धीर धरणं
यहोवाने धीर कसा दाखवला?
हेसुद्धा पाहा: नहे ९:३०
-
उपयोगी बायबल अहवाल:
-
यिर्म ७:२३-२५—यहोवा आपल्या बंडखोर आणि हट्टी लोकांशी सतत धीराने कसा वागत आलाय याबद्दल त्याने सांगितलं
-
२पेत्र ३:३-९, १५—यहोवाने मोठ्या प्रमाणात सहनशीलता कशी आणि का दाखवली हे प्रेषित पेत्रने समजवलं. पण यहोवाच्या सहनशीलतेला अंत आहे हेही त्याने सांगितलं
-
यहोवाच्या सेवकांना धीराची गरज आहे का?
नीत २५:१५; १कर १३:४, ७; इफि ४:१-३; १ती ६:११; २ती २:२४, २५; ४:२; २पेत्र १:५, ६
-
उपयोगी बायबल अहवाल:
-
उत्प ३९:१९-२१; ४०:१४, १५, २३; ४१:१, ९-१४—योसेफला दास म्हणून इजिप्तमध्ये विकण्यात आलं आणि त्याने कोणताही गुन्हा केलेला नसताना बरीच वर्षं तुरुंगात टाकण्यात आलं. तरीसुद्धा त्याने धीराने सहन केलं आणि आपला विश्वास टिकवून ठेवला
-
इब्री ६:१०-१५—धीर दाखवणं किती महत्त्वाचंय हे शिकवण्यासाठी प्रेषित पौलने अब्राहामचं उदाहरण दिलं
-
प्रचार करताना काही जण आपल्या संदेशाकडे दुर्लक्ष करतील किंवा आपला छळ करतील अशी अपेक्षा आपण का करू शकतो?
मत्त १०:२२; योह १५:१८, १९; २कर ६:४, ५
-
उपयोगी बायबल अहवाल:
-
२पेत्र २:५; उत्प ७:२३; मत्त २४:३७-३९—“नीतिमत्त्वाचा प्रचारक” असलेल्या नोहाचं लोकांनी ऐकलं नाही. फक्त त्याचा आणि त्याच्या कुटुंबाचा जलप्रलयातून जीव वाचला
-
२ती ३:१०-१४—प्रेषित पौलने दुःखाचा, त्रासाचा धीराने सामना केला. आणि त्याने स्वतःचं उदाहरण देऊन तीमथ्यला धीराने सहन करायचं प्रोत्साहन दिलं
-
कुटुंबातल्या सदस्यांकडूनही विरोध होऊ शकतो याचं आपल्याला आश्चर्य का वाटू नये?
मत्त १०:२२, ३६-३८; लूक २१:१६-१९
-
उपयोगी बायबल अहवाल:
-
उत्प ४:३-११; १यो ३:११, १२—काईनची कामं दुष्ट असल्यामुळे त्याने त्याच्या भावाचा, हाबेलचा खून केला. पण हाबेल मात्र नीतिमान होता
-
उत्प ३७:५-८, १८-२८—यहोवाने आपल्याला एक खास स्वप्न दाखवलंय हे जेव्हा योसेफने आपल्या भावांना सांगितलं, तेव्हा त्यांनी त्याला पकडून खड्ड्यात टाकलं आणि नंतर दास म्हणून विकलं
-
आपला छळ होतो तेव्हा आपण मरणाला का घाबरू नये?
हेसुद्धा पाहा: प्रक २:१०
-
उपयोगी बायबल अहवाल:
-
दान ३:१-६, १३-१८—शद्रख, मेशख आणि अबेद्नगो हे आपला जीव गमवायला तयार झाले, पण त्यांनी मूर्तीची उपासना केली नाही
-
प्रेका ५:२७-२९, ३३, ४०-४२—प्रेषितांनी प्रचार केला तर त्यांना ठार मारलं जाईल अशी काही माणसांनी त्यांना धमकी दिली, पण तरी ते प्रचार करत राहिले
-
आपलं ताडन केलं जातं तेव्हाही यहोवाला विश्वासू राहायला आपल्याला कशामुळे मदत होईल?
