; पण येशूने त्यांना समजून घेतलं आणि त्यांच्या मर्यादा ओळखल्या

    • मत्त २६:६९-७५; लूक २४:३३, ३४; प्रेका २:३७-४१—पेत्रने तीन वेळा येशूला नाकारलं, पण त्याने मनापासून पश्‍चात्ताप केल्यामुळे येशूने त्याला माफ केलं. आणि पुनरुत्थानानंतर येशू त्याला प्रत्यक्ष भेटला आणि नंतर त्याने त्याला मंडळीत काही खास जबाबदाऱ्‍या दिल्या

यहोवा सगळ्यांनाच माफ करणार नाही असं आपण का म्हणू शकतो?

मत्त १२:३१; इब्री १०:२६, २७; १यो ५:१६, १७

  • उपयोगी बायबल अहवाल:

    • मत्त २३:२९-३३—येशूने शास्त्र्यांना आणि परूश्‍यांना बजावलं, की त्यांना गेहेन्‍नाच्या न्यायदंडाचा सामना करावा लागले, म्हणजेच त्यांचा कायमचा नाश होईल

    • योह १७:१२; मार्क १४:२१—येशूने यहूदा इस्कर्योतला ‘नाशाचा मुलगा’ म्हटलं. या विश्‍वासघातकी व्यक्‍तीबद्दल त्याने असंही म्हटलं की, “तो जन्मालाच आला नसता तर बरं झालं असतं!”

कोणती गोष्ट आपल्याला इतरांना माफ करायला मदत करेल?