व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

खऱ्‍या उपासनेत खोट्या उपासनेची भेसळ

खऱ्‍या उपासनेत खोट्या उपासनेची भेसळ

सगळ्या धर्मांतले लोक एकाच देवाला मानतात का?

बायबल असं शिकवतं का, की यहोवाला सगळेच धर्म मान्य आहेत; मग त्यांच्या शिकवणी वेगवेगळ्या असल्या तरीही?

मत्त ७:१३, १४; योह १७:३; इफि ४:४-६

  • उपयोगी बायबल अहवाल:

    • यहो २४:१५—यहोशवाने सांगितलं की आपण यहोवाची उपासना करणार की इतर दैवतांची हे आपण ठरवलं पाहिजे

    • १रा १८:१९-४०—यहोवाने एलीया संदेष्ट्याद्वारे सांगितलं की खऱ्‍या देवाची उपासना करणाऱ्‍यांनी, बआलसारख्या खोट्या दैवतांची उपासना करू नये

खोट्या दैवतांबद्दल आणि त्यांच्या उपासनेबद्दल यहोवाला कसं वाटतं?

यहोवाची उपासना करण्यासोबतच लोक जेव्हा त्याला घृणा वाटेल अशी कामं करतात तेव्हा त्याला कसं वाटतं?

यश १:१३-१५; १कर १०:२०-२२; २कर ६:१४, १५, १७

  • उपयोगी बायबल अहवाल:

    • निर्ग ३२:१-१०—इस्राएली लोकांच्या दबावामुळे अहरोनने एका वासराची मूर्ती बनवली आणि ती वापरून “यहोवासाठी उत्सव” साजरा केला. यामुळे यहोवाला खूप राग आला

    • १रा १२:२६-३०—यहोवाची उपासना करायला लोकांनी यरुशलेमला जाऊ नये, म्हणून यराबामने यहोवाला सूचित करणाऱ्‍या मूर्ती बनवल्या. असं करून त्याने लोकांना पाप करायला लावलं

इस्राएली लोकांनी इतर दैवतांची उपासना करण्यापासून दूर राहावं म्हणून यहोवाने त्यांना काय शिकवलं?

यहोवाच्या लोकांनी इतर दैवतांची उपासना केली तेव्हा त्याने काय केलं?

शास १०:६, ७; स्तो १०६:३५-४०; यिर्म ४४:२, ३

  • उपयोगी बायबल अहवाल:

    • १रा ११:१-९—शलमोन राजाने विदेशी स्त्रियांच्या दबावाखाली येऊन इतर दैवतांची उपासना केली आणि लोकांनाही तसं करायला लावलं. यामुळे यहोवाचा क्रोध भडकला

    • स्तो ७८:४०, ४१, ५५-६२—आसाफने सांगितलं की इस्राएली लोकांनी बंड केल्यामुळे आणि मूर्तिपूजा केल्यामुळे यहोवाला खूप दुःख झालं. त्यामुळे यहोवाने आपले लोक म्हणून त्यांना नाकारलं

येशूने देवाच्या वचनाच्या विरोधात असलेल्या शिकवणींचं समर्थन केलं का?

  • उपयोगी बायबल अहवाल:

    • मत्त १६:६, १२—येशूने परूशी आणि सदूकी लोकांच्या शिकवणींची तुलना खमिराशी केली; कारण चुकीच्या शिकवणी खूप लवकर पसरतात आणि देवाच्या वचनातल्या शुद्ध शिकवणींना दूषित करतात

    • मत्त २३:५-७, २३-३३—येशूने शास्त्री आणि परूशी लोकांच्या चुकीच्या शिकवणींचा आणि ढोंगीपणाचा कडाडून विरोध केला

    • मार्क ७:५-९—शास्त्र्यांनी आणि परूश्‍यांनी देवाच्या शिकवणींपेक्षा माणसांच्या शिकवणींना जास्त महत्त्व दिल्यामुळे येशूने त्यांचा ढोंगीपणा उघडकीस आणला

आपल्या शिष्यांनी वेगवेगळे धार्मिक गट किंवा पंथ तयार करावेत अशी येशूची इच्छा होती का?

  • उपयोगी बायबल अहवाल:

    • योह १५:४, ५—येशूने द्राक्षवेलीचं उदाहरण देऊन सांगितलं की त्याच्या शिष्यांनी त्याच्यासोबत आणि सहउपासकांसोबत ऐक्यात असावं

    • योह १७:१, ६, ११, २०-२३—आपल्या मृत्यूच्या शेवटच्या रात्री शिष्यांसोबत असताना येशूने प्रार्थना केली की त्याच्या शिष्यांमध्ये एकी असावी

पहिल्या शतकातल्या वेगवेगळ्या मंडळ्यांमधली शिकवण आणि उपासनेची पद्धत सारखीच होती का?

प्रेका १६:४, ५; रोम १२:४, ५

  • उपयोगी बायबल अहवाल:

    • प्रेका ११:२०-२३, २५, २६—अंत्युखिया आणि यरुशलेम इथल्या मंडळ्यांनी सोबत मिळून आणि एकजुटीने काम केलं

    • रोम १५:२५, २६; २कर ८:१-७—पहिल्या शतकातल्या बऱ्‍याच मंडळ्यांनी संकटाच्या काळात उदारपणे दान देऊन एकमेकांना मदत केली; यावरून दिसून आलं की त्यांच्यात प्रेम आणि एकी आहे

‘आम्ही ख्रिस्ताला मानतो’ असा फक्‍त दावा करणारे पंथ देवाला मान्य आहेत का?

लोक जर ख्रिस्ताच्या आणि प्रेषितांच्या शिकवणी पाळत नसतील तर त्यांची उपासना देवाला मान्य असेल का?

प्रेका २०:२९, ३०; १ती ४:१-३

  • उपयोगी बायबल अहवाल:

    • मत्त १३:२४-३०, ३६-४३—येशूने खोट्या ख्रिश्‍चनांची तुलना जंगली गवताशी केली आणि म्हटलं की बरेच खोटे ख्रिस्ती समोर येतील आणि मंडळीत घुसतील

    • १यो २:१८, १९—वृद्ध प्रेषित योहानने म्हटलं की पहिल्या शतकाच्या शेवटापर्यंत मंडळीत बरेच ख्रिस्तविरोधी आले होते

मंडळीत जर चुकीच्या गोष्टी शिकवणाऱ्‍यांना आणि ख्रिस्ताविरुद्ध वागणाऱ्‍यांना खपवून घेतलं तर काय होऊ शकतं?

आपल्यातली एकी टिकवून ठेवण्यासाठी ख्रिश्‍चनांनी काय केलं पाहिजे?

ख्रिश्‍चनांनी खोट्या उपासनेत भाग का घेऊ नये?

खोट्या शिकवणी देवाच्या नजरेत कशा चुकीच्या आहेत हे लोकांच्या लक्षात आणून देणं योग्य आणि फायद्याचं का आहे?

खोट्या धर्माचे लोक जेव्हा आपला विरोध आणि छळ करतात तेव्हा आपल्याला आश्‍चर्य का वाटू नये?