-
उपयोगी बायबल अहवाल:
-
गण २०:९-१२; अनु ३:२३-२८; ३१:७, ८—यहोवाने मोशे संदेष्ट्याला ताडन दिलं तेव्हा त्याला खूप वाईट वाटलं. पण तरी त्याने शेवटपर्यंत यहोवाची विश्वासूपणे सेवा केली
-
२रा २०:१२-१८; २इत ३२:२४-२६—हिज्कीयाने पाप केल्यानंतर यहोवाने त्याला फटकारलं. पण तो नम्र झाला आणि पुढे विश्वासूपणे यहोवाची सेवा करत राहिला
-
इतर जण यहोवाची सेवा सोडून देतात तेव्हा आपल्या धीराची परीक्षा कशी होऊ शकते?
-
उपयोगी बायबल अहवाल:
-
स्तो ७३:२-२४—दुष्ट लोक किती आरामात राहतात आणि त्यांची किती भरभराट होते हे पाहून स्तोत्रकर्त्याला प्रश्न पडला, की धीराने यहोवाची सेवा करण्याचा काही फायदा आहे का
-
योह ६:६०-६२, ६६-६८—शिष्यांपैकी बऱ्याच जणांनी येशूच्यामागे चालायचं सोडून दिलं, पण प्रेषित पेत्रने धीराने त्याच्यामागे चालायचा निर्धार केला
-
आपल्याला धीर धरायला कोणत्या गोष्टींमुळे मदत होईल?
यहोवाला विश्वासू राहिल्यामुळे
बायबल वाचल्यामुळे आणि मनन केल्यामुळे
यहोवाला नियमितपणे आणि मनापासून प्रार्थना केल्यामुळे
-
उपयोगी बायबल अहवाल:
-
दान ६:४-११—प्रार्थना केल्यामुळे आपला जीव जाऊ शकतो हे माहीत असूनही दानीएल संदेष्टा नियमितपणे यहोवाला प्रार्थना करत राहिला
-
मत्त २६:३६-४६; इब्री ५:७—पृथ्वीवरच्या आपल्या शेवटच्या रात्री येशूने कळकळून प्रार्थना केली आणि त्याने इतरांनाही तसं करायला आर्जवलं
-
भाऊबहिणींसोबत उपासना करण्यासाठी नेहमी एकत्र आल्यामुळे
यहोवाने भविष्यासाठी दिलेल्या अभिवचनांवर लक्ष केंद्रित केल्यामुळे
यहोवावर, भाऊबहिणींवर आणि नीतिमत्वावर प्रेम वाढवत राहिल्यामुळे
विश्वास मजबूत केल्यामुळे
परीक्षांबद्दल योग्य दृष्टिकोन ठेवल्यामुळे
विश्वासू राहून धीराने परीक्षांना तोंड दिल्यामुळे कोणते फायदे होऊ शकतात?
आपण यहोवा देवाचा गौरव करत असतो
नीत २७:११; योह १५:७, ८; १पेत्र १:६, ७
-
उपयोगी बायबल अहवाल:
-
ईयो १:६-१२; २:३-५—यहोवा लोकांना आशीर्वाद देतो म्हणून ते यहोवाची उपासना करतात असा सैतानाने दावा केला. सैतानाचा दावा खोटा आहे हे सिद्ध करण्यासाठी ईयोबला धीराने परीक्षांना तोंड देणं गरजेचं होतं
-
रोम ५:१९; १पेत्र १:२०, २१—आदामने यहोवाची आज्ञा मोडली पण येशू शेवटपर्यंत विश्वासू राहिला. आणि असं करून त्याने एका महत्त्वपूर्ण प्रश्नाचं उत्तर दिलं: ‘सगळ्यात कठीण परीक्षेचा सामना करताना एक परिपूर्ण मानव यहोवाला एकनिष्ठ राहू शकतो का?’
-
आपण एकमेकांना धीर धरायचं प्रोत्साहन देतो
धीर धरल्यामुळे आपल्याला सेवाकार्यात चांगले परिणाम मिळतात
आपण धीर धरला तर यहोवाचं मन आनंदित होईल आणि तो आपल्याला आशीर्वाद देईल
मत्त २४:१३; लूक २१:१९; १कर १५:५८; इब्री १०:३६
हेसुद्धा पाहा: रोम २:६, ७; याक १:१२