व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

चुकीच्या मनोवृत्ती

चुकीच्या मनोवृत्ती

ख्रिश्‍चनांनी कोणत्या चुकीच्या मनोवृत्ती टाळल्या पाहिजेत?

राग

स्तो ३७:८, ९; नीत २९:२२; कल ३:८

हेसुद्धा पाहा: नीत १४:१७; १५:१८

  • उपयोगी बायबल अहवाल:

    • उत्प ३७:१८, १९, २३, २४, ३१-३५—योसेफच्या भावांनी योसेफवर हल्ला केला, त्याला दास म्हणून विकलं आणि याकोबला सांगितलं की त्याचा प्रिय मुलगा मेलाय

    • उत्प ४९:५-७—शिमोन आणि लेवी यांनी रागाच्या भरात भयंकर गोष्टी केल्या. त्यामुळे याकोबने त्यांना सांगितलं की त्यांचं वागणं खूप चुकीचंय आणि त्याने त्यांच्या रागाला शाप दिला

    • १शमु २०:३०-३४—शौल राजाने रागाच्या भरात आपल्या मुलाचा, योनाथानचा अपमान केला आणि त्याला मारून टाकायचा प्रयत्न केला

    • १शमु २५:१४-१७—नाबाल दावीदच्या माणसांवर ओरडला आणि त्याने त्यांचा भयंकर अपमान केला. असं करून नाबालने आपल्या संपूर्ण घराण्याचाच जीव धोक्यात घातला

भित्रेपणा

कठोर वृत्ती

अनु १५:७, ८; मत्त १९:८; १यो ३:१७

  • उपयोगी बायबल अहवाल:

    • उत्प ४२:२१-२४—योसेफच्या भावांनी म्हटलं की ते त्याच्याशी कठोरपणे वागले आणि या गोष्टीचं त्यांना खूप वाईट वाटलं

    • मार्क ३:१-६—परूशी लोकांची मनं किती कठोर आहेत हे पाहून येशूला खूप दुःख झालं

अनादर

पाहा: “अनादर

अहंकार

गल ५:२६; फिलि २:३

हेसुद्धा पाहा: नीत ३:७; २६:१२; रोम १२:१६

  • उपयोगी बायबल अहवाल:

    • २शमु १५:१-६—अबशालोम घमेंडी होता आणि लोकांनी दावीदला सोडून आपल्याकडे वळावं म्हणून त्याने बराच दिखावा केला

    • दान ४:२९-३२—नबुखद्‌नेस्सर राजा गर्विष्ठ होता. त्यामुळे यहोवाने त्याला शिक्षा दिली

ईर्ष्या; हेवा; मत्सर

रोम १३:९; १पेत्र २:१

हेसुद्धा पाहा: गल ५:२६; तीत ३:३

  • उपयोगी बायबल अहवाल:

    • उत्प २६:१२-१५—यहोवाने इसहाकच्या मेहनतीवर आशीर्वाद दिला, पण पलिष्टी लोक त्याचा हेवा करू लागले

    • १रा २१:१-१९—दुष्ट अहाब राजाला नाबोथचा द्राक्षमळा हवा होता. त्यामुळे त्याने कट रचून नाबोथचा खून केला

माणसांची भीती

स्तो ११८:६; नीत २९:२५; मत्त १०:२८

  • उपयोगी बायबल अहवाल:

    • गण १३:२५-३३—इस्राएलचे दहा हेर आपल्या शत्रूंना घाबरले आणि त्या हेरांमुळे इतर लोकसुद्धा घाबरले

    • मत्त २६:६९-७५—प्रेषित पेत्रने माणसांच्या भीतीमुळे येशूला तीन वेळा नाकारलं

लोभीपणा

पाहा: “लोभीपणा

द्वेष

नीत १०:१२; इफि ४:३१; तीत ३:३; १यो ४:२०

हेसुद्धा पाहा: गण ३५:१९-२१; १शमु ३०:६; मत्त ५:४३, ४४; कल ३:१९; याक ३:१४

  • उपयोगी बायबल अहवाल:

    • ओब १०-१४—अदोमी लोक आपल्या भाऊबंदांशी, इस्राएली लोकांशी फार क्रूरपणे वागले. म्हणून देवाने त्यांना शिक्षा केली

