धनसंपत्तीबद्दल प्रेम
धनसंपत्ती असणं चुकीचंय असं बायबल शिकवतं का?
-
उपयोगी बायबल अहवाल:
-
१रा ३:११-१४—शलमोन राजा नम्र असल्यामुळे यहोवाने त्याला भरपूर धनसंपत्ती देऊन आशीर्वाद दिला
-
ईयो १:१-३, ८-१०—ईयोब खूप श्रीमंत होता, पण यहोवासोबतचं त्याचं नातं त्याच्यासाठी सगळ्यात जास्त महत्त्वाचं होतं
-
पैसा आणि मालमत्ता या गोष्टी आपल्याला खरा आनंद का देऊ शकत नाही?
कोणत्या वेळी पैसा काहीच कामाचा नसतो?
पैसा आणि धनसंपत्तीचा सगळ्यात मोठा धोका काय आहे?
धनसंपत्तीची ताकद आपल्याला कशी फसवू शकते?
नीत ११:४, १८, २८; १८:११; मत्त १३:२२
-
उपयोगी बायबल अहवाल:
-
प्रेका ८:१८-२४—शिमोनने मूर्खपणे असा विचार केला की आपण पैशाने मंडळीतलं पद विकत घेऊ शकतो
-
पैशाच्या प्रेमामुळे आपण काय गमावून बसू शकतो?
-
उपयोगी बायबल अहवाल:
-
मार्क १०:१७-२३—एका श्रीमंत तरुणाला आपली धनसंपत्ती खूप प्रिय असल्यामुळे, येशूचा शिष्य व्हायची संधी तो गमावून बसला
-
१ती ६:१७-१९—प्रेषित पौलने श्रीमंत ख्रिश्चनांना इशारा दिला की त्यांनी आपल्या श्रीमंतीचा गर्व करू नये, नाहीतर ते यहोवाची मर्जी गमावून बसतील
-
धनसंपत्तीच्या प्रेमामुळे आपला विश्वास कसा कमजोर होऊ शकतो आणि आपण यहोवाची मर्जी कशी गमावू शकतो?
अनु ८:१०-१४; नीत २८:२०; १यो २:१५-१७
हेसुद्धा पाहा: स्तो ५२:६, ७; आम ३:१२, १५; ६:४-८
-
उपयोगी बायबल अहवाल:
-
ईयो ३१:२४, २५, २८—ईयोबला समजलं होतं की धनसंपत्तीवर भरवसा ठेवणं चुकीचं आहे. जर त्याने तसं केलं असतं तर त्यावरून दिसलं असतं की त्याचा यहोवावर भरवसा नाही
-
लूक १२:१५-२१—धनसंपत्तीवर प्रेम करणं किती धोक्याचं आहे हे समजवण्यासाठी, येशूने देवाच्या नजरेत श्रीमंत नसलेल्या एका धनवान माणसाचं उदाहरण दिलं
-
आपल्याजवळ जे काही आहे त्यात आपण समाधानी कसं राहू शकतो?
पैसा आणि मालमत्तेपेक्षा कोणती संपत्ती जास्त मौल्यवान आहे आणि का?
नीत ३:११, १३-१८; १०:२२; मत्त ६:१९-२१
-
उपयोगी बायबल अहवाल:
-
हाग १:३-११—इस्राएली लोकांनी आपली घरं बांधण्यासाठी आणि ऐशआरामात राहण्यासाठी भरपूर मेहनत केली, पण देवाचं मंदिर बांधण्याकडे दुर्लक्ष केलं. म्हणून यहोवाने हाग्गय संदेष्ट्याद्वारे त्यांना सांगितलं की तो त्यांना आशीर्वाद देणार नाही
-
प्रक ३:१४-१९—येशूने लावदिकीया मंडळीला कडक शब्दांत सल्ला दिला. कारण त्यांनी यहोवाच्या सेवेपेक्षा धनसंपत्तीला जास्त महत्त्व दिलं
-
आपल्याला जगण्यासाठी ज्या गोष्टींची गरज आहे त्या यहोवा नक्की पुरवेल, असा भरवसा आपण का ठेवला पाहिजे?