ढोंगीपणा

पाहा: “ढोंगीपणा

आळशीपणा

पैशावर आणि धनसंपत्तीवर प्रेम

मत्त ६:२४; १ती ६:१०; इब्री १३:५

हेसुद्धा पाहा: १यो २:१५, १६

  • उपयोगी बायबल अहवाल:

    • ईयो ३१:२४-२८—ईयोब श्रीमंत होता, पण त्याचं धनसंपत्तीपेक्षा यहोवावर जास्त प्रेम होतं

    • मार्क १०:१७-२७—एका तरुण श्रीमंत माणसाचं त्याच्या धनसंपत्तीवर इतकं प्रेम होतं, की तो ते सोडून येशूचा शिष्य व्हायला तयार झाला नाही

मर्यादा ओलांडणं

गर्व; घमेंडी वृत्ती

पाहा: “गर्व

भांडखोर वृत्ती

नीत २६:२०; फिलि २:३; १ती ३:२, ३; तीत ३:२; याक ३:१४-१६

हेसुद्धा पाहा: नीत १५:१८; १७:१४; २७:१५; याक ३:१७, १८

  • उपयोगी बायबल अहवाल:

    • उत्प १३:५-९—अब्राहामच्या आणि लोटच्या मेंढपाळांमध्ये भांडण झालं. पण अब्राहामने शांती टिकवून ठेवायचा प्रयत्न केला

    • शास ८:१-३—एफ्राईमची माणसं न्यायाधीश गिदोनसोबत भांडू लागली. पण गिदोनच्या नम्रतेमुळे त्यांचा राग शांत झाला

बंडखोरपणा

स्वतःला खूप नीतिमान समजणं

उप ७:१६; मत्त ७:१-५; रोम १४:४, १०-१३

हेसुद्धा पाहा: यश ६५:५; लूक ६:३७

  • उपयोगी बायबल अहवाल:

    • मत्त १२:१-७—परूशी लोक स्वतःला खूप नीतिमान समजायचे. येशूने त्यांचं वागणं चुकीचंय हे दाखवून दिलं

    • लूक १८:९-१४—येशूने उदाहरण देऊन सांगितलं की स्वतःला, इतरांपेक्षा जास्त नीतिमान समजणाऱ्‍यांना देव स्वीकारत नाही

हट्टीपणा; अडेल वृत्ती

यिर्म १३:१०

हेसुद्धा पाहा: यिर्म ७:२३-२७; जख ७:११, १२

  • उपयोगी बायबल अहवाल:

    • २इत ३६:११-१७—सिद्‌कीया राजा अडेल वृत्तीचा आणि दुष्ट होता. यामुळे त्याच्या प्रजेवर संकट आलं

    • प्रेका १९:८, ९—देवाच्या राज्याच्या संदेशावर विश्‍वास ठेवायला ज्यांनी नकार दिला आणि जे अडून राहिले, त्यांना पौलने प्रचार करायचं बंद केलं

अविचारीपणा

मार्क ७:२१-२३; इफि ५:१७

हेसुद्धा पाहा: १पेत्र २:१५

  • उपयोगी बायबल अहवाल:

    • १शमु ८:१०-२०—मानवी राजाची मागणी करणं किती चुकीचंय, हे शमुवेल संदेष्ट्याने इस्राएली लोकांना सांगितलं. पण ते त्याचं ऐकायलाच तयार नव्हते

    • १शमु २५:२-१३, ३४—दावीदने नाबालकडे खूप जास्त काही मागितलं नव्हतं. पण नाबालने मदत करायला नकार दिल्यामुळे त्याच्या संपूर्ण घराण्यावर संकट येता-येता राहिलं

दुष्ट संशय आणि आरोप

ईयो १:९-११; १ती ६:४

  • उपयोगी बायबल अहवाल:

    • १शमु १८:६-९; २०:३०-३४—शौल राजाने दावीदच्या एकनिष्ठतेवर संशय घेतला, इतकंच काय तर त्याने योनाथानलासुद्धा दावीदच्या विरोधात भडकवायचा प्रयत्न